तुम्ही वजन काट्यावर उभे रहाता आणि तुम्हाला अचानक एक किलो वजन कमी झाल्याचा सुखद धक्का बसतो.पण जास्त आनंदी होऊन काहीही खाण्याआधी जाणून घ्या की खरंच तुमच्या शरीरातील चरबीचे प्रमाण कमी झाली आहे की तुम्ही डी-हायड्रेट झाल्यामुळे तुमचे वजन कमी भरत आहे.यासाठी जाणून घ्या अचानक वजन कमी होणं देतात या ’10′ समस्यांचे संकेत !
Weight Loss Consultant and Expert डॉ.शीना सायनी यांच्याकडून जाणून घेऊयात अचानक वजन कमी होण्यामागचे नेमके कारण काय असते.
१.तुमचे वजन सातत्याने कमी होत आहे का?
जर तुमचे वजन फॅट लॉसमुळे कमी होत असेल तर ते सातत्याने कमी होत जाते पण जर शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे तुमचे वजन कमी झाले असेल तर त्यामध्ये सातत्य नसते ते अचानक कमी होते.जर एखाद्या दिवशी तुमचे पाण्याच्या कमतरतेमुळे एक किलो वजन कमी झाले असेल तर तुम्ही पुन्हा पाणी पिण्याने ते वाढू शकते.सतत वजनकाट्यावर वजन करुन निरिक्षणाद्वारे तुम्हाला तुमचे वजन पाण्याच्या कमतरतेमुळे कमी होत आहे हे समजू शकते.तुमचे वजन सातत्याने कमी होत आहे का हे तपासण्यासाठी तुम्ही तुमचे वजन सकाळी उठल्यावर प्रात:विधी करण्यापूर्वी अथवा नास्ता करण्यापूर्वी तपासू शकता.तसेच या लक्षणांनी ओळखा तुमचा मेटॅबॉलिझम रेट कमी आहे
२.तुम्ही काही वेळा पूर्वी काय खाल्ले आहे ?
तुम्ही मागील २४ तासांमध्ये जे काही काय खाल्ले आहे त्याचा परिणाम तुमच्या शरीरातील पाण्याच्या वजनावर होत असतो.आपल्या आहारामध्ये कार्बोहायड्रेट व सोडीयमचे प्रमाण गरजेचे असले तरी त्यांचे अतिप्रमाण तुमच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढवू शकते.तसेच आहारातून या पदार्थांचे प्रमाण कमी झाल्यास तुम्ही डी-हायड्रेट झाल्यामुळे पाण्याचे प्रमाण कमी होऊन तुमचे वजन कमी दाखवले जाऊ शकते.त्यामुळे एखाद्या सकाळी जर अचानक वजनकाटा तुमचे वजन २ ते ३ किलोने कमी झाल्याचे दाखवत असेल तर तुम्ही रात्री आहारात काय घेतले होते याचा विचार करा.तसेच जेवण टाळणे, तुम्हाला बनवू शकते लठ्ठ !
३.तुम्ही तुमचे वजन कधी केले होते?
दररोज एक तास वर्कआऊट केल्याशिवाय व आहारावर नियंत्रण ठेवल्याशिवाय तुमचे वजन २ ते ३ किलोने कमी होणे शक्य नाही.त्यामुळे जर एखाद्या दिवशी तुम्हाला असे अचानक वजन कमी झालेले दिसून आले तर ते तुमच्या शरीरातील पाण्याचे वजन असते हे लक्षात ठेवा.त्यामुळे तुमचा वजनकाटा तुम्ही रात्री केलेल्या वजनापेक्षा सकाळी केलेले वजन कमी दाखवत असेल ते तुमच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे कमी झालेले आहे हे समजून घ्या.तसेच वाचा बॉडी मास इंडेक्स खरंच देते का वजनाचा अचूक अंदाज ?
४.तुम्हाला नुकतीच मासिकपाळी आलेली आहे का?
वॉटर रिटेंशन हे मासिकपाळी पूर्वीचे एक लक्षण आहे.त्यामुळे मासिक पाळीनंतर तुमचे काही प्रमाणामध्ये वजन कमी होणे शक्य आहे.तसेच जाणून घ्या मासिकपाळीत 5 दिवसांपेक्षा अधिक रक्तस्त्राव होण्याची ७ कारणे !
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock