त्वचा, आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी फळे फायदेशीर ठरतात. परंतु, अनेकदा फळे खाण्याऐवजी फळांचा रस घेतला जातो. फळांच्या रसात क्रश केलेला बर्फ घालून पिणे अनेकांना आवडते. तुम्ही ज्यूस सेंटरवर ज्यूस तयार करताना पाहिलं असेल तर तुमच्या लक्षात येईल ज्यूस तयार करताना काहीही घालण्याआधी बर्फ क्रॅश करून घालतात. उन्हाळयात बर्फ घालतलेला थंडगार ज्यूस घेतल्यावर बरे वाटते. परंतु, फळांच्या रसात बर्फ घालणे खरंच योग्य आहे का ? हे जाणून घेण्यासाठी न्यूट्रीशियनिस्ट Priya Kathpal यांच्याशी संवाद साधला.
- फळातील बर्फामुळे काही दुष्परिणाम होतात का ?
फळांच्या रसात बर्फ घालून घेऊ नये. त्यामुळे अनेक दुष्परिणाम होतात. परंतु, हा गैरसमज आहे. फळांच्या रसात बर्फ घातल्याने कोणतीही हानी होत नाही. परंतु, ज्यूस सेन्टरवरील ज्यूस पिण्यापेक्षा शक्यतो घरी बनवलेला ताज्या फळांचा रस काढल्यावर लगेच घेणे अधिक योग्य ठरेल. फळांचा रस आरोग्यासाठी फायदेशीर असला तरी त्यात काही पदार्थ घालणे टाळावे. जाणून घ्या कोणते ते: फळांच्या रसात या ‘५’ गोष्टी घालू नका !
- बर्फ घातल्याने फ्रुट ज्युसेसच्या पौष्टिकतेत काही फरक पडतो का ?
तुम्ही जर बर्फ घातलेला फळांचा रस घेत असाल तर बर्फ वितळून त्यात पाणी वाढल्यामुळे फळांच्या रसाचे प्रमाण कमी होते. जेव्हा तुम्ही बर्फ घातलेला फळांचा रस घेता तेव्हा त्यात ३/४ ग्लास बर्फ घातलेला असतो. त्यामुळे नक्कीच कमी प्रमाणात फ्रुट ज्यूस पोटात जातो. म्हणून शक्य असल्यास बर्फ न घातलेला फळांचा रस घेणे योग्य ठरेल. परंतु, तुम्हाला थंड पाणी पिण्याची सवय असल्यास हे नक्की वाचा: फ्रीजमधील थंडगार पाणी पिण्याची सवय आरोग्याला ठरू शकते घातक !
- फळांच्या रसात बर्फ घातल्याने शरीराचे तापमान कमी होते का ?
आयुर्वेदात देखील असे सांगितले आहे की, थंड खाल्याने शरीराची उष्णता कमी होते. पित्त किंवा शरीराच्या उष्णतेमुळे मेटॅबॉलिझम होते. परंतु, जेव्हा पित्ताचे प्रमाण वाढते तेव्हा मेटॅबॉलिझममध्ये अडथळा येतो आणि शरीरात केमिकल इम्बॅलन्स होते. पित्तामुळे अॅक्ने, डायरिया, छातीत जळजळ आणि त्वचेवर रॅशेस येणे हे त्रास होतात. योग्य प्रमाणात थंड पेय घेतल्याने शरीराचे तापमान कमी होवून उष्णता देखील कमी होते. पित्ताचा त्रास कमी करण्याचे 5 घरगुती उपाय
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock