हा लेख वाचताना देखील कदाचित तुम्ही खुर्चीवर बसलेले असाल.जर तुम्ही दिवसभर बराच वेळ टिव्ही बघत असाल अथवा कॉम्प्युटर वर बसून काम असाल तर तुम्ही ही माहिती वाचणे फार आवश्यक आहे.अशा प्रकारे बसून काम करण्याच्या जीवनशैलीचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो सोबतच जीवनशैलीचे विकार देखील होतात.तसेच वाचा मोबाईल, कॉम्प्युटरच्या अति वापराने वाढतात हे डोळ्यांचे विकार!
कल्याण येथील फोर्टीस हॉस्पिटलचे Orthopaedic व Arthroscopy Surgeon डॉ.स्वप्निल झांब्रे यांच्याकडून जाणून घेऊयात अशा आळसावलेल्या जीवनशैलीचा तुमच्या हाडे व आरोग्यावर दीर्घकालीन काय परिणाम होतो.
दैनंदिन जीवनात तुम्ही चालणे अथवा लिफ्ट ऐवजी पाय-यांचा वापर करणे अशा शारीरिक हालचाल करणा-या गोष्टी करणे टाळतो.दिवसभरात सहा तासांपेक्षा अधिक काळ तुम्ही खुर्चीवर बसून काम करता.अशा जीवनशैलीमुळे तुमची हाडे व स्नायू कमजोर होण्याचा धोका वाढून हाडांचे विकार विकसित होण्याची शक्यता असते.ऐवढेच नाही तर अशी माणसे त्यांच्या प्रौढ वयातच २० ते ४० टक्के मसल मास गमावून बसतात.तसेच बसून काम करण्याच्या जीवनशैलीमुळे लवकर वृद्धत्व येते.त्यामुळे सक्रिय जीवनशैली असलेली माणसे आळशी जीवनशैली असलेल्या लोकांपेक्षा वयाने मोठी असून देखील तरुण दिसतात.यासाठी निरोगी स्वास्थ्यासाठी नियमित करा सूर्यनमस्कार !
बसून काम करण्याच्या जीवनशैलीचा हाडांवर कसा प्रभाव पडतो?
अशा तक्रारी ब-याचदा प्रौढ व्यक्तींकडून येतात ज्यांना आर्थ्राटीस अथवा संधीवाताची समस्या असते.या समस्यांमुळे अशा लोकांना त्यांची दैनंदिन कामे करणे देखील कठीण जाते.अशा लोकांना दररोज स्वयंपाक करणे,खरेदी करणे,औषधे घेणे,पैसे सांभाळणे किंवा अगदी घरामध्ये चालणे,अंघोळ करणे व कपडे घालणे देखील नकोसे वाटते.शिवाय जी प्रौढ माणसे त्यांच्या स्नायूंच्या त्यांच्या शारीरिक क्षमतेनूसार वापर करीत नाहीत त्यांच्या स्नायूंची कार्यक्षमता हळूहळू कमी होत जाते.अशा जीवनशैलीमुळे प्रौढ व्यक्तींना भविष्यात सांध्यांची दुखणी निर्माण होतात.अशा लोकांना आर्थ्राटीस अथवा ऑस्टिओपोरोसिस सारख्या समस्या झाल्यामुळे जीवन जगण्यासाठी इतरांची मदत घ्यावी लागते.तसेच वाचा या ५ गोष्टींमुळे भविष्यात तरुणांनाही आर्थ्राटीसचा धोका वाढू शकतो.
डॉ.झांब्रे याच्या मते निष्क्रीय जीवनशैलीचा माणसाच्या संपूर्ण आरोग्यावर विपरित परिणाम होतो.चुकीची जीवनशैली असलेल्या प्रौढांना चाळीशीनंतरचे जीवन जगणे कठीण जाते.चुकीच्या जीवनशैलीचा त्यांच्या हाडांवर दीर्घाकालीन दुष्परिणाम होतो.आर्थ्राटीस ही समस्या वृद्धापकाळी होत असली तरी आजकाल ही समस्या तरुणवयात होताना दिसत आहे.सांध्याचे नुकसान होण्यामागे एखाद्याच्या बसण्याचे प्रोश्चर कारणीभूत असू शकते ज्यामुळे पुढे सांध्यांमध्ये विकृती येते.
शारीरिक हालचाल कमी झाल्यामुळे हाडे कमजोर होतात व लवकर तुटतात.त्यामुळे सतत शारीरिक हालचाल केल्यामुळे हाडे मजबूत रहातात व सांधेदुखी टाळता येते.यासाठी वाचा तुमच्या आळशी जोडीदाराला अॅक्टिव्ह करण्यासाठी काय कराल?
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock