सतत ओठांना जीभ लावल्याने, धुम्रपानाच्या सवयीमुळे तर वातावरणातील प्रदूषणामुळेदेखील ओठांचा काळपटपणा वाढतो. मग अशा वेळी लिप बाम किंवा लीप लॉस लावून ओठांचा काळपटपणा लपवला जातो. मग बाजारात उपलब्ध असणारे महागडे लीपबाम विकत घेण्यापेक्षा घरीच बनवणे सोपे आणि फायदेशीर आहे. मग त्यातील केमिकल्सची काळजी करण्याची काहीच गरज नाही. मग कसा बनवावा हा लिप बाम हे जाणून घेण्यासाठी डॉ. निर्मल शेट्टी यांनी ‘ ब्युटी अॅट युअर फिंगरटीप्स’ या पुस्तकात दिलेली खास कृती तुम्ही देखील करून पहाच .. पण ओठ काळपट होण्याची कारणं तुम्हांला ठाऊक आहेत का ?
कसा बनवाल ‘लीप बाम’ -
- 2चमचे मध, बदामाचे तेल आणि व्हिटामिन ई ऑईल एकत्र करा .
- यामध्ये 3 टीस्पून स्ट्रॉबेरीचा पल्प एकत्र करा. तयार मिश्रण नीट ढवळून घ्या.
- एकजीव होण्यासाठी हे मिश्रण नीट वाटून घ्या.
- आता त्याची घट्ट पेस्ट तयार झाली असेल.
- लहान काचेच्या पात्रामध्ये मिश्रण घालून ते फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवा.
- हा लीप बाम दिवसातून 2-3 वेळेस ओठांना लावा.
- एकदा तयार केलेला लीप बाम आठवडाभर तुम्ही साठवून ठेवू शकता.
घरीच तयार केलेल्या या लीपलॉसमध्ये कोणतेही प्रिझरव्हेटीव आणि केमिकल नसतात. त्यामुळे ओठांचे आरोग्य राखण्यासाठी हे अगदीच सुरक्षित आहे. कळत-नकळत सतत ओठांना जिभेचा स्पर्श होतो. यामुळे केमिकलयुक्त लीपबाम आरोग्यास त्रासदायक ठरू शकतात. घरगुती लीपबाममधील सारे घटक घरगुती आणि नैसर्गिक असल्याने आरोग्यास धोका नाही. यामधील स्ट्रॉबेरी ओठांना मॉईश्चराईज करण्यासोबतच चमकदार बनवण्यास मदत करतात.
संबंधित दुवे -
ओठांचा काळपटपणा कमी करण्याचा झटपट घरगुती उपाय
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
Translated By - Dipali Nevarekar
Source - How to make natural lip gloss at home
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’पेज व‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या‘फोरम‘ ला भेट द्या.