कधीकधी बाळाला जन्म झाल्यावर लगेच काविळ होते.त्यामुळे अशा नवमातांना मातृत्वाचा आनंद उपभोगण्यापूर्वीच चिंता-काळजीला सामोरे जावे लागते.डॉक्टर व हॉस्पिटलचा स्टाफ तिला याबाबत फार काळजी करण्याची गरज नाही असे समजावतात.इतकंच नाही तर घरातील अनुभवी स्त्रिया देखील तिला त्यांचा एखादा याबाबतचा अनुभव सांगून धीर देतात.त्यामुळे मग तिला थोडे बरे वाटू लागते.Neonatal Jaundice अथवा नवजात बाळाला होणारी काविळ ही एक सामान्य समस्या असून जवळजवळ प्रत्येक बाळाला जन्माच्या वेळी काविळ होत असते.
मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलच्या Consultant Pediatrician डॉ.शंतनू सेन यांच्यामते Neonatal Jaundice ची लक्षणे सामान्यत: बाळाच्या जन्मानंतर दोन ते तीन दिवसांनी दिसू लागतात.
Neonatal Jaundice म्हणजे काय?
डॉ.सेन यांच्यामते जरी नवजात शिशूला होणारी काविळ ही एक सामान्य गोष्ट असली तरी त्या मातेला हे माहित असणे गरजेचे आहे की नवजात बाळाला होणारी काविळ व प्रौढांना होणारी काविळ या दोन निराळ्या समस्या आहेत.तुमच्या बाळाला होणारी काविळ ही त्याच्या यकृताच्या बिघाडामुळे होत नसून त्याच्या रक्तातील Bilirubin चे वाढलेले प्रमाण त्याच्या अपरिपक्व यकृतातून विर्सजित न झाल्यामुळे होत असते.
जेव्हा शरीर जुन्या लाल रक्त पेशींची पुर्ननिर्मिती करीत असते तेव्हा रक्तातील हिमोग्लोबिनच्या विघटनामुळे एक पिवळ्या रंगाचा घटक शरीरात निर्माण होतो त्याला Bilirubin असे म्हणतात.मानवी शरीरामध्ये ही एक मुलभूत शारीरिक घटना होत असते.या प्रक्रियेमध्ये निर्माण झालेले Bilirubin नंतर यकृतामधून बाहेर टाकण्यात येते.यकृतामध्ये विघटीत झालेले Bilirubin शरीरातून मल-मूत्राद्वारे बाहेर विर्सजित केले जाते.
डॉ.सेन यांच्यामते जर नवजात शिशूचे यकृत पुर्ण विकसित झालेले नसेल तर यकृताद्वारे हे Bilirubin चे प्रमाण व्यवस्थित बाहेर टाकले जात नाही व त्याची पातळी वाढून बाळाचे डोळे व त्वचा पिवळी पडते.जाणून घ्या या ’9′ कारणांमुळे बाळ करते रडारड !
नवजात बाळाला होणा-या काविळीचे निदान कसे केले जाते?
Neonatal jaundice मुळे नवजात बाळाचा चेहरा,छाती,पाय व कधीकधी तळवे पिवळे दिसू लागतात.बाळाला सौम्य स्वरुपात काविळ झाली असेल तर त्याचे अंग फिकट पिवळसर दिसू लागते.डॉ.सेन यांच्यामते Bilirubin ची पातळी निर्माण करण्यासाठी ब्लड टेस्ट करण्यात येते.बाळाचे वय व वजन यानूसार Bilirubin ची पातळी सामान्य नसल्यास उपचार करणे गरजेचे असते.Bilirubin ची पातळी अधिक असल्यास समस्या टाळण्यासाठी पुढील टेस्ट करण्यात येतात.
बाळाचा व आईचा रक्तगट समान नसल्यास Bilirubin ची पातळी वाढणे चिंताजनक असू शकते.बाळाचा व आईचा रक्तगट तपासण्यासाठी Coomb’s Test ही ब्लड टेस्ट करण्यात येते.या टेस्ट मुळे बाळाच्या रक्तद्रव्यामध्ये काही विशिष्ट अॅन्टीबॉडीज आहेत का हे तपासले जाते.या अॅन्टीबॉडीज रक्तातील हिमोग्लोबिन कमी करुन लाल रक्तपेशींवर हल्ला करतात ज्यामुळे Bilirubin ची पातळी वाढते.तसेच बाळाला उलटीचा त्रास होत असल्यास कशी घ्याल काळजी ?
नवजात बाळाला होणा-या काविळीवर काय उपचार केले जातात?
बाळाच्या शरीरातील Bilirubin ची पातळी वाढल्यास पुढील उपचार केले जातात-
Phototherapy-Bilirubin ची पातळी अधिक असलेल्या नवजात बाळांसाठी विशिष्ट निळ्या रंगाच्या प्रकाशाचा वापर करण्यात येतो.अशा विशिष्ट व कृत्रिम प्रकाशयोजनेमध्ये बाळाला त्याचे गुप्तांग व डोळे झाकून ठेवण्यात येते.डॉक्टरांच्या देखरेखीखाली बाळाला एक ते दोन दिवस ही थेरपी देण्यात येते.
Sunlight Conjugation or Sunlight Therapy-बाळाला हॉस्पिटलमधून घरी सोडल्यानंतर त्याच्या पालकांना बाळाला काही दिवस सनलाईट थेरपी देण्याचा सल्ला देण्यात येतो ज्यामुळे बाळाच्या शरीरातील Bilirubin बाहेर टाकले जाते.कडक ऊन टाळण्यासाठी पालक बाळाला सकाळी ९ आधी व संध्याकाळी ४ नंतर सुर्यप्रकाशामध्ये फिरवू शकतात.बाळाला सुर्यप्रकाशात नेताना त्याचे गुप्तांग व डोळे झाकून ठेवावे.सुर्यप्रकाशामुळे बाळाच्या शरीरातील बिलूरुबिन विघटीत होऊन मूत्रमार्गाद्वारे बाहेर टाकण्यात येते.
Exchange Transfusion-जर काविळ तीव्र स्वरुपात असेल तर बाळाला रक्तसंक्रमणाची गरज भासू शकते.डॉ.सेन यांच्यामते अशा स्थितीमध्ये बाळाच्या शरीरातील बिलूरुबीन पूर्ण पणे कमी होईपर्यंत बाळाच्या शरीरातील संपूर्ण रक्त संक्रमित केले जाते.
Intravenous Treatments-कधी कधी तीव्र स्वरुपातील काविळ असल्यास बाळाला Intravenous Immunoglobulin उपचार दिले जातात.
बाळाला Kernicterus सारखी गंभीर समस्या होऊ नये यासाठी बाळाच्या शरीरातील बिलूरुबिनची पातळी तपासणे गरजेचे आहे.Kernicterus या समस्येमध्ये बिलूरुबिन वाढल्यामुळे बाळाच्या मेंदूमध्ये बिघाड होऊ शकतो.जर वरील उपचार करुन देखील बाळाचे बिलूरुबिन कमी नाही झाले तर ती गंभीर बाब असून त्यासाठी पुढील उपचार करावे लागतात.जाणून घ्या नवजात बाळाच्या खाण्याबाबतचे ‘७’ समज – गैरसमज !
तुमच्या बाळाला ही समस्या झाल्यास काय कराल?
- चिंता करु नका- लक्षात ठेवा Neonatal Jaundice ही एक सामान्य समस्या असून जवळजवळ प्रत्येक बाळाला ही समस्या होऊ शकते.तसेच बाळाच्या जन्मानंतर दहा दिवसांमध्ये त्याचे यकृत पूर्ण विकसित होते व हळूहळू ही समस्या कमी होते.
- बाळाला स्तनपान द्या-बाळाचे पुरेसे हायड्रेशन व्हावे यासाठी बाळाला सतत स्तनपान द्या.बाळाने सतत स्तनपान केल्यामुळे त्याच्या मल व मूत्राच्या विर्सजनातून बिलूरुबिन बाहेर पडते.स्तनपान देणार्या नवमातांसाठी खास ८ एक्सपर्ट टीप्स !
- बाळाला सुर्यप्रकाशात न्या- पुरेश्या सुर्यप्रकाशामध्ये गेल्यामुळे बाळाच्या शरीरातील बिलूरुबिन कमी होते.
- तुमचा Rh factor जाणून घ्या-यासाठी तुमचा Rh factor आधीच तपासून घेणे महत्वाचे आहे.ज्यामुळे पुढील समस्या टाळता येऊ शकतात.
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock