बाळंतपणानंतर विशेषतः सिझेरियन झाल्यावर काय करावे आणि काय करू नये, यासंदर्भात अनेक सल्ले दिले जातात. वजन उचलणे किंवा पोटावर ताण येईल असे कोणतेही काम करण्यास सक्त मनाई असते. कारण टाके भरायला थोडा वेळ द्यावा लागतो. सिझेरियन ही मोठी सर्जरी असून त्यासाठी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. सिझेरियन प्रसुतीनंतर आठवड्याभरापासून महिनाभर काय त्रास होतो ?
सर्जरीनंतर पडणाऱ्या टाक्यांवर अधिक ताण दिल्यास हर्निया होऊ शकतो, असे सांगितले जाते. सिझेरियननंतर हर्निया होणे सामान्य नसले तरी हा त्रास उद्भवू शकतो. अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की, १००० सिझेरियन प्रसूतीमध्ये फक्त २ महिलांना हर्निया झाला आहे. सिझेरियन प्रसुतीनंतर टाळा या १५ चुका
सिझेरियननंतर हर्निया होण्याचे कारण काय ?
सिझेरियननंतर होणाऱ्या हर्नियाला incisional hernia असे म्हणतात. यामध्ये पोटाच्या आतील आवरण सर्जरीच्या छिद्रातून बाहेर ढकलला जातो. पोटावर ताण आल्यास आतड्यांचे आवरण सर्जरीचे टाके, कट्स पूर्णपणे बरे होण्याआधी बाहेर ढकलला जातो. हर्नियाची शारीरिक लक्षणे दिसून येतात. परंतु, त्यावर उपचार करण्याची गरज असते. ते आपोआप बरे होत नाहीत. वेळीच ओळखा हर्नियाची ही ’7′ लक्षणं !
धोका कोणाला अधिक आहे ?
सिझेरियन झालेल्या प्रत्येक महिलेला हा धोका नसतो. परंतु, काहींना हा धोका नक्कीच असतो.
- स्थूल महिला: स्थूल महिलांना हा धोका अधिक असतो कारण त्यांच्या पोटाच्या वजनामुळे, सुटलेल्या पोटामुळे सर्जरीकल कट्सवर अधिक ताण येतो.
- मधुमेही: मधुमेहामुळे कट्स लवकर भरण्यास अडथळे येतात. कट्स भरण्याआधी पोटावर अधिक वजन आल्यास हर्नियाचा धोका वाढतो.
- मोठे सर्जरीकल कट्स: मोठे सर्जरीकल कट्स भरण्यास खूप वेळ लागतो. त्यामुळे हर्नियाचा धोका वाढतो.
- पोटाचे टिशूज कमजोर असल्यास: स्नायू कमजोर असल्यास पोटाला योग्य आधार मिळत नाही. त्यामुळे पोटावर ताण येऊन हर्नियाचा धोका वाढतो.
सिझेरियननंतर होणाऱ्या हर्नियाची लक्षणे कोणती ?
- पोट फुगलेले दिसते: हे हर्नियाचे सामान्य लक्षण आहे. जेव्हा पोटाच्या आतील आवरण बाहेर ढकलले जाते तेव्हा पोट फुगलेले दिसते. जेव्हा तुम्ही सरळ उभे राहता तेव्हा ते जास्त दिसून येते. सिझेरियन पद्धतीबाबत हे ’5′ गैरसमज आजच दूर करा !
- मळमळ: मळमळ, उलटी होऊन पोट बिघडते.
- बद्धकोष्ठता: हर्नियामध्ये आतड्याचे आवरण जागचे सरकल्यामुळे bowel movement ला अडथळा येऊन बद्धकोष्ठता होते.
- दुखणे, त्रास होणे: हर्निया मोठा असल्यास त्यामुळे त्रास होतो.
यावर उपचार कसे करावेत ?
जर हर्निया मोठा नसून त्यामुळे त्रास होत नसेल तर abdominal binders चा वापर केल्यास फायदा होईल. परंतु, त्याचे स्वरूप गंभीर असल्यास म्हणजेच हर्नियाचा आकार अधिक वाढल्यास त्रास होऊ लागतो. अशावेळी सर्जरी करण्याचा सल्ला दिला जातो. हर्नियाच्या आकारानुसार ओपन सर्जरी करायची की लॅप्रोस्कोपिक हे ठरवले जाते. सिझेरियननंतर त्यातून लवकर बाहेर पडण्यासाठी या 5 टीप्स लक्षात ठेवा !
Reference: Aabakke, A. J., Krebs, L., Ladelund, S., & Secher, N. J. (2014). Incidence of incisional hernia after cesarean delivery: a register-based cohort study. PloS one, 9(9), e108829.
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock