Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

मासिकपाळीच्या दिवसांमध्ये स्विमिंग करावं का ?

$
0
0

स्विमिंग हा व्यायामाचा हटके पर्याय आहे. जीम, डाएट किंवा रोज एकसारखा व्यायाम करणार्‍यांसाठी स्विमिंग हा हटके आणि मजेशीर पर्याय आहे. पण मासिकपाळीच्या दिवसात मुलींनी नेमके काय करावे ? याकाळात स्विमिंग करणे त्रासदायक ठरू शकते का ? मासिकपाळीचे रक्त पाण्यात मिसळल्यास इतरांना इंन्फेक्शन पसरेल का ? असे एक ना अनेक प्रश्न मुलींच्या मनात असतात. मग तुमच्या मनातील याच प्रश्नांना Female health app Clue ने दिलेले हे खास उत्तर नक्की जाणून घ्या.

  • मासिकपाळीच्या दिवसात स्विमिंग करणं त्रासदायक आहे का ?

मासिकपाळीच्या दिवसात स्विमिंग करणं अनहायजेनिक किंवा अस्वच्छ असे काही नाही. Tampon किंवा मेन्स्ट्रुअल कप्सचा वापर केल्यास रक्त पाण्यात मिसळणार नाही. स्विमिंग करतानाही मासिकपाळी आल्यास फारच थोडे रक्त बाहेर पडते. तेदेखील पाण्यात विरघळले जाते. स्विमिंग पूलमध्ये थोड्या प्रमाणात मूत्र किंवा घाम विरळलेला असतो. पण या पाण्यामध्ये क्लोरिन घातलेले असते. त्यामुळे आजार पसरण्याचा धोका आटोक्यात आणला जातो.मासिकपाळीबद्दल मुलींच्या मनातील ’10′ प्रश्नांवर तज्ञांची खास उत्तरं !! नक्की जाणून घ्या.

  • पाण्यामध्ये मासिकपाळीचे रक्त मिसळण्याचा धोका असतो का ?

तुम्ही स्विमिंग करत असताना पाण्याचा दाब तात्पुरता रक्ताचा स्त्राव कमी करतात. पण हसल्यास, खोकल्यास, शिंका आल्यास किंवा इकडे तिकडे फिरल्यास थोडा फार रक्तप्रवाह होऊ शकतो. पण खरं पाहता हा रक्तस्त्राव दिसतही नाही इतका किरकोळ असतो. पाण्यातून बाहेर आल्यानंतर रक्तस्त्राव पुन्हा सुरळीत होतो. पण मासिकपाळीच्या काळात Tampon किंवा मेन्स्ट्रुअल कप्सचा वापर करा. सॅनिटरी नॅपकिन्स पाणी शोषून घेतात. मासिकपाळी दरम्यान पाळा या १० स्वच्छता टीप्स

  • मासिकपाळीच्या काळात स्विमिंग केल्यास इंफेक्शनचा धोका आहे का ?

स्विमिंग केल्याने व्हर्जायनल डिसिजेसचा धोका बळावतो असे फारच क्वचितच असते. स्विमिंग पूलचे पाणी तोंडावाटे आत गेल्यास स्किन इंफेक्शन किंवा पोटाचे आजार बळावण्याचा धोका असतो. पाण्यातील क्लोरिनचा त्वचेला , आरोग्याला त्रास होऊ नये म्हणून स्विमिंग नंतर आंघोळ करा. ओल्या स्वीम वेअरमध्ये फार काळ बसू नका.त्वचेवर खाज, जळजळ जाणवत असल्यास, अनियमित डिस्चार्ज होत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. मासिकपाळीच्या पहिल्या अनुभवाअगोदर मुलींना या ’5′ गोष्टी नक्की सांगा !

  • स्विमिंगमुळे मासिकपाळीच्या दिवसातील क्रॅम्स अधिक त्रासदायक ठरतात का ?

स्विमिंग सारखे लो इंटेनसिटी व्यायाम मासिकपाळीच्या दिवसातील क्रॅम्सचा त्रास कमी करतात. व्यायामादरम्यान एन्डॉरफिन हार्मोन्सचा प्रवाह होतो. हे घटक नैसर्गिकरित्या पेनकिलर्स आहेत. मासिकपाळीच्या काळातील वेदना दूर करण्यासाठी पेन किलर ऐवजी या   ’10′ नैसर्गिक उपायांचा वापर करा.

  • मासिकपाळीच्या रक्ताचे डाग पडतील का ?

मासिकपाळी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. जर तुम्हांला रक्ताचे डाग पडण्याची भीती असेल तर गडाद रंगाची बिकनी घाला. स्विम शॉर्टचा एक्स्ट्रा लेअर घाला. तुमच्या मैत्रीणीला सांगून थेवा. म्हणजे डाग पडल्यास ती तुम्हांला सावध करेल. या सोबतच तुम्हीदेखील अधूनमधून वॉशरूममध्ये जाऊन तपासून पाहू शकता. या टीप्सने मासिकपाळीच्या दिवसात कपड्यांवर डाग पडण्याचे टेन्शन होईल दूर !

Read this in English Translated By – Dipali Nevarekar छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles