आजकाल अनेक पर्यायी व हॉलिस्टिक औषधोपचार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत.अॅक्युपंक्चर उपचारांमध्ये काही विशिष्ट अॅक्युपंक्चर पॉईंट दाबून तीव्र वेदना व जखमा ब-या करता येतात.या उपचारांबाबत जरी संशय व्यक्त केला जात असला तरी अनेकांना या प्राचिन चीनी उपचार तंत्रामुळे अनेक आरोग्य समस्येमधून आराम मिळाला आहे.
या उपचारांसाठी सहा ते बारा वेळा आठवड्यातून एकदा सेशन घ्यावे लागतात.ब-याचदा या उपचारांबाबत असलेल्या काही समजांमुळे या उपचारांचा दैनंदिन आरोग्य समस्या दूर करण्यासाठी वापर करण्याकडे दुर्लक्ष करण्यात येते.यासाठी नक्की वाचा ‘अॅक्युप्रेशर’- मिनिटाभरात डोकेदुखी दूर करणारा झटपट उपाय !
न्यू दिल्लीच्या Ethos Healthcare च्या Consultant Acupuncture डॉ.अंजली शर्मा यांच्याकडून जाणून घेऊयात या सहा समस्यांवर अॅक्युपंक्चरचा कसा फायदा होऊ शकतो.
१.वृद्धत्वाची लक्षणे कमी करणे-जरी वृद्धत्व ही एक नैसर्गिक प्रक्रिया असली तरी अॅक्युपंक्चरच्या सहाय्याने तुम्ही तुमची वाढत्या वयाची लक्षणे कमी करु शकता.विशिष्ट फेशियल अॅक्युपंक्चरसाठी कॉस्मॅटिक अॅक्युपंक्चरसह काही पारंपारिक चीनी औषधांचा(TCM)वापर केला जातो.कॉस्मॅटिक अॅक्युपंक्चरमध्ये चेह-याचा रक्तप्रवाह व पोत सुधारण्यासाठी निडलींगचा वापर केला जातो ज्यामुळे चेह-यामधील उर्जेचे अडथळे दूर होऊन चेहरा उत्साही दिसू लागतो.
या उपचारांमुळे चेह-यावरील सुरकुत्या,फाइन लाइन्स,मळ,एज स्पॉट्स कमी करुन वयोमानानूसार ओघळलेल्या पापण्या सुधारता येतात.यासाठी GB 14, UB 1, UB 2, ST 1, ST 2, LI 20, ST 3, LI 19, DU 25, DU 26 व RN 24 या अॅक्युपंक्चर पॉईंटचा वापर केला जातो.तसेच ताण दूर करण्यासाठी चेहऱ्याला या पद्धतीने करा मसाज !
२.घसा खवखवणे-काही इनफेक्शन, अॅलर्जी व इरीटंट्समुळे खसा खवखवू लागतो.या लक्षणाची आणखी अनेक कारणे असू शकतात.कधीकधी वातावरणातील अति थंडी, अति उष्णता किंवा अति कोरडेपणामुळे देखील घसा खवखवतो.काही अॅक्युपंचर पॉईंट्सच्या जोड्यांच्या वापर करुन फुफ्फुसातींल उष्णता व कोरडेपणा देखील कमी करता येतो.यासाठी LU 11,CV 12,CV 22,LI 17,LI 18 या पॉईंट्सचा वापर करण्यात येतो.तसेच जाणून घ्या घशाच्या खवखवीवर घरगुती उपाय !
३.मासिक पाळीतील वेदना-मासिक पाळीतील वेदनेला Dysmenorrhea असे म्हणतात.यात प्राथमिक व माध्यमिक असे दोन प्रकार असतात. काही महीलांना ओव्हूलेशन होत असताना या वेदना होतात. अॅक्युपंचर मुळे गर्भाशयात होणारा रक्तप्रवाह सुधारण्यात येतो.त्यामुळे तेथील स्नायू शिथील होतात व मासिक पाळीतील वेदनेचा त्रास सुसह्य होतो.अॅक्युपंचर मुळे पिट्युटरी ग्रंथीचे कार्य सुरळीत होते त्यामुळे शरीराला नैसर्गिक उर्जा मिळते व शरीरातील हॉर्मोन्सचे संतुलन राहण्यास मदत होते. यासाठी LV 2, LV 3,CV 3,CV 6,GB 34,SP 6,SP 8,SP 10, ST 36 या पॉईंटचा वापर करण्यात येतो.तसेच वाचा मासिकपाळी दरम्यानच्या वेदना घालवण्याचा नैसर्गिक उपाय
४.सेक्सलाईफ सुधारते- हेल्दी सेक्स लाईफ साठी चांगली शरीरप्रकृती,मानसिक स्वास्थ,पुरेसा लिबीडो असणे व सेक्स विकार नसणे गरजेचे आहे. अॅक्युपंक्चर या सर्व गोष्टींसाठी खुप फायदेशीर उपचार आहे. अॅक्युपंचर मुळे सुदृढ शरीर प्रकृती व मानसिक स्वास्थ मिळणे सोपे होते. अॅक्युपंचर उपचारामुळे लिबीडो पूर्ववत होतो.त्याचप्रमाणे Erectile Dysfunction, Premature Ejaculation, Vaginismus, Aversion to sex, Painful sex अशा अनेक सेक्स विकारांवर अॅक्युपंचर गुणकारी ठरते.यासाठी सामान्यत: UB 23,UB 47,ST 36,KI 3,KI 6,CV 4,CV 6,SP 12 ,SP 13 पॉईंटस चा वापर होतो.जाणून घ्या आनंदी सेक्सलाईफचे रहस्य काय ?
५.अस्थमामध्ये आराम मिळतो- अस्थमा हा फक्त फुफ्फुसांचा विकार नसून तो किडनी व पोटाचा देखील विकार आहे. अॅक्युपंचर उपचारामध्ये हा विकार बरा करण्यासाठी किडनी व पोटातील पॉईंटसचा वापर करण्यात येतो.वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाझेशननूसार अॅक्युपंचर उपचारांमुळे अस्थमा सारख्या चाळीस विकारांमध्ये आराम मिळू शकतो.तसेच एका संशोधनात ७० टक्के अस्थमा रुग्णांना या उपचारांचा चांगला फायदा झाला असे आढळून आले आहे.यासाठी ST 12,ST 18, KI 22,SP 21,SP 17,CV 4,CV 6, CV 17,CV 22, UB 13,ST 36 हे पॉईंट्स वापरले जातात.जाणून घ्या अस्थमाचा त्रास दूर करणारा नैसर्गिक उपाय !
६.Carpal Tunnel Syndrome- कर्पनल टनल म्हणजे मनगटाचे हाड व अस्थिमधील पोकळी.या पोकळीतील नसा किंवा मांसमध्ये सूज अथवा इरीटेशन झाल्यास त्याचा दाब मज्जातंतूवर येतो त्यामुळे त्या भागाला झिणझिण्या आल्यासारखे होते.याला आपण मुंग्या येणे असेही म्हणतो.असे वारंवार होत असल्यास यामुळे हाताचा तळवा व विशेषत: अंगठा,अनामिका व मधले बोट बधीर होते किंवा त्याला मुंग्या येतात.या समस्येमध्ये अॅक्युपंचर उपचारांचा चांगला फायदा होतो.तसेच हा विकार बळावल्यास करावी लागणारी शस्त्रक्रिया देखील टळू शकते.यासाठी LI 4,PC 6 PC 7 या पॉईंट्स चा वापर करण्यात येतो.यासाठी वाचा ‘अॅक्युप्रेशर’ तंत्राने करु या आजारांवर मात !
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock