मेष-(२१ मार्च ते २० एप्रिल)- ग्रहांची दिशा उत्तम असल्याने हा आठवडा तुमच्यासाठी उत्साहाचा व आनंदाचा असेल.आरोग्याविषयी चिंता-काळजी करण्याचे काहीच कारण नाही.एखादी छोटी आरोग्य समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.मात्र ती गंभीर नसल्याने त्याबाबत फार काळजी करण्याची गरज नाही.उत्तम आरोग्यासाठी जाणून घ्या या ’5′ कारणांसाठी सामुहिकरित्या ध्यान करा !
वृषभ-(२१ एप्रिल ते २१ मे)-हा आठवडा जरी तुमच्या आरोग्यासाठी उत्तम असला तरी ज्यांना श्वसनविकार आहेत त्यांनी सावध रहावे.ताण-तणावात्मक परिस्थिती व धुळीच्या ठिकाणी जाणे टाळावे.इतर लोकांनी काळजी करण्याची काहीच गरज नाही.तुमच्यासाठी हा आठवडा आरोग्य-समृद्धीचा असेल.
मिथुन-(२२ मे ते २१ जून)-ग्रहांची स्थिती अनुकूल असल्यामुळे हा आठवडा तुमच्या राशीच्या लोकांसाठी देखील आरोग्य व स्वास्थाचा असेल.मात्र ज्या लोकांना रक्तदाबाची समस्या असेल त्यांना त्रास होण्याची शक्यता असल्यामुळे त्यांनी या आठवड्यामध्ये सावध रहावे.समस्या टाळण्यासाठी अशा लोकांनी नियमित चेक-अप करावे.
कर्क-(२२ जून ते २२ जुलै)-अचानक निर्माण झालेल्या आरोग्यविषयक काही समस्यांमुळे तुम्हाला दोन दिवस घरीच आराम करावा लागेल.पूर्ण बरे होण्यासाठी पुरेशी विश्रांती घ्या.औषधांसोबत तुमच्या आहाराकडे देखील पुरेसे लक्ष द्या.उत्तम आरोग्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.व्यायाम व योगासने करणे फायदेशीर ठरेल.
सिंह-(२३ जुलै ते २२ ऑगस्ट)-उंचावरुन पडून दुखापत होण्याची शक्यता आहे.त्यामुळे खाली उतरताना व चालताना सावध रहा.ज्यांनी पचनाची समस्या आहे त्यांना त्रास होण्याची देखील शक्यता आहे.अॅसिडिटीचा त्रास मुळापासून दूर करण्यासाठी कच्चा भाज्या व फायबरयुक्त धान्यांचा आहारात समावेश करा.
कन्या-(२३ ऑगस्ट ते २२ सप्टेबर)-जर तुम्हाला दीर्घकाळापासून एखादा आजार असेल तर त्यावर पर्यायी थेरपीचा चांगला फायदा होऊ शकतो.या उपचारांमुळे तुम्ही पूर्ण बरे व्हाल व तुम्हाला चांगला आराम देखील मिळेल.इतर लोकांसाठी हा आठवडा आरोग्याचा असून तुम्हाला कोणत्याही आरोग्यसमस्येचा धोका नाही.
तूळ-(२३ सप्टेबर ते २२ ऑक्टोबर)-कामावरील ताण-तणावाचा तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे.शारीरिक व मानसिक स्वास्थ राखण्यासाठी स्वत:साठी थोडासा वेळ काढा.ज्यांना रक्तदाबाची समस्या असेल त्यांनी ताण-तणावापासून दूर रहावे.नियमित चेक-अप करा.योगासने व मेडीटेशनचा तुम्हाला चांगला फायदा होऊ शकेल.यासाठी वाचा ताणतणाव उच्च रक्तरक्तदाबाचा त्रास वाढवतो का ?
वृश्चिक-(२३ ऑक्टोबर ते २२ नोव्हेंबर)-तुमचे एखादे जुने आजारपण पर्यायी थेरपीच्या सहाय्याने बरे होण्याची शक्यता आहे.या उपचारांमुळे तुम्हाला दीर्घकाळासाठी आराम मिळेल.निरोगी रहाण्यासाठी औषधे व आहार याबाबत काळजी घ्या.
धनु-(२३ नोव्हेंबर ते २१ डिसेंबर)-या आठवड्यामध्ये तुमच्या आरोग्याला कोणताही धोका नाही.तुमचे आरोग्य उत्तम राहील.उत्तम आरोग्याचा तुमच्या कामावर देखील चांगला परिणाम दिसून येईल.मात्र ज्यांना श्वसनसमस्या असतील त्यांनी डॉक्टरांच्या सल्लानूसार त्वरीत उपचार करावेत.
मकर-(२२ डिसेंबर ते २० जानेवारी)-ग्रहदिशा बदलल्यामुळे तुम्हाला या आठवड्यामध्ये एखाद्या आरोग्य समस्येला तोंड द्यावे लागेल.मात्र वेळीच योग्य ती खबरदारी घेऊन तुम्ही या समस्येला टाळू शकता.यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या व पौष्टिक आहार घ्या.
कुंभ-(२१ जानेवारी ते १८ फेब्रुवारी)-श्वसनसमस्या झाल्यास त्वरीत उपचार करा ज्यामुळे तुम्हाला अधिक त्रास होणार नाही.एखादे जुने आजारपण पुन्हा वर येण्याची शक्यता आहे.असे झाल्यास त्वरीत तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.प्रक्रिया केलेले असल्यामुळे कोल्ड ड्रिंक पिणे टाळा.
मीन-(१९ फेब्रुवारी ते २० मार्च)-पचनसंस्था मंदावल्यामुळे त्रास होण्याची शक्यता आहे.यासाठी रात्री फार उशीरा व चमचमीत अन्न खाणे टाळा.पचनसंस्था सुधारण्यासाठी सकाळी हलकेफुलके स्ट्रेचिंग एक्सरसाइज करा.रक्तदाबाची समस्या असलेल्यांनी देखील नियमित चेक-अप करावे. तसेच यासाठी वाचा आवळ्याचा रस – रक्तदाब आटोक्यात ठेवणारा नैसर्गिक उपाय
छाया चित्र सौजन्य : Shutterstock