Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

पावसाळ्यात पेडीक्युअर करताना या ‘६’गोष्टी नक्की लक्षात ठेवा !

$
0
0

पावसाळ्यात पाय स्वच्छ, हेल्दी आणि इन्फेकशनपासून दूर ठेवण्यासाठी अनेकजणी पेडीक्युअर करतात. परंतु, पेडीक्युअर करताना योग्य ती काळजी न घेतल्यास इन्फेकशनचा धोका असतो. कारण स्पा किंवा सलून मध्ये योग्य स्वच्छता किंवा साधने स्वच्छ नसल्यास इन्फेकशन होऊ शकते. यासाठी मुलुंड आणि कल्याणच्या फोर्टीज हॉस्पिटलचे  Infectious Disease Physician, डॉ. कीर्ती सबनीस यांनी काही टीप्स दिल्या. पायांना दुर्गंधी का येते आणि त्यावर उपाय काय ?

शक्यतो पावसाळ्यात पेडीक्युअर करणे टाळा. पण ते शक्य नसल्यास पेडीक्युअर करताना ही काळजी घेणे गरजेचे आहे.

१. पावसाळ्यात स्पा मध्ये जावून ट्रीटमेंटस घेणे टाळा. कारण पावसाळ्यात अगदी उत्तम स्पा मध्ये देखील स्वच्छता राखणे फार कठीण जाते. वातावरण थंड आणि दमट असल्याने ते बॅक्टरीयांच्या वाढीसाठी पोषक ठरते. जर स्पा मध्ये जाणार असाल तर तेथील स्वच्छतेची खात्री करून घ्या. कारण योग्य स्वच्छता न राखल्यास इन्फेकशन होण्याचा धोका असतो. पायावरील टॅन काढण्याचे घरगुती उपाय !

२. जर तुम्हाला स्पा च्या स्वच्छतेविषयी शंका असल्यास तुम्ही घरच्या घरी पेडिक्युअर करू शकता. त्यामुळे इन्फेकशनचा धोका कमी होईल. त्याचबरोबर तुमचे काम देखील वेळेत होईल. त्यासाठी तुम्हाला दुसरं कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. पावसाळ्यात पायांचे आरोग्य जपा या ‘३’ एक्स्पर्ट टीप्सने !

३. तसंच पावसाळ्यात पेडिक्युअर करताना नखाचं क्युटिकल काढू नका. कारण त्यामुळे इन्फेकशनपासून नखाचं आणि त्वचेचं संरक्षण होतं. ते काढल्याने नखांवरील सुरक्षा कवच निघून जातं आणि त्वचेचा बॅक्टरीयांशी थेट संबंध येतो व इन्फेकशन होण्याची शक्यता वाढते. नखांजवळील काळवंडलेली त्वचा कशी दूर कराल ?

. पावसाळ्यात फिश पेडिक्युअर करणं टाळा. कारण त्यामध्ये खूप वेळ पाय पाण्यात ठेवायला लागल्याने इन्फेकशन होण्याचा धोका असतो. कडूलिंब – फंगल इंन्फेक्शन दूर करण्याचा नैसर्गिक उपाय !

. पायांना खूप जास्त प्रमाणात स्क्रब करू नका. त्वचा सेन्सिटिव्ह असल्याने जास्त घासल्याने, चोळल्याने त्वचेला हानी पोहचू शकते. पायांची दुर्गंधी कमी करण्यासाठी घरगुती उपाय

६. पायाला जखम झाली असल्यास बाहेर जाणे किंवा स्पा मध्ये जाऊन ट्रीटमेंट घेणे टाळा. कारण जखम उघडी असल्याने त्यात  घाण जमा होऊ शकते. त्यामुळे बॅक्टरीया वाढीची शक्यता असते. परिणामी इन्फेकशन होऊ शकते. पायांच्या भेगा दूर करण्याचा सोपा घरगुती उपाय !

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>