मी दिवसातून ४-५ वेळा ब्रश करते. सकाळी, रात्री आणि काही खाल्यानंतर मला ब्रश करण्याची सवय आहे. दिवसातून अनेकदा ब्रश करणे योग्य आहे का ? यामुळे माझ्या दातांना काही हानी पोहचेल का ? कृपया यावर सल्ला द्यावा.
गोरेगावच्या Fortis Memorial Research Institute (FMRI) च्या Consultant Endodontist, डॉ. ज्योती सचदेव यांनी याबाबत मार्गदर्शन केले.
दातांचे आरोग्य राखण्यासाठी दिवसातून दोनदा दात घासण्याचा सल्ला दिला जातो आणि ते अत्यंत गरजेचे देखील आहे. त्यामुळे तुमचे दात स्वच्छ व शुभ्र राहतात. त्याचबरोबर हिरड्यांचे आरोग्य देखील राखले जाते. तोंडाचे आरोग्य जपण्यासाठी जिभेची स्वच्छता राखणे सुद्धा गरजेचे आहे. रात्रीही ब्रश करण्याची सवय कमी करेल या ’5′ समस्यांचा धोका !
तुम्हाला असे वाटते का? की खूप वेळा दात घासल्याने ते स्वच्छ राहतील, तोंडाचे आरोग्य राखले जाईल. तर ते चुकीचे आहे. दिवसातून ३-४ वेळा दात घासणे पूर्णपणे टाळावे. त्यामुळे दातांची झीज होईल. तसंच हिरड्यांचा भाग मागे ढकलला जाऊन दातांच्या मुळांचा सेन्सिटिव्ह भाग उघडा होईल व त्यामुळे कॅव्हिटीज आणि इतर हिरड्यांचे इन्फेकशन होण्याचा धोका वाढेल. कशी कराल योग्य टुथब्रशची निवड ?
तोंडाचे आरोग्य जपण्यासाठी दात घासणे गरजेचे आहेच. पण ते योग्य पद्धतीने घासणे जास्त गरजेचे आहे. जर तुम्ही दिवसातून २ वेळा पेक्षा अधिक वेळा दात घासत असाल तर तुमचे दात घासण्याचे टेक्निक योग्य असणे गरजेचे आहे. ब्रश योग्य अँगलमध्ये पकडणे, तो दातांवर फिरवताना हळूवार फिरवणे तसंच हिरड्यांना कोणतीही हानी न पोहचवता ब्रश करणे, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. दात दिवसातून किती वेळ घासणं गरजेचे आहे ?
दात घासण्यासाठी जास्त वेळ घेण्याची गरज नाही. पूर्ण तोंड, सगळे दात स्वच्छ करण्यासाठी ब्रशचे २०-२५ योग्य स्ट्रोक्स पुरेसे आहेत. दात घासताना जास्त दाब न देता हळूवार घासा. दात घासण्याची योग्य पद्धत म्हणजे ब्रश खालून वर गोलाकार फिरवा आणि हिरड्या देखील हळुवार साफ करा. ब्रश करताना या ’7′ चुका टाळा
काही खाल्यानंतर किंवा जेवणानंतर तोंड स्वच्छ करण्यासाठी पाण्याने गुळण्या करा किंवा माऊथवॉश वापरा. फ्लॉसचा वापर विशेषतः नाश्ता आणि जेवणानंतर करा. जेवणानंतर तुम्ही दात घासू शकता. त्यामुळे काही त्रास होणार नाही. या ’7′ समस्या आटोक्यात ठेवण्यासाठी दिवसातून दोनदा ब्रश कराच !
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock