२०१७ साल असून देखील आजही लोकसंख्येची समस्या दिवसेंदिवस अधिकच गंभीर होते आहे.खरंतर या समस्येचा सामना करण्यासाठी आज आपल्याकडे अनेक अत्याधुनिक गर्भनिरोधकांच्या उपाययोजना उपलब्ध आहेत.या समस्येचे मुळापासून निवारण करण्यासाठी महिला व पुरुष दोघांनी देखील सारखीच खबरदारी घ्यायला हवी.मात्र आजही यासाठी महिलांनाच जबाबदार धरण्यात येते.तसेच जाणून घ्या या ’6′ हटके मार्गाने वाढत्या लोकसंख्येवर आळा बसेल !
पुरुष याबाबत योग्य ती खबरदारी घेण्याची जबाबदारी नाकारतात कारण त्यांना नसबंदी सारखे कायमस्वरुपी उपचार करण्याची भिती वाटत असते.त्यामुळे शेवटी महिलांनाच गर्भनिरोधक गोळ्या,Spermicides,कॉपर-टी व Tubectomy सारख्या गर्भनिरोधक उपाय योजना कराव्या लागतात ज्यांचे त्यांच्यावर अनेक दुष्परिणाम होत असतात.यासाठी जाणून घ्या महिलांसाठी आयुर्वेदातील ’6′ गर्भनिरोधक पर्याय !
वास्तविक पुरुष व महिला या दोघांनी देखील गर्भनिरोधनाची जबाबदारी समान पद्धतीने वाटून घेतल्यास संभाव्य दुष्पपरिणाम टाळता येऊ शकतात.या समस्येचे निवारण करण्याचे सामर्थ्य आयुर्वेदामध्ये आहे.आयुर्वेदामध्ये प्राचिन काळापासून अनावश्यक गर्भधारणा टाळण्यासाठी अनेक उपाय सांगितलेले आहेत.जे सुरक्षित आहेत व ज्यांचे कोणतेही साईड इफेक्ट होत नाहीत.हे औषधोपचार स्वस्त व सहज उपलब्ध होतील असे देखील आहेत.जाणून घ्या फर्टिलिटी बाबतचे ’9′ समज-गैरसमज !
आयुर्वेद शास्त्रामध्ये केवळ महिलांसाठीच नाही तर पुरुषांसाठी देखील काही गर्भनिरोधक पद्धतींचा समावेश केलेला आहे.हे उपचार पुरुषांसाठी खात्रीदायक असून त्यामुळे त्यांच्या फर्टिलिटीवर कोणताही दुष्परिणाम होत नाही.
यासाठी Dr Vaidya’s New Age Ayurveda च्या डॉ.सुर्या भगवती यांच्याकडून जाणून घेऊयात पुरुषांना या औषधी वनस्पतींचा गर्भधारणा टाळण्यासाठी कसा फायदा होतो.
१.तुळस या वनस्पतीचा वापर-तुळस या पवित्र औषधी वनस्पतीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात.आयुर्वेद शास्त्रानूसार तुळस पुरुषांसाठी एक उत्तम गर्भनिरोधक असू शकते.डॉ.भगवती यांच्यामते दोन ग्रॅम तुळशीच्या पानांमुळे पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या व हालचाल कमी करता येऊ शकते.प्राचिन काळापासून आयुर्वेदात तुळस या औषधी वनस्पतीचा पुरुषांसाठी तोंडावाटे एक गर्भनिरोधक म्हणून वापर करण्यात येत असला.तरी नुकताच विज्ञानाने देखील या वनस्पतीमधील Antispermatogenic या गुणधर्माचा शोध लावला आहे.
२०१० मध्ये एका संशोधनामध्ये तुळसीच्या पानांचा उंदरावर एक महिना प्रयोग करण्यात आला असता त्यामुळे त्या उंदराची फर्टिलिटी कमी झाल्याचे आढळून आले. जाणून घ्या तुळस – शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवणारा नैसर्गिक उपाय
२.अर्क अथवा रुईचा वापर-अर्क अथवा रुई हे साऊथ आशियामधील एक झुडूप आहे.तुळस या वनस्पतीप्रमाणेच या वनस्पतीला देखील हिंदू धर्मात धार्मिक महत्व आहे.असे म्हणतात की हे भगवान शंकराचे हे एक आवडते फुल आहे.संस्कृतमध्ये या फुलाला अर्क असे म्हणतात.या फुलामध्ये देखील Antispermatogenic गुणधर्म आढळतात.मात्र ही वनस्पती एक विषारी वनस्पती असल्याने त्याचा वापर करताना सावध रहावे.या वनस्पतीचा स्वत:च्या मनाने वापर करण्यापूर्वी तुमच्या आयुर्वेदिक तज्ञांचा सल्ला जरुर घ्या.तसेच जाणून घ्या कडूलिंब-अनावश्यक गर्भधारणा टाळण्याचा नैसर्गिक उपाय
३.हळदीचा वापर-हळदी मध्ये असलेल्या अॅन्टीव्हायरल,अॅन्टीबॅक्टेरियल व अॅन्टीफंगल गुणधर्मासोबत अॅन्टीफर्टिलिटी गुणधर्म देखील आढळतात.डॉ.भगवती यांच्यामते हळदीच्या वापराने पुरुषांमधील फर्टिलिटी नियंत्रित ठेवता येते.२०११ मध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासानूसार मानवी शूक्राणू पेशी या Curcumin वर आधारीत असतात.हळदीमधील गुणधर्मांमुळे या Curcumin चे आकुंचन होते व त्यामुळे शुक्राणूंची हालचाल मंदावते.यासाठी हळदीचे दूध प्या आणि या ’7′ समस्यांना दूर ठेवा
संदर्भ-
1. Sethi, J., Yadav, M., Sood, S., Dahiya, K., & Singh, V. (2010). Effect of tulsi (Ocimum Sanctum Linn.) on sperm count and reproductive hormones in male albino rabbits. International journal of Ayurveda research, 1(4), 208.
2. Naz RK. Can curcumin provide an ideal contraceptive? Mol Reprod Dev. 2011 Feb;78(2):116-23. doi: 10.1002/mrd.21276. PubMed PMID: 21337449.
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock