Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

एका डोळ्याला अचानक अंधत्व येणं देते या समस्येचे संकेत !

$
0
0

कल्पना करा तुम्ही काहीतरी काम करताय व अचानक तुमच्या डोळ्यांसमोर अंधार निर्माण झाला.असह्य डोकेदुखीमुळे कधीकधी असे अचानक अंधत्व येऊ शकते.अशा परिस्थितीत काही मिनीटांनी तुम्हाला पुन्हा दिसू लागते.एका डोळ्याला येणारे हे अंधत्व जरी तात्पुरते असले तरी त्याचा भयंकर त्रास होऊ शकतो व त्यानंतर होणारी डोकेदुखी ही पाच तास किंवा त्याहून अधिक काळ असू शकते.अशा प्रकारे प्रचंड डोकेदुखीसह अचानक एका डोळयाने अंधत्व येणं या समस्येला Retinal Migraine असे म्हणतात.तसेच वाचा या ’10′ कारणांमुळे वाढतो मायग्रेनचा त्रास !

मुंबईतील जसलोक व लिलावती हॉस्पिटलच्या The Headache and Migraine Clinic चे प्रसिद्ध Headache Management Specialist डॉ.के.रविशंकर यांच्या मते रेटीनल मायग्रेन या समस्येला Ophthalmic Migraine किंवा Ocular Migraine असेही म्हणतात.या समस्येमध्ये डोकेदुखी जाणवत असल्यामुळे या समस्येला मायग्रेनचाच एक प्रकार समजले जाते.

 Retinal Migraine ची लक्षणे-

  • एका डोळ्याला तात्पुरते अंधत्व येणे.यामध्ये दृष्टी पूर्ण अथवा अांशिक प्रमाणात नष्ट होते.तसेच एक तासाच्या आत काळ परत येत नाही.
  • पूर्ण अथवा अांशिक प्रमाणात अंधत्व असू शकते.
  • अंधत्वासह भयंकर डोकेदुखी जाणवते.डॉ.रविशंकर यांच्यामध्ये ही डोकेदुखी कधी कधी दृष्टी जाण्याच्या आधी तर कधीकधी दृष्टी जाताना अथवा कधीकधी दृष्टी गेल्यावर काही काळाने जाणवू लागते.
  • ज्या दिशेला डोकेदुखी असते त्या दिशेच्या डोळ्याला अंधत्व येते.
  • अचानक अंधत्व आल्यामुळे भिती वाटू शकते.मात्र डॉ.रविशंकर यांच्यामते हे अंधत्व तात्पूरते असून त्यामधून रुग्ण पूर्ण बरा होऊ शकतो.यासाठी वाचा हे पदार्थ मायग्रेनचा त्रास कमी करण्यास उपयुक्त ठरतील !

व्हिज्युअल ऑरासह व्हिज्युअल मायग्रेन व Retinal Migraine या दोन्ही समस्या समान आहेत का?

ज्या लोकांना सतत मायग्रेनचा त्रास होतो त्यांना अचानक डोळ्यासमोर प्रकाश येणे अथवा दिवे किंवा रेषा चमकल्याचा अनुभव येतो.पण डॉ.रविशंकर यांच्यामते ही समस्या व Retinal Migraine ही समस्या एक सारख्या नाहीत.मायग्रेनमुळे डोळ्यांसमोर प्रकाश चमकणे ही समस्या पूर्णपणे वेगळी आहे.त्याचा या आंशिक अंधत्वाशी काहीही संबध नाही.डोळ्यासमोर प्रकाश चमकणे हे मायग्रेन विथ ऑराचे एक सामान्य लक्षण आहे.

असे असले तरी या दोन्ही समस्या कधीकधी एकत्र होऊ शकतात.Retinal Migraine रुग्णांपैकी २५ टक्के रुग्णांमध्ये मायग्रेन विथ ऑराची लक्षणे आढळून येतात.तसेच या रुग्णांमध्ये याच बरोबर उलटी,मळमळ,प्रकाश व आवाजाबाबत संवेदनशील असणे ही लक्षणे देखील आढळतात.जाणून घ्या दृष्टी अंधूक होण्यामागे असू शकतात ही ’14′ कारणंं !

Retinal Migraine या समस्येचा धोका कोणाला असू शकतो?

  • मायग्रेन अटॅकची हिस्ट्री असलेल्या लोकांना ही समस्या होण्याचा धोका असतो.
  • डॉ.रविशंकर यांच्यामते विशी व तिशीतल्या महिलांमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात आढळते.
  • Retinal Migraine ची फॅमिली हिस्ट्री असलेल्या लोकांना याचा धोका असू शकतो.डॉ.रविशंकर यांच्यामते मायग्रेन हा आजार आनुवंशिक असला तरी आईवडीलांना Retinal Migraine असल्यास मुलाला ही समस्या होईल असे मुळीच नाही.

Retinal Migraine ही समस्या होण्याची काय कारणे आहेत?

डॉ.रविशंकर यांच्यामते Retinal Migraine समस्या रक्तप्रवाहामध्ये अडथळा आल्यामुळे निर्माण होते.जेव्हा कोणत्याही कारणामुळे रक्तवाहिन्या आकुंचित होतात.तेव्हा डोळ्यांना रक्ताचा पुरवठा होणे थांबते व त्यामुळे ही समस्या निर्माण होते.तसेच जेव्हा हा अडथळा दूर होऊन रक्तप्रवाह पुन्हा पूर्ववत होतो तेव्हा हळूहळू दृष्टी परत येते.

Retinal Migraine या समस्येचे निदान कसे करण्यात येते?

Retinal Migraine या समस्येचे निदान करण्यासाठी कोणतीही टेस्ट उपलब्ध नाही.त्यामुळे डॉक्टरांना इतर गोष्टींद्वारे याचे निदान करावे लागते.त्यामुळे  रुग्णांने हे लक्षात ठेवावे की जर एखाद्याची दृष्टी गेली असेल तर त्याने ही समस्या Retinal Migraine असल्याचे स्वत:च निदान करु नये.कारण याचे डॉक्टरांकडून योग्य निदान करणे गरजेचे आहे याचे कारण असे की कदाचित ही समस्या ट्यूमर अथवा ब्लड क्लॉटमुळे देखील झाली असू शकते.

डॉ.रविशंकर यांच्यामते यासाठी डॉक्टर त्या रुग्णाची नेत्र तपासणी,एमआरआय स्कॅन,डॉपलर स्कॅन,अल्ट्रासाउंड अॅंिजओग्राफी किंवा सिटी स्कॅन करुन या समस्येची तपासणी करतात.रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा येण्यासाठी रक्ताच्या गाठी कारणीभूत आहेत का हे तपासण्यासाठी ब्लड टेस्ट देखील करण्यात येते.यासाठी वाचा मायग्रेनची डोकेदुखी कमी करणारे ‘भ्रमरी प्राणायम’ !

Retinal Migraine या समस्येवर काय उपचार केले जातात?

Retinal Migraine या समस्येवर मायग्रेन प्रमाणेच उपचार केले जातात.डॉ.रविशंकर यांच्यामते यासाठी काही रुग्णांना ब्लड थिनर म्हणून अॅस्प्रिन देण्यात येते.पण त्यामुळे अनेक जण अंधत्वाला घाबरुन ब-याचदा अॅस्प्रिनचा वापर करतात.पण खरंतर यावर Anti-Migraine औषधे घेणे गरजेचे आहे.तसेच वाचा आल्याचा काढा – मायग्रेनच्या त्रासावरील गुणकारी उपाय

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>