Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

‘आपन मुद्रा’–शरीर डीटॉक्स करण्याचा नैसर्गिक पर्याय !

$
0
0

निरोगी स्वास्थ्यासाठी आपण सक्तीचा आणि अवघड व्यायाम तसेच काटेकोर डाएट पाळणे हेच आवशयक आहे. हा तुमचा गैरसमज आहे.  केवळ श्वसनाच्या व्यायामामुळेदेखील आपण 90% विषारी घटक शरीराबाहेर टाकू शकतो हे तुम्हांला ठाऊक आहे का ? श्वसनाच्या व्यातामासोबतच काही मुद्रा करूनदेखील आपण शरीरातील विषारी घटक बाहेर टाकू शकतो. नैसर्गिकरित्या शरीर डीटॉक्स करण्यासाठी ‘अपान मुद्रा’ फायदेशीर आहे. यामुळे डोळे, कान व नाकातील टाकाऊ घटक बाहेर टाकण्यास मदत होते. मूत्रविसर्जनामध्ये अडथळा निर्माण होणे, बद्धकोष्ठता, मूळव्याध तसेच पचन मार्गात बिघाड होणे अशा समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होते. उलट्यांचा त्रास, अस्वस्थ  वाटणे, उचकी यांपासूनही सुटका मिळवण्यासाठी ‘अपान मुद्रा’ फायदेशीर ठरते.  या मुद्रेमुळे रक्तदाबाची समस्या नियंत्रणात राहण्यास, मासिकपाळीच्या दिवसात होणारा त्रास कमी होण्यास मदत होते. यकृताच्या विकारांपासून आराम मिळण्यासही आपान मुद्रा फायदेशीर ठरते. ( नक्की वाचा - परिक्षेच्या तणावावर ‘हस्तमुद्रा’ – एक रामबाण उपाय !)

कशी कराल आपन मुद्रा ? 

  • एका ठिकाणी शांत बसा.
  • हात  गुडघ्यांवर ठेवा. हाताचे तळवे आकाशाकडे राहतील अशा दिशेने ठेवा. यावेळी श्वासावर लक्ष ठेवा.
  • हाताच्या अंगठ्याचे टोक  मधल्या व अनामिका ( करंगळीच्या बाजूचे बोट ) या बोटांना जुळवावे. तर्जनी ( पहिले बोट ) व करंगळी ताठ ठेवा.
  • ही मुद्रा दिवसभरात तुम्ही नियमित 30-45 मिनिटे करा. एकावेळी करणे शक्य नसल्यास 10-15 मिनिटे दिवसातून तीनवेळा करा.
  • ही आपान मुद्रा आपण कधीही आणि कोठेही करू शकतो. मात्र सकाळी करणे अधिक फायदेशीर ठरू शकते. परंतू नियमित केल्यास ही अधिक परिणामकारक ठरू शकते.

खबरदारीचा उपाय - 

तुमच्या शरीराची प्रवृत्ती वात आणि कफ़ मिश्रित असल्यास ही मुद्रा योग्य प्रमाणात करा.

संबंधित दुवे - 

शरीर नैसर्गिकरीत्या डीटॉक्स करा या ’5′ पदार्थांनी !


 

छायाचित्र सौजन्य – getty images

Translated By  -  Dipali Nevarekar

Source –  Detox your body with this simple yoga mudra

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’पेज व‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या‘फोरम‘ ला भेट द्या.

 

 

परिक्षेच्या तणावावर ‘हस्तमुद्रा’ – एक रामबाण उपाय !


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>