Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

World Population Day 2017: आयुर्वेदातील ’6′गर्भनिरोधक पर्याय !

$
0
0

अनावश्यक गर्भधारणा टाळण्याचे अनेक मार्ग आहेत.सुरक्षित सेक्ससाठी कंडोमचा वापर करताना ते फाटल्यामुळे मात्र तुम्हाला अडचण येऊ शकते.मात्र यासाठी गर्भनिरोधक गोळ्यांचा तुम्हाला हमखास चांगला फायदा होतो.सेक्स केल्यानंतर ७२ तासांच्या आत गर्भनिरोधक गोळी घेतल्यास गर्भधारणा टाळणे तीनपट अधिक सुलभ होते.पण या गर्भनिरोधक गोळ्यांचे अनेक दुष्परिणाम असतात.जर तुम्ही सतत गर्भनिरोधक गोळ्या घेत असाल तर तुम्हाला त्याचा फार त्रास होऊ शकतो.या गोळ्यांमुळे तुमचे मासिकपाळीचे चक्र बिघडते,तुमचा लिबीडो कमी होऊ शकतो तसेच अनेक शारीरिक समस्या देखील निर्माण होतात.तसेच वाचा गर्भनिरोधक गोळ्या घेऊनही या ५ चुकांमुळे तुम्ही गरोदर राहू शकता.

खरंतर निसर्गात अशी अनेक आयुर्वेदिक गर्भनिरोधकं अाहेत ज्यामुळे गर्भधारणा तर रोखली जातेच शिवाय त्यांचा तुमच्या शरीरावर कोणताही दुष्परिणाम देखील होत नाही.मात्र असे असूनही अनेक लोक त्याचा वापर करीत नाही ही खरंच एक आश्चर्याची बाब आहे.

वैदिक काळापासून या आयुर्वेदिक गर्भनिरोधकांचा वापर करण्यात येतो.ही गर्भनिरोधके सुरक्षित असून त्याचा कोणताही साईड इफेक्ट होत नाही. Dr Vaidya’s New Age Ayurveda चे डॉ.सुर्या भगवती यांच्याकडून जाणून घेऊयात घरी तयार करता येण्यासारखी आयुर्वेदिक गर्भनिरोधके-

या आयुर्वेदिक गर्भनिरोधकांमुळे या तीन प्रकारे गर्भधारणा टाळता येते-

  • शुक्राणूंच्या मिलनातून स्त्रीबीज फलित होणे रोखणे.
  • फलित झालेले स्त्रीबीजाचे गर्भाशयामध्ये रोपण होणे रोखणे.
  • झालेली गर्भधारणा गर्भपात करुन नष्ट करणे.

१.एरंडेलाच्या बीया वापरणे-एरंडेलच्या बीया कोणत्याही स्थानिक आयुर्वेदिक अथवा हर्बेल स्टोरमध्ये उपलब्ध असतात.या बीयांचा गर्भधारणा रोखण्यासाठी प्राचिन काळापासून वापर केला जात असला तरी हे एक चाचणी व परिक्षण तंत्र आहे.या बीयांचा वापर गर्भनिरोधनासाठी करता येतो हे विज्ञानाने देखील मान्य केले आहे.अधिक वाचा एरंडेलच्या बीया बद्धकोष्ठतेवरचा घरगुती उपाय

डॉ.भगवती यांच्या मते यासाठी काही प्रमाणात ताज्या एरंडेलच्या बीया घ्या व त्या फोडा.फोडल्यावर त्यामध्ये तुम्हाला पांढरी बी मिळेल.तुम्ही गर्भधारणा रोखण्यासाठी सेक्स करताना अथवा सेक्स केल्यावर ७२ तासांच्या आत ही बी खाऊ शकता.ही बी इतर गर्भनिरोधक गोळ्यांप्रमाणे कार्य करते.

२.वाळलेल्या पुदिन्याची पाने वापरणे-आयुर्वेदानूसार पुदिनाच्या पानांमध्ये नैसर्गिक गर्भनिरोधक गुणधर्म असतात.यासाठी सेक्स केल्यावर लगेच एक चमचा वाळलेल्या पुदिन्याची पाने कोमट पाण्यासोबत घ्या.हे देखील एक उत्तम नैसर्गिक गर्भनिरोधक म्हणून कार्य करते.

३.जास्वंदाची फुले वापरणे-जास्वंदाच्या फुलांमध्ये बेझिंन हा घटक असतो.बेझिंनमध्ये गर्भधारणा रोखण्याचे गुणधर्म असतात.यासाठी जास्वंदाच्या फुलांची पेस्ट तयार करा व घ्या.

४.वावडींगाचा वापर-वावडींग काळीमिरीसारखी दिसतं.त्यामुळे त्याला False Pepper असेही म्हणतात.डॉ.भगवती यांच्या मते वावडींग हे प्रभावी गर्भनिरोधक असून त्यामध्ये ८३ टक्के गर्भनिरोधक गुणधर्म असतात.

५.तळिस्पात्राचा वापर-तळिस्पात्रा या औषधी वनस्पतीला Abies Webbiana असे देखील म्हणतात व हे तोंडावाटे घेण्यात येणारे एक नैसर्गिक गर्भनिरोधक आहे.या औषधाचे वैशिष्ट म्हणजे याच्या वापरामुळे फलित झालेले स्त्रीबीज गर्भाशयामध्ये रुजण्यापासून प्रतिबंध करता येतो.यामध्ये ५१ टक्के Anti-Implantation गुणधर्म असतात.

६.आलं वापरणे-प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरामध्ये हमखास आलं हे असतंच.काही लोक ओलं आलं वापरतात तर काही लोक सुकलेलं आलं(सुंठ) वापरतात.आलं हे  Anti-Inflammatory आहे हे आपल्या सर्वांना माहित असेलच.पण ब-याच जणांना हे माहित नसेल की आलं हा मासिकपाळीला उत्तेजना देणारा पदार्थ आहे.त्यामुळे मासिक पाळीला उत्तेजित करुन आल्यामुळे गर्भधारणा टाळता येऊ शकते.तसेच जाणून घ्या कडूलिंब-अनावश्यक गर्भधारणा टाळण्याचा नैसर्गिक उपाय

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>