तुम्हाला दुसरे बाळ हवे असेल व जर तुमचे आधीचे बाळंतपण सिझेरियन पद्धतीने झाले असेल तर दुस-यावेळी देखील सिझेरीयन प्रसूती होण्याची शक्यता अधिक असू शकते.अनेक जणी Vaginal Birth After C-section (VBAC) पहिल्यांदा सिझेरियन झालेले असले तरी दुस-या वेळेस नैसर्गिक प्रसूतीसाठी प्रयत्न करतात मात्र दुसरी डिलीव्हरी कशी होईल हे अनेक गोष्टींवर अवलंबून असू शकते.दुस-या प्रसूती दरम्यान मातेचे आरोग्य,मागील शस्त्रक्रियेच्या व्रणांची जाडी व गर्भाचा विकास अशा अनेक गोष्टींचा विचार दुस-या बाळंतपणात केला जातो.
प्रसूतीकळा या अनिश्चित असतात.त्यामुळे कधीकधी नैसर्गिक प्रसूतीसाठी प्रयत्न करत असताना देखील अचानक सिझेरीयन प्रसूती करावी लागू शकते.त्यामुळे या सर्व गोष्टी टाळण्यासाठी अनेक जणी दुस-या बाळंतपणासाठी देखील सि-सेक्शनचेच नियोजन करतात.यासाठी जाणून घ्या सिझेरियन प्रसुतीची निवड कोणत्या कारणांमुळे करावी लागते ?
मुंबईच्या क्लाऊडनाईन हॉस्पिटलच्या Consultant Gynaecologist and Obstetrician डॉ.मेघना सरवैया यांच्यामते जर तुमचे पहिले सिझेरीयन झाल्यावर देखील तुम्हाला पुन्हा आई व्हायचे असेल तर त्याआधी ही माहिती जरुर वाचा.
१.सिझेरियन शस्त्रक्रिया ही इतर शस्त्रक्रियेप्रमाणेच एक मोठी सर्जरी आहे.त्यामुळे जर तुमचे पूर्वी सिझेरीयन झालेले असेल तर त्यानंतरच्या प्रत्येक शस्त्रक्रियेमध्ये असणारा धोका अधिक वाढत जातो.यासाठी प्रत्येक स्त्रीला तीन पेक्षा अधिक सि-सेक्शन डिलीव्हरी न करण्याचा सल्ला देण्यात येतो.तसेच वाचा सिझेरियन नंतर वजन कमी करण्याचे ५ उपाय
२.प्रत्येक सर्जरी नंतर तुमचे गर्भाशय कमकुवत होत जाते.थोडक्यात एकदा सिझेरीयन झाल्यावर पुन्हा आई होताना तुमचे गर्भाशय गर्भधारणेसाठी पुरेसे सक्षम रहात नाही.तसेच प्रत्येक बाळ हे आधीच्या बाळापेक्षा आकाराने देखील मोठे असते त्यामुळे त्याचा गर्भाशयावर दाब येतो.यासाठी गरोदरपणाच्या काळात गर्भाचे योग्य वजन ठेवण्यासाठी ’5′ खास टीप्स !जरुर वाचा
३.जर तुम्हाला सि-सेक्शनने दोन पेक्षा अधिक मुले हवी असतील तर तिस-या गर्भारपणाच्या शेवटच्या आठवड्यामध्ये समस्या निर्माण होऊन आई व बाळाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.यासाठी वाचा सिझेरियन प्रसुतीनंतर टाळा या १५ चुका
४.प्रत्येक स्त्रीची शरीररचना निरनिराळी असल्यामुळे प्रत्येकीची शारीरिक शक्ती देखील निरनिराळी असते.त्यामुळे काही जणींची पहिली सिझेरियन डिलीव्हरी झाली तरी दुस-या वेळेस त्यांची कदाचित त्यांची नैसर्गिक डिलीव्हरी होऊ शकते.तर काही जणींसाठी मात्र दुस-या वेळी देखील सिझेरीयन करणेच योग्य असू शकते.अशा वेळी त्या स्त्रीचे गर्भाशय कमजोर असल्यास संभाव्य धोके टाळून बाळ व आईच्या जीव वाचविण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागतो.यासाठी या ४ कारणांसाठी सिझेरियन डिलीव्हरीचा निर्णय घेण्यापूर्वी पुन्हा एकदा विचार करा हे अवश्य वाचा.
५.प्रत्येक सिझेरीयन डिलीव्हरी नंतर Intrauterine Adhesion या समस्येचा धोका असू शकतो.याचा अर्थ असा की गर्भाशयाच्या अस्तरावरील आतील व्रण सर्जरीनंतर पूर्णपणे बरे होत नाहीत.त्यामुळे पुढे Intrauterine Rupture होण्याची शक्यता अधिक वाढते.मात्र असे क्वचितच घडू शकते कारण शस्त्रक्रिया अनुभवी Obstetrician कडून करण्यात येते.सिझेरियन प्रसुतीनंतर आठवड्याभरापासून महिनाभर काय त्रास होतो ?
यासाठी तुम्ही नेमके काय कराल?
तुमच्या गरोदरपणाचे व्यवस्थित नियोजन करा.पहिल्या गरोदरपणात नैसर्गिक प्रसूतीसाठी प्रयत्न करा.मात्र जर काही कारणांमुळे तुम्हाला पहिल्यावेळी सिझेरीयन प्रसूती करावी लागली तर भविष्यात तीन पेक्षा अधिक मुलांचे नियोजन करु नका.राष्ट्रीय कुटूंब नियोजन असोसिएशन देखील हम दो हमारे दो असा आदर्श कुटूंबनियोजनाचा सल्ला देते.त्यामुळे कुटूंबनियोजन करा व स्वत:च्या आरोग्याला जपा.तसेच वाढत्या सिझेरीयन डिलीवरीच्या प्रमाणाविरुद्ध सुर्वणा घोष यांचा लढा !जरुर वाचा.
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock