Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

प्रत्येक वेळेस डोकेदुखीवर औषधे घेणे योग्य आहे का ?

$
0
0

मी २६ वर्षांचा असून मी नुकत्याच एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये रुजू झालो आहे. कामाचा अति ताण आणि रात्री उशिरापर्यंत काम केल्याने माझे डोके दुखू लागते. मी डोकेदुखीवर आराम मिळावा म्हणून OTC औषधे घेतो आणि मला खरंच बरे वाटते. परंतु, मला असे वाटते की मी डोकेदुखीच्या औषधांचा ओव्हरडोस होतोय. कारण गेल्या काही दिवसांपासून माझ्या पोटात देखील दुखत आहे. पण मला डॉक्टरकडे जाण्याची भीती वाटते. कृपया मला सांगा मी काय करू ?

या प्रश्नाचे उत्तर मुंबईच्या Head at Headache & Vertigo Clinic च्या न्यूरॉलॉजिस्ट Dr Pawan Ojha, यांनी दिले.

प्रथमतः साधे डोके जरी दुखत असले तरी डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. कारण त्यामुळे डोकेदुखीचे नेमके कारण कळेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःच्या मनाने औषधे-गोळ्या घेऊ नका. कारण सातत्याने स्वतःच्या मनाने गोळ्या घेतल्यास त्याचे शरीरावर दुष्परिणाम होऊ लागतील. म्हणून वेळ निघून जाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. डोकेदुखीचे कारण जाणून घेण्यासाठी योग्य त्या टेस्ट करा आणि आजारावर वेळीच ट्रीटमेंट घ्या. कारण ताणामुळे डोके दुखू लागते किंवा डोकेदुखी हा ब्रेन ट्युमरचा संकेत असू शकतो. परंतु, याचे निदान डॉक्टरचं व्यवस्थित करू शकतील. ‘अ‍ॅक्युप्रेशर’- मिनिटाभरात डोकेदुखी दूर करणारा झटपट उपाय !

पोटदुखीचा जर विचार केला तर हा पेनकिलर्सचा दुष्परिणाम असू शकतो. काही पेन रिलिव्हर्समध्ये nonsteroidal anti-inflammatory drugs (NSAIDs)  असल्याने पोटात दुखू लागते. ब्लीडींग, अॅल्सर्स आणि इतर दुष्परिणाम होतात. विशेषतः जर ही औषधे तुम्ही दीर्घ काळापर्यंत अधिक प्रमाणात घेत असाल तर त्याचे दुष्परिणाम होतात. खायची पानं आणि एरंडेल तेल – डोकेदुखी दूर करण्याचा घरगुती उपाय !

डोकेदुखीची औषधे महिन्याभरात १० दिवसांपेक्षा अधिक वेळा घेतल्यास त्याचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. व औषधाच्या ओव्हरडोसमुळे डोके दुखू लागते. औषधांच्या अति वापरामुळे होणारी डोकेदुखी तेव्हा होते जेव्हा औषधं काम करणं बंद करतात. आणि डोकेदुखी होऊ लागते. म्हणून डोकेदुखीवर आराम मिळावा म्हणून तुम्ही औषधे घेता. पण त्याच्या अतिरिक्त वापरामुळे पुन्हा डोकं दुखू लागतं. आणि हे चक्र चालू राहतं.

डोकेदुखीची लक्षणे एका तासापेक्षा अधिक वेळ राहिल्यास हा मेंदूच्या भागात रक्ताचा पुरवठा नीट होत असल्याचा संकेत आहे. अशा वेळेस डोकेदुखीकडे दुर्लक्ष करू नका. अशा वेळेस डॉक्टरांचा सल्ला घेणे अतिशय योग्य ठरेल. कारण डोकेदुखीचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी डॉक्टर तपासण्या करण्यास सांगतील आणि त्यावरून योग्य ती ट्रीटमेंट सुरु करतील. म्हणून डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि ३-४ दिवसांपेक्षा अधिक काळ असलेल्या डोकेदुखीकडे दुर्लक्ष करू नका.

 

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles