Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

अॅनेमियाचा धोका नेमका कोणाला असतो ?

$
0
0

देशभर २,१८,२०० सॅम्पल्सवर करण्यात आलेल्या रिसर्चनुसार अॅनेमिया ही भारतीय महिलांमध्ये आढळणारी अतिशय सामान्य समस्या आहे. त्यात ५०% (१,०८,८४५) सॅम्पल्समध्ये अॅनेमियाची लक्षणे दिसून आली. लॅबमध्ये करण्यात आलेल्या डायग्नोसिसवरून असे दिसून आले की ९०.४% लोकांना सौम्य अॅनेमिया आहे. तर ९% लोक माफक प्रमाणात (moderately) अॅनेमिक आहेत. आणि ०.६% लोकांना सीव्हीयर अॅनेमिया आहे. Metropolis Healthcare चे Associate Vice President, डॉ. राजेश बेंद्रे यांनी साधारणपणे अॅनेमियाचा धोका कोणाला आहे, याबाबत माहिती दिली. आहारातील या ‘१०’अन्नघटकांनी वाढवा तुमचे हिमोग्लोबिन

अॅनेमियाचा धोका कोणाला आहे ?

अॅनेमिया म्हणजे शरीरात रेड ब्लड सेल्स किंवा हिमोग्लोबिनची कमतरता असणे. Independent data analysis च्या रिपोर्टनुसार वयोगट १८-४५ मधील बहुतांश स्त्रियांना अॅनेमिया आहे. त्यात अगदी गंभीर स्वरूपाच्या अॅनेमियाचा देखील समावेश आहे. अॅनेमियाचा धोका स्त्रियांमध्ये मुलं होण्याचा काळात म्हणजेच गर्भवती महिलांना अधिक असतो. परंतु, हा धोका फक्त स्त्रियांनाच असतो असे नाही. खरंतर कुपोषित प्रत्येक व्यक्तीला विशेषतः आहारात आयर्नची कमतरता असलेल्यांना हा धोका असतो. जर तुम्ही सातत्याने रक्तदान करत असाल तर त्यामुळे रक्ताच्या निर्मितीवर परिणाम होऊन अॅनेमियाचा धोका वाढतो. जरूर वाचा: अॅनेमिक असल्यास रक्तदान करणे योग्य आहे का ?

नवजात बाळ, लहान मुले विशेषतः प्रीमॅच्युअर जन्मलेल्या मुलांना देखील हा धोका असतो. तुम्ही शाकाहारी असाल आणि आहारात आयर्नयुक्त पदार्थांचा समावेश करत नसाल तर अॅनेमियाचा धोका वाढतो. म्हणून आहारात टाळू नका हे ’7′ आयर्नयुक्त पदार्थ !

आयर्नची कमतरता आणि गरोदरपण ही अॅनेमियाची दोन मोठी कारणे आहेत. काही वेळेस सीव्हीयर अॅनेमिया गंभीर समस्यांचा संकेत असू शकतो. त्यामुळे निरोगी जीवनावर परिणाम होतो. या गंभीर समस्यांमध्ये beta thalassemia, macrocytic anemia आणि इतर क्रोनिकल आजार यांचा समावेश आहे. अभ्यासातून असे दिसून आले आहे की,  beta thalassemia, हा जेनेटिक आजार असून त्यामुळे अॅनेमिया होतो. हा आजार अनुवंशिक असल्याने काही वेळेस beta thalassemia असलेल्या मुलांची पोषण व वाढ नीट होत नाही. जाणून घ्या: गरोदरपणात होणा-या अॅनिमियाची कारणं,लक्षणं,उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय !

म्हणून, प्रत्येक स्त्री ने लक्षणे दिसताच वेळीच टेस्ट करून योग्य ती मेडिकल ट्रीटमेंट घेणे योग्य ठरेल.

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>