Quantcast
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

कडूलिंब-अनावश्यक गर्भधारणा टाळण्याचा नैसर्गिक उपाय

भारतीय कुटूंबात वाढलेल्या प्रत्येकालाच कडूलिंबाचे महत्व माहित असते.कडूलिंब हे Broad-Spectrum Antimicrobial असून त्यामध्ये असलेल्या जंतूनाशक,बूरशीनाशक व किटकनाशक गुणधर्मांमुळे ही वनस्पती “सर्व रोग निवारण करणारी वनौषधी” म्हणून ओळखण्यात येते.मात्र या पारंपारिक उपचारांसोबत कडूलिंब ही वनस्पती एक उत्तम गर्भनिरोधक देखील आहे.

Chemical spermicide मध्ये असलेल्या Nonoxy nol-9 या घटकामुळे शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात.याचा वापरामुळे गुप्तांगाला खाज,जळजळ व कोरडेपणा येऊ शकतो.तसेच काही केसेसमध्ये यामुळे युरीनरी ट्रॅक इनफेक्शनयोनीमार्गाचे इनफेक्शन होण्याचा धोका निर्माण होतो.त्यामुळे ज्यांना गर्भनिरोधनासाठी Chemical spermicide वापरु नये असे वाटत असेल ते यासाठी कडूलिंबाचा वापर नक्कीच करु शकतात.कारण कडूलिंब गर्भनिरोधक म्हणून वापरणे नेहमीच सुरक्षित असते.तसेच यासाठी अधिक वाचा गर्भनिरोधक गोळ्यांचा ओव्हर डोस घेतल्यास काय होईल ?

कडूलिंब-शुक्राणूनाशक आहे

१९८५ साली झालेल्या एका अभ्यासानूसार कडूलिंबामध्ये शक्तीशाली शूक्राणूनाशक घटक असल्याचे सिद्ध झाले आहे.कडूलिंबाच्या तेलाच्या संपर्कात आल्यास मानवी शूक्राणूंची हालचाल ३० सेंकदांच्या आत पूर्णपणे बंद होते.त्यामुळे गर्भधारणा टाळण्यासाठी कडूलिंबाचे तेल सेक्स करण्यापूर्वी योनीमार्गात लावल्यास चांगला फायदा होऊ शकतो.

वाराणसी येथील Institute of Medical Sciences व Banaras Hindu University च्या प्रसूती तंत्र विभागाच्या प्रोफेसर डॉ.निलम यांच्यामते अनावश्यक गर्भधारणा टाळण्यासाठी कडूलिंबाची पेस्ट व कडूलिंबाचे तेल हे दोन्ही तितकेच प्रभावी असून यासाठी त्याचा वापर योनीमार्गामध्ये करण्यात येतो.तसेच डॉक्टरांच्या मते या गर्भनिरोधकाचा कोणताही दुष्परिणाम होत नसून त्यामुळे इतर प्रकारचे योनीमार्गाचे इनफेक्शन टाळण्यासाठी देखील चांगलाच फायदा होऊ शकतो.अधिक वाचा कडूलिंब – फंगल इंन्फेक्शन दूर करण्याचा नैसर्गिक उपाय !

गर्भनिरोधनासाठी कडूलिंबाचा वापर-

१९९० साली Anti-Fertility Effects of Neem यावर करण्यात आलेल्या एका अभ्यासानूसार कडूलिंबाचा उंदीराच्या मादीवर प्रयोग केला असताना असे आढळले की यामुळे त्या प्राण्यांमधील फर्टीलिटी कमी झाली.त्यामुळे नियमित कडूलिंबाचे तेल वापरुन पाच महिने गर्भधारणा रोखता येऊ शकते.पण याचा परिणाम प्रजननक्रियेवर दीर्घकाळ होऊ शकत नाही.कडूलिंबाच्या तेलाचा उपचार थांबविल्यावर भविष्यात ती महिला कोणत्याही समस्येविना पुन्हा गरोदर होऊ शकते.थोडक्यात कडूलिंबाचे तेल एक स्वस्त,नैसर्गिक व प्रभावी गर्भनिरोधक आहे.तसेच जाणून घ्या कडूलिंब – डास दूर करण्याचा परिणामकारण नैसर्गिक उपाय !

कडूलिंब- पुरुष गर्भनिरोधक

१९८३ मध्ये करण्यात आलेल्या आणखी एका अभ्यासानूसार कडूलिंब तोंडावाटे घेतल्यामुळे देखील चांगला फायदा होऊ शकतो.या अभ्यासाच्या चाचणीसाठी उंदीर,ससा व डुक्कर या प्राण्यांना कडूलिंबाची पाने भरवण्यात आली.या चाचणीनूसार सहा आठवड्यानंतर त्यांच्या प्रजननक्षमतेमध्ये ६६.७ टक्के घट झाली तर यामध्ये नऊ आठवड्यांनी ८० टक्के व ११ आठवड्यांनी यामध्ये १०० टक्के घट झालेली आढळून आली.

ही पद्धत अत्यंत सुरक्षित असून त्यामुळे त्यांच्या शुक्राणूंच्या निर्मितीवर अथवा लैगिंक कार्यक्षमता अथवा लिबीडोमध्ये कोणताही परिणाम आढळून आला नाही.कारण उपचार बंद केल्यावर ४ ते ६ आठवड्यांनी त्यांच्यामधील प्रजननक्षमता पुन्हा पूर्ववत झाल्याचे आढळून आले. मात्र एवढा प्रभावी उपचार असून देखील अनेक लोक गर्भनिरोधनासाठी हा उपचार करत नाहीत.असे असले तरी हे उपचार करण्यापूर्वी आयुर्वेद तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.तसेच वाचा कडूलिंब- मधुमेहावर गुणकारी नैसर्गिक उपाय !

संदर्भ-

1. Sinna, K. C., & Riai, S. S. (1985). Neem oil: an ideal contraceptive. Biological Memoirs, 10(1), 2.
2. Upadhyay, S. N., Kaushic, C., & Talwar, G. P. (1990). Antifertility effects of neem (Azadirachta indica) oil by single intrauterine administration: a novel method for contraception. Proceedings of the Royal Society of London B: Biological Sciences, 242(1305), 175-179.
3. Sadre, N. L. V. Y., Deshpande, K. N., & Mendulkar, D. H. Nandal. 1984. Male antifertility activity of Azadirachta indica A. Juss (neem) in different species, 473-482.

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>