मेष -
या आठवड्यात पचनाच्या विकारापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. श्वसनाच्या विकारांकडे दूर्लक्ष न करता वेळीच उपचार करा. मध्यमवयीन तसेच त्याहून अधिकच्या वयोगटातील लोकांनी फिजिकल अॅक्टिव्हीटी करताना दक्षता पाळावी. अवघड व्यायाम टाळावा. त्याऐवजी योगसाधना करा.
वृषभ -
व्हायरल इंफेक्शनमुळे या आठवड्यांत तुम्ही तापाने आजारी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही दिवस आराम करणे फायदेशीर ठरेल. आरोग्याकडून मिळणार्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. मध्यमवयीन लोकांनी आहाराचे पथ्यपाणी पाळावे. तसेच जीवनशैलीत सकारात्मक बदल करावेत.
मिथून -
या आठवड्यात तुमची पचनशक्ती कमकुवत होण्याची शक्यता आहे. वेळेवर आहार केल्यास तसेच हलका व्यायाम केल्यास या समस्येपासून दूर राहता येईल. मधूमेह किंवा उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी या आठवड्यात विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
कर्क -
पचनाच्या विकाराकडे या आठवड्यात विशेष लक्ष द्यावे. समस्या वेळीच आटोक्यात न आल्यास काही अल्टरनेटीव्ह उपचारपद्धती निवडा. तसेच आहारात फळं, भाज्या आणि ज्युसचा अधिकाधिक समावेश करा. योगसाधना व श्वसनाच्या व्यायामाने आरोग्य जपण्याचा प्रयत्न करावा.
सिंह -
सांधेदुखी, श्वसनाचे विकार असलेल्यांनी या आठवड्यात विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. काही अल्टरनेटीव्ह उपचारांनी त्रास कमी कराण्याचा प्रयत्न करा. तसेच कायमस्वरूपी या समस्यांपासून सुटका मिळवण्याची काही योग्य उपचारपद्धती निवडा. तसेच नियमित व्यायाम करा.
कन्या -
हा आठवडा तुमच्यासाठी आरोग्यदायी राहील. मात्र काही जुनाट आजार असलेल्यांनी त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढवा. त्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घ्या.
तूळ -
या आठवड्यात मध्यमवयीन व त्याहून अधिकच्या वयोगटातील लोकांनी काही जुन्या व्याधींची काळजी घेणे आवश्यक आहे. काही अल्टरनेटीव्ह उपचारांनी त्यावर मात करणे शक्य होईल. कमकुवत पचनशक्तीमुळे त्रास होण्याची शक्यता आहे. काही हलक्या व्यायामांमुळे त्या त्रासातून सुटका मिळवणे शक्य होईल.
वृश्चिक -
तुमच्या राशीतील केतूच्या प्रभावामुळे आरोग्याच्या समस्या वाढण्याची लक्षणं आहेत. त्यावर वेळीच उपचार न केल्यास भविष्यात गंभीर रूप धारण करण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे शरीराच्या कुरबुरींकडे दुर्लक्ष करू नका. काही लक्षणं आढळल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
धनू -
पचनाच्या विकारांवर वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. मधूमेहींनी आहाराचे पथ्य पाळणे आवश्यक आहे. एकूणच आरोग्याकडे दूर्लक्ष करू नका. नियमित व्यायाम आणि जीवनशैलीत बदल अवश्य करावेत.
मकर -
या आठवड्यात सर्दी-पडशाच्या त्रासामुळे तुम्ही आजारी पडण्याची शक्यता अधिक आहे. मात्र काही गंभीर समस्या या आठवड्यात उद्भवणार नाही. मध्यमवयीन व त्याहून अधिकच्या वयोगटातील लोकांनी पोषणयुक्त आहाराकडे अधिक लक्ष द्यावे. रात्रीच्यावेळी मसालेदार पदार्थ खाणे टाळा.
कुंभ -
या आठवड्यात आरोग्याबाबत चढ-उतार होण्याची शक्यता असल्याने विशेष काळजी घ्या. आजारपणामुळे दीर्घकाळ कमकुवतपणा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे लहानसहान आजारांकडेही दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करा.
मीन -
बिघडलेली पचनशक्ती तुम्हांला या आठवड्यात त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. श्वसनाच्या विकारांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करा. मध्यम व त्याहून अधिकच्या वयोगटातील लोकांनी आरोग्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचे आहे. जंकफूड खाणे टाळा तसेच जीवनशैलीत सकारात्मक बदल करा.
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
Translated By - Dipali Nevarekar
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.