हवामानात बदल झाला की आजारपणं वाढतातच ! लहान मुलांना, नवजात बाळांना तर याचा धोका अधिक असतो. ताप, सर्दी, खोकला यांचा लहान मुलांना पटकन त्रास होतो. तापामध्ये लहान मुलं तर अधिकच कोमेजून जातात. चिडचिड करतात, त्यांची भूक मंदावते, जीभेवर चव राहत नाही, डीहायड्रेशनचा त्रास वाढतो. यामुळे आजरपणात मुलं कमजोर होतात परिणामी पालकांची काळजीदेखील वाढते. पावसाळ्यातील आजारपणांंपासून दूर राहण्यासाठी खास टीप्स
लहान मुलांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, प्रत्येक ताप गंभीर असतोच असे नाही. लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे इंफेक्शन झाल्यानंतर ताप येतो. 100 डिग्री फ़ॅरॅनाईट किंवा त्यापेक्षा अधिक ताप असेल तर मुलांना डॉक्टरांच्या सल्ल्याने पॅरॅसिटॅमोल देणं सुरक्षित आहे. पण लहान मुलांप्रमाणेच या ’5′दुष्परिणामांपासून बचावण्यासाठी पॅरॅसिटॅमोल डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका
घरच्या घरी तापावर उपचार कसे कराल ?
लहान मुलांना ताप आल्यानंतर प्रथम त्यांच्या डोक्यावर थंड पाण्याचा घड्या ठेवा. कोमट पाण्याने त्यांच अंग पुसा. यानंतरही त्यांचं अंग गरम असेल तर पॅरॅसिटॅमोलचे ड्रॉप्स द्या किंवा सिरप द्या. तुम्ही देत असलेल्या पॅरॅसिटॅमोलच्या ड्रॉप किंवा सिरपची मात्रा काय आहे ? हे पाहूनच त्याच प्रमाण ठरवा. सामान्यपणे औषधं दोन प्रकारच्या मात्रांमध्ये येतात. 120mg/5mL आणि 250mg/5mL . म्हणजेच ही औषधं 2mL आणि 5mL या प्रमाणात द्यावीत. एका दिवसात तुमच्या मुलांना पॅरॅसिटॅमोलचे ड्रॉप्स किंवा गोळ्या चार वेळेस देऊ शकता. ताप आल्यानंतर कधी घ्यावा डॉक्टरांचा सल्ला ?
लहान मुलांना तापामध्ये पॅरॅसिटॅमोलच्या गोळ्या देण्यापूर्वी या गोष्टींचे भान ठेवा :
तापाशी सामना करताना पॅरॅसिटॅमोल फायदेशीर आहे. पण त्यापूर्वी या काही गोष्टींचा विचार नक्की करा.
- पॅरॅसिटॅमोलच्या गोळ्या म्हणजे wonder drug नाही. व्हायरल इंफेक्शनमुळे ताप येत असल्यास तो 3-5 दिवस राहतो. म्हणजेच व्हायरसच्या धोक्यातून बाहेर पडण्यासाठी आवश्यक इम्युनिटी निर्माण झाली की त्रास कमी होतो. ताप पुन्हा उलटल्यास डोस वाढवू नका. यामुळे ताप लगेजच जाणार नाही. पॅरॅसिटॅमोलचा डोस वाढवल्यास मुलांना त्रास अधिक होतो.
- लहान बाळाला ताप आल्यास कोणतेही औषध देण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. 3 महिन्यांपेक्षा लहान असलेल्या बाळांसाठी स्वतःच्या मनाने कोणतेही औषध देणं त्रासदायकच आहे.viral fever चा ताप किती दिवसात ठीक होतो ?
- औषध देण्यापूर्वी पुरेशी काळजी घ्या. कोणतेही ओरल ड्रग देण्यापूर्वी ताप तपासून पहा. ताप 100 degrees F पेक्षा कमी असेल आणि बाळाचं अंग गरम वाटत असेल तर पॅरॅसिटॅमोल टाळा.
- तुमच्या मुलांना इतर कोणत्या गोळ्या, औषध चालू असतील तर पहा. कारण त्यामध्येही पॅरॅसिटॅमोल असू शकते. बाळाला ओव्हर डोस होणंदेखील त्रासदायक ठरू शकतं.
- बाळाच्या वजनानुसार, पॅरॅसिटॅमोलचा डोस ठरवा.म्हणूनच औषध देण्यापूर्वी डोसचे प्रमाण डॉक्टरांच्या सल्ल्याने ठरवा. 5 किलोपेक्षा वजन कमी असेल तर पॅरॅसिटॅमोलच्या गोळ्या देणं टाळा.
- इम्युनायझेशन नंतर लगेजच पॅरॅसिटॅमोल देणं टाळा. इंजेक्शननंतर ताप आला तरीही तो हळूहळू कमी होईल.
- पॅरॅसिटॅमोल केवळ तापावर वापरली जात नाही तर वेदना कमी करण्यासाठीदेखील त्याचा वापर केला जातो. म्हणूनच तुमचं बाळ चिडचिड करत नसेल तर त्याला पॅरॅसिटॅमोल टाळली तरी चालू शकते. तापातून बाहेर पडण्याचे ’9′ घरगुती उपाय !
- पॅरॅसिटॅमोल देऊनही 3 नंतर ताप टिकल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या. ताप वाढण्यामागील ही ’10′ कारणं तुम्हांला ठाऊक आहेत का ?
Read this in English Translated By – Dipali Nevarekar छायाचित्र सौजन्य – Shutterstock