Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

World Population Day 2017: या ’6′हटके मार्गाने वाढत्या लोकसंख्येवर आळा बसेल !

$
0
0

विकसनशील भारत देशासमोर वाढती लोकसंख्या हे प्रचंड मोठं आव्हान आहे. वाढत्या लोकसंख्येला आटोक्यात ठेवण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. मात्र अजूनही ‘फॅमिली प्लॅनिंग’ बाबत सजगतेने विचार केला जात नाही. केवळ मुलाच्या हट्टापायी अनेक स्त्रिया आजही 3-4 वेळेस ‘चान्स’ घेतात. म्हणूनच या वाढत्या लोकसंख्येला आटोक्यात आणण्यासाठी या हटक्या मार्गांचा विचार नक्की करून पहा…

  •   पार्ट्या,पब टाळा -

दिवसभर काम करून किंवा विकेंडला पार्टी करणं टाळा. कारण तुम्हांला अशा ठिकाणी साथीदार मिळण्याची शक्यता आहे. मग प्रेम, लग्न, सेक्स आणि मुलं.. हे सगळं आलंच ! बघा जर तुम्ही आपलं काम बरं आणि घर बरं हा स्वभाव ठेवला तर पुढील सारंच टाळता येतील.

  •  गबाळ्यासारखे रहा -

तुमच्या साथीदाराला इम्प्रेस करण्यासाठी तुम्ही चांगले कपडे घालत असाल, त्याला घायाळ करण्यासाठी तुमच्या लुक्समध्ये बदल करत असाल, मेकअप करत असाल पण यामुळेच तुम्ही साथीदाराला तुमच्या जवळ आणता आणि मग पुढे नको व्हायला हवे तेच होतं… हे टाळण्यासाठी गबाळ्यासारखे रहा. म्हणजे त्याचा तुमच्यातील रस कमी होईल.

  •  साधू किंवा साध्वी व्हा -

संन्सास घ्या आणि या मोह-माया असलेल्या जगापासून दूर व्हा. म्हणजे मुला-बाळांचा प्रश्न येणारच नाही. तुम्ही फक्त तुमचं आयुष्य आनंदाने, समाधानाने जगा.

  •  मुलांचा शिक्षणाचा खर्च बघा -

आजकाल मुलांना जन्म घालणं आणि त्यांना सुरक्षित जग, सार्‍या सोयीसुविधा देणंदेखील तितकंच महत्त्वाचं आहे.पण वाढती महागाई आणि सारीकडे वाढणारी स्पर्धा पाहता पालकांनी आर्थिकदृष्टा सबळ झाल्यावरच बाळाचा विचार करा.पण आज कितीजण हा विचार करून बाळाला जन्म देतात ?

  •  मुलांचा गडबड गोंधळ आणि रडारड बघा म्हणजे आपोआपच तुम्ही विचार कराल .. खरंच मुलांना सांभाळण्याइतका वेळ आणि संयम आपल्याकडे आहे का ? आजकालची मुलं फारच ‘फ़ॉरवर्ड’ असल्याने  हा जनरेशन गॅप भरण्याची क्षमता आहे का ? हे तपासून पहा.
  •  घर, काम यासोबत मुलं सांभाळताना होणारी तारेवरची कसरत तुम्ही करू शकता का? दिवसभर काम केल्यानंतर रात्री वेळी अवेळी मुलांची आजरपणं सांभाळणं, त्यांची डायपर बदलणं, तुमचं  करियर  पिकवर असताना बाळंपणासाठी तुम्हांला तुमच्या प्रमोशनवर पाणी सोडणं तुम्हांला जमणार का ?

हे सगळं वाचून तुम्हांला कळालच असेल की  आम्ही मस्करी करतोय !! पण वाढत्या लोकसंख्येची समस्या खरंच विचार करण्याची गोष्ट आहे.लोकसंख्येच्या बाबतीत चीन देशापाठोपाठ भारताचा क्रमांक लागतो. वेळीच आपण लोकसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी प्रयत्न न केल्यास यातून अनेक समस्या वाढणार आहेत. म्हणूनच यापुढे वाढती लोकसंख्या हा विषय थट्टेचा किंवा दुर्लक्षित करू नका. त्याबद्दल सजगतेने प्रत्येकाने विचार करा आणि त्यानुसार तुमच्या भविष्याचा विचार करा.

Read this in English Translated By – Dipali Nevarekar छायाचित्र सौजन्य – Shutterstock

 

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>