टीनएजर्स मुलांवर पालकांनी नियंत्रण ठेवण्याचा काळ आता कधीच बदलला आहे.आजकाल टीन एज मुलांचे विचार व भावना पुढारलेल्या असतात.सहाजिकच भावनांचा विचार करताना प्रेम या विषयाकडे टाळून चालणार नाही.कारण आजकाल अनेक टीनएज वयातील मुले सहज प्रेमात पडतात.
मुंबईच्या होलस्टिक हेल्थ विथ डॉ.भावी च्या डॉ. भावी मोदी यांच्यामते ब-याचदा आपण अनेक टीनएज वयातील प्रेमाचे रुपांतर भविष्यात सुखी वैवाहिक जीवनात झालेले पहातो पण कधीकधी अशा वयात जुळलेली प्रेम प्रकरणे जितक्या लवकर जुळतात तितक्याच लवकर तुटताना देखील पहायला मिळतात.त्यामुळे किशोरवयीन मुलांच्या पालकांनी मुलांच्या अशा रिलेशनशिप बाबत सतत जागरुक असावे व जेव्हा त्यांच्यासोबत असे काही चुकीचे घडते तेव्हा त्यांना सावरण्यास देखील सक्षम असावे.खरेतर किशोरवयीन मुले व पालकांच्या नात्यामध्ये पारदर्शकता असणे फार गरजेचे आहे.युवांना प्रेम प्रकरणांचे चुकीचे परिणाम माहित नसले तरी आपण त्यांना प्रेम करण्यापासून रोखू शकत नाही.त्यामुळे ब-याचदा चुकीच्या रिलेशनशिपमधून त्यांना ब्रेक-अपला सामोेरे जावे लागते.त्यामुळे अशा परिस्थितीत एक पालक म्हणून आपण आपल्या मुलांच्या आयुष्याची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.टीनएज मुलांमधील नैराश्याचे संकेत देतात ही ’8′ लक्षणं.यासाठी डॉ.मोदींनी दिलेल्या या टीप्स जरुर वाचा.
१.त्यांना दोष देत बसू नका-
कदाचित तुमच्या टीनएज मुलाचे ब्रेकअप झाल्यामुळे त्याचे अफेअर होते हे समजल्यावर तुम्हाला राग येण्याची शक्यता असते.जर तुम्हाला हे आधी माहित झाले असते तरी देखील त्यांच्यासाठी असलेल्या तुमच्या भावना त्याच राहिल्या असत्या.काहीही असले तरी प्रथम तुमच्या मुलाला एक घट्ट मिठी मारा.ज्यामुळे त्याला पुन्हा आधार मिळेल.त्याला दोष देण्यापेक्षा तुम्ही त्याच्यासोबत आहात हे त्याला सांगा व आधार देऊन अथवा त्याला रडून मन मोकळे करण्यास मदत करा.यासाठी या ’10′ कारणांमुळे घ्यावा लागतो ‘ब्रेकअप’चा निर्णय !!हे जरुर वाचा.
२.उगाचाच खोट्या अपेक्षा दाखवू नका.
कधीकधी अशा परिस्थितीत भारतीय पालक त्यांच्या मुलांना जगावेगळ्या अपेक्षा दाखवतात.पालक अशा वेळी मुलांना सांगतात की “कदाचित तुला तिच्या पेक्षा आणखी कोणीतरी चांगली मिळेल” किंवा “तु तिच्या पेक्षा जास्त चांगला आहेस”.या गोष्टी खोट्या नसल्या तरी ख-या देखील नक्कीच नसतात.अशा वेळी खोट्या आशा दाखविल्यामुळे मुले भविष्याबद्दल अवास्तव अपेक्षा करु लागतात.डॉ.मोदी यांच्यामते त्यापेक्षा त्यांना सत्य स्विकारण्यास सांगून रडून मन मोकळे करु द्या.त्यांच्यासोबत त्यांच्या वयानुसार मोकळा संवाद साधून त्यांना या परिस्थितीतून बाहेर काढण्यास मदत करा.ज्यामुळे ही परिस्थिती आपोआप सुधारेल.
३.विचारपूर्वक संवाद साधा.
जेव्हा तुम्ही तुमच्या प्रेमात दुखावलेल्या मुलांना सावरत असता तेव्हा तुम्ही एक पालक आहात हे मुळीच विसरु नका.प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्यासोबत संवाद साधताना विचारपूर्वक बोला.तुमच्या मुलाला तुमच्या कडून काय ऐकायचे आहे त्यापेक्षा त्याच्यासाठी काय चांगले आहे हे फार महत्वाचे आहे.
डॉ.मोदी यांच्यामते मुलांना अशा नाजूक परिस्थितीत कधीकधी कठीण असले तरी सत्य परिस्थिती सांगणे गरजेचे असते.जसे की नाते हे दोन्ही बाजूने टिकवावे लागते पण जर एखाद्याला ते तोडायचे असेल तर त्याच्या या निर्णयाला तुम्ही नाकारु शकत नाही.तसेच तुम्ही त्यांना हे सांगायला हवे की एक पालक म्हणून जरी तुम्हाला हे सर्व मान्य नसले तरी तुम्ही त्याची मदत करण्यास सदैव तयार असाल.लक्षात ठेवा मदत करणे व सहमत असणे या दोन निरनिराळ्या गोष्टी आहेत एक पालक म्हणून जरी तुम्ही त्यांना ब्रेकअप मधून सावरण्यास मदत करीत असलात तरी याचा अर्थ तुम्ही त्यांच्या चुकीच्या गोष्टींमध्ये सहभागी आहात असा होत नाही.
४.तुमचा आधार त्याला सदैव असेल याची खात्री द्या.
जरी मुलांनी निवडलेला मार्ग तुम्हाला आवडला नसला तरी त्यांना आधार द्या या सल्ल्याचे तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटत असेल तर लक्षात ठेवा जरी तुम्हाला त्याचा हा निर्णय आवडला नसला तरी ब्रेकअप नंतर तुमच्या मुलाला तुमची अधिक गरज असते.त्यामुळे सतत तुमच्या मुलावर लक्ष ठेवा ज्यामुळे तो स्वत:ला कोणताही त्रास करुन घेणार नाही.यासाठी कशी ओळखाल मुलांच्या मनातील आत्महत्येची लक्षणं ?जरुर वाचा.
५.मुलांना जीवनात काही गोष्टी सोडून देण्याची कला शिकवा.
तुमच्या मुलांनी भविष्यात काय करावे याचे पर्याय सूचवा पण त्यांच्यावर तुमचा निर्णय लादू नका.जसे की करीयर,छंद किंवा एखादे व्हेकेशन अथवा एखादी थेरपी जी त्याक्षणी गरजेची असेल असे पर्याय त्यांना सूचवा.डॉ.मोदी यांच्यामते तुम्हाला आवडत असेल किंवा नसेल तरी तुमच्या मुलांना ब्रेकअप नंतर त्यांचा योग्य निर्णय स्वत:च घेऊ द्या.पण तुमच्या मुलांना हे अवश्य सांगा की त्याचा निर्णय योग्य असो अथवा नसो एक पालक म्हणून गरज असल्यास तुम्ही त्यांच्या मदतीसाठी नेहमीच असाल.ब्रेकअप नंतर सावरणे मुलांसाठी फार कठीण असते पण या काळात देखील तुम्ही त्यांच्यासाठी एक चांगले मार्गदर्शक ठरु शकता ज्यामुळे भविष्यात तुमची मुले नक्कीच यशस्वी होतील.तसेच जाणून घ्या का नैराश्याने ग्रस्त असलेल्या लोकांबद्दल आपण संवेदनशील असायला हवे.
Read this in English
Translated By –Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock