Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Sinusitis ची समस्या नियंत्रित ठेवण्यासाठी खास एक्सपर्ट टीप्स !

$
0
0

ब-याचदा Sinusitis ही समस्या व्हायरल इनफेक्शन मधून निर्माण होते.जर दोन ते तीन आठवड्यांमध्ये व्हायरल इनफेक्शन बरे नाही झाले तर त्या रुग्णाला तीव्र Sinusitis ची समस्या असू शकते.Lybrate च्या ENT Specialist डॉ.बुलबुल गुप्ता यांच्यामते जेव्हा Sinusitis समस्येवर उपचार करणे कठीण झाल्यास ही समस्या बरी होण्यास काही महिन्यांचा कालावधी लागू शकतो.यासाठी जाणून घ्या आलं व मध – ‘सायनस’वर गुणकारी घरगुती उपाय !

डॉक्टरांच्या मते Sinusitis समस्येवर खालील उपचार करण्यात येतात-

ओव्हर-दी-काउंटर पेनकिलर्सच्या माध्यमातून उपचार-ओव्हर-दी-काउंटर पेनकिलर्समुळे Sinusitis समस्येमध्ये होणारा दाह व वेदना काही प्रमाणात कमी करता येतात.मात्र ही औषधे घेण्यापूर्वी त्यांचे संभाव्य साईड इफेक्टस व इनरअॅक्शन विषयी जरुर जाणून घ्या.

ओव्हर-दी-काउंटर decongestant nasal sprays किंवा ड्रॉप्स वापरणे-ओव्हर-दी-काउंटर Decongestant nasal sprays किंवा ड्रॉप्स वापरल्यामुळे नाक चोंदणे या समस्येमध्ये आराम मिळू शकतो.मात्र हे स्प्रे अथवा ड्रॉप्स वैद्यकीय तज्ञांच्या सल्लानूसारच घ्यावेत.कारण ओव्हर-दी-काउंटर Decongestant nasal sprays किंवा ड्रॉप्सच्या अति प्रमाणामुळे Rhinitis medicamentosa ही समस्या निर्माण होऊ शकते.यासाठी जाणून घ्या प्रिस्क्रिप्शनशिवाय वेदनाशामक औषधे खरेदी करणे सुरक्षित आहे का ?

Nasal sprays मध्ये केमिकल्सचा वापर करण्यात आलेला असतो ज्यामुळे रक्तवाहिन्या संकुचित होतात.त्यामुळे चोंदलेले नाक मोकळे होते.जर एखाद्याने या स्प्रेचा नाकामध्ये थेट वापर केला तर त्याला त्वरीत आराम मिळतो.मात्र असे असले तरी काही दिवसांमध्ये या उपचारांचा रक्तवाहिन्यांवर होणारा परिणाम कमी होतो व नाक चोंदण्याची समस्या पुन्हा निर्माण होते.हे चक्र काही महिने अथवा वर्षे तसेच सुरु रहाते.

चेहरा कोमट पॅकने शेकवणे-गरम पाण्याचे वाफारे घेणे अथवा उबदार पॅकने चेहरा शेकवण्याचा चांगला फायदा होऊ शकतो.गरम पाण्याचे वाफारे हा या समस्येवर प्रभावी उपचार करणारा एक उत्तम घरगुती उपाय आहे.या उपायामुळे शरीरातील तापमान वाढून रक्तवाहिन्या मोकळ्या होतात व रक्तप्रवाह सुधारतो त्यामुळे लगेच आराम मिळतो.सर्दी,डोकेदुखी व मायग्रेनच्या समस्येमध्ये रक्तप्रवाह सुधारणे फायदेशीर ठरते.शरीरातील तापमान वाढल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती देखील उत्तेजित होते.तसेच यासाठी जाणून घ्या कशी वाढवाल तुमची रोगप्रतिकारशक्ती ?

Corticosteroid ड्रॉप्स किंवा स्प्रे वापरणे-तीव्र Sinusitis या समस्येवर Corticosteroid ड्रॉप्स किंवा स्प्रे वापरणे फायदेशीर ठरते.कारण त्यामुळे या समस्येमध्ये होणारी अॅलर्जी व दाह कमी होतो.मात्र हे स्प्रे अथवा ड्रॉप्स स्वत:च्या मनाने घेण्यापेक्षा वैद्यकीय तज्ञांच्या सल्लानूसारच घ्यावेत.तसेच हे स्प्रे अथवा ड्रॉप्स Infective Sinusitis मध्ये घेऊ नयेत.

कधीकधी या समस्येवर उपचार करण्यासाठी Functional endoscopic sinus surgery (FESS) करण्यात येते-रुग्णाची स्थिती व विकाराची गंभीरता पाहून कधीकधी लोकल अथवा जनरल अॅनेस्थेशिया देऊन FESS हे उपचार करण्यात येतात.यामुळे सायनस पोकळी मोकळी होण्यास व विकाराची तीव्रता कमी करण्यास मदत होते.कधीकधी नाकामध्ये वाढलेले लहान हाड काढून या समस्येमध्ये सुधारणा करण्यात येते.

Nasal spray ची सायनस रुग्णांना सवय लागू शकते-

Nasal spray च्या अतिवापरामुळे सायनसची समस्या वाढण्याचा धोका अधिक असतो.काही लोकांना या स्प्रेची सवय लागल्यामुळे त्याच्या अतिवापर होण्याची शक्यता अधिक असते.कारण जर एखाद्या रुग्णांना तीन ते चार दिवस सतत या स्प्रेचा सतत वापर केला तर त्यामुळे नाकपुड्यांच्या आतील अस्तराला सूज येते.त्यामुळे सर्दी किंवा Sinusitis किंवा अॅलर्जीला प्रतिकार करणे रुग्णाला शक्य होत नाही.Nasal spray सोबत अॅन्टीबायोटीक्स न घेतल्यास त्यामुळे होणारे इनफेक्शन भयंकर असू शकते.यासाठीच Nasal spray चा वापर फक्त वैद्यकीय तज्ञांच्या सल्लानूसारच घ्यावा असा सल्ला देण्यात येतो.तसेच नाकामध्ये येणारे वेदनादायक फोड धोकादायक असतात का? हे देखील नक्की वाचा.

Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock   


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>