Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

तल्लख बुद्धिमत्तेसाठी कडीपत्ता फायदेशीर !

$
0
0

डाळी-आमटी, भाजीतील कडीपत्ता सगळ्यांच आवडतो असे नाही. काही लोक अगदी आमटी-भाजीतील कडीपत्ता शोधून खातात. तर काही तो दिसताच बाजूला काढतात. परंतु, कडीपत्ताचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. विशेषतः समरणशक्ती वाढण्यासाठी याचा फायदा होतो. या ’10′ आरोग्यदायी कारणांसाठी जेवणातला कढीपत्ता बाजूला काढू नका !

कडीपत्त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आपल्याला माहित असतील. परंतु, कडीपत्त्यामध्ये बुद्धी वाढवण्याचे गुणधर्म असतात, हे अनेकांना माहित नाही. Phytotherapy Research मार्च २००९ च्या अहवालानुसार उंदरांवर करण्यात आलेल्या प्रयोगातून हे गुणधर्म सिद्ध झाले आहेत. संशोधकांनी उंदरांना scopolamine आणि diazepam हे औषध दिले. जे स्मृतीभ्रंशाचे औषध आहे. त्यानंतर त्यांना २%, ४% आणि ८% कडीपत्ता असलेले डाएट ३० दिवसांसाठी दिले. उंदराच्या मेंदूच्या अॅक्टिव्हिटीमध्ये काय फरक पडतो, हा या प्रयोगाचा उद्देश होता. या ‘४’ पद्धतीने अपुऱ्या झोपेचा मेंदूवर परिणाम होतो !

अभ्यासाअंती असे दिसून आले की, कडिपत्त्याच्या सेवनामुळे स्मृतीभ्रंश कमी होवून उंदराच्या स्मरणशक्तीत सुधारणा दिसून आली. आहारामुळे उंदरांची brain cholinesterase activity आणि कोलेस्ट्रॉल कमी झाले. संशोधकांचे असे म्हणणे आहे की, हा कडीपत्त्याच्या pro-cholinergic activity आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे गुणधर्म याचा परिणाम आहे. भविष्यात मेंदूच्या आजारांवर कडीपत्ता फायदेशीर ठरतो असे निदान होईल. अल्झायमर आणि डिमेन्शिया या आजारांवर देखील कडीपत्ता उपयुक्त ठरेल. कढीपत्त्याची पानं आहारात मिसळून दूर करा पचनाचे विकार !

भाजी-आमटीतील कडीपत्ता आवडत नसेल तर तुम्ही कडीपत्त्याचा चहा देखील बनवू शकता. मग सकाळी चहा-कॉफी ऐवजी तुम्ही कडीपत्त्याचा चहा घेऊ शकता. त्याचा मेंदूला अधिक फायदा होईल. मग जाणून घेऊया कडीपत्त्याचा चहा कसा बनवायचा ते. निरोगी यकृतासाठी प्या कढीपत्त्याचा रस

साहित्य:

  • कडीपत्त्याची काही पाने
  • २ कप पाणी
  • छोटा गुळाचा खडा
  • चिमूटभर जिरं
  • छोटा आल्याचा तुकडा
  • चिमूटभर काळ मीठ

चहा बनवण्याची पद्धत:

. तव्यावर जिरं भाजून त्याची बारीक पावडर करा.

. एक भांड्यात २ कप पाणी घेऊन त्यात कडीपत्त्याची पाने  आणि आल्याचा तुकडा घालून उकळवा.

. त्यात गुळाचा खडा घाला.

. पाणी नीट उकळ्यानंतर गॅस बंद करा.

. कपात ओता.

. त्यात काळ मीठ घाला.

. थोडी जिरं पावडर घाला.

. आणि गरमागरम चहा घ्या.

References:

Vasudevan M, Parle M. Antiamnesic potential of Murraya koenigii leaves. Phytother Res. 2009 Mar;23(3):308-16. doi: 10.1002/ptr.2620. PubMed PMID:
18844259.

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>