Quantcast
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Marital rape ची कारणं आणि त्याचे परिणाम !

भारतीय परंपरेनूसार लग्नव्यवस्था हे एक पवित्र बंधन असून त्यामध्ये दोन व्यक्ती धर्म,अर्थ,काम व मोक्षप्राप्तीसाठी एकत्र येतात.लग्नानंतर पती व पत्नीने एकमेकांसोबत प्रामाणिक असणे फार महत्वाचे अाहे.मात्र पाश्चिमात्यांच्या तुलनेत भारतात घटस्फोटाचे प्रमाण कमी असताना लग्नव्यवस्थेमध्ये प्रामाणिकपणा दिसून येतो का?आपल्या धर्मपत्नीवर अत्याचार करणे हा अन्याय नाही का? एवढंच नाही तर आपल्या देशातील कायदा देखील वैवाहिक बलात्कार हा इतर बलात्कारांइतका भयानक नाही याच्याशी सहमत आहे.भारतीय दंड संहितेच्या कलम ३७५ नूसार बलात्कार करणा-याचा प्रयत्न करणा-या व्यक्तीसाठी दंडाचे नियम नमूद केलेले असले.तरी दुर्देवाची गोष्ट अशी की त्यामध्ये स्वत:च्या जोडीदाराकडून होणा-या अत्याचाराला बळी पडल्यास कोणतेही संरक्षण मिळू शकत नाही.

अगदी इतिहास काळापासून आपल्या समाजात वैवाहिक बलात्काराची संकल्पना समजून घेणे फार अवघड असल्याचे आढळून आले आहे.निराशाजनक गोष्ट म्हणजे याबाबत “लग्नानंतर असणारे सेक्शुअल संबध बलात्कार कसे असू शकतात?” असा प्रश्न केला जातो.खरंतर समाजामध्ये बलात्कार ही गोष्ट शरमेची समजली जाते व  बलात्कार झालेल्या स्त्रीसोबत लग्न करण्यासाठी देखील कोणीही तयार होत नाही.त्यात जर त्या स्त्रीचे अत्याचारी पुरुषासोबतच लग्न झालेले असेल तर समाजाकडून त्या पुरुषाला त्या स्त्रीचा आदर न राखता तिच्यावर अत्याचार करण्याची परवानगीच मिळते.आपण या लेखातून अशा सेक्शुअल गुन्हाची कारणे परिणाम व त्यातील धोके समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.तसेच वाचा सोशल मीडिया वर स्त्रीची होणारी अवहेलना कधी थांबणार ?

वैवाहिक बलात्काराची (Marital rape कारणे-

वर्चस्व-

Vandrevala Foundation चे सायक्रायटीस्ट डॉ.अरुण जॉन यांच्यामते जेव्हा पती व पत्नीमधील वाद वाढतात तेव्हा पती तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न करतो.आणि एकदा असे केल्यावर प्रत्येकवेळी स्वत:चे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी या गोष्टीचा शस्त्रासारखा वापर केला जातो.यातून पुरुष स्वत:चे वर्चस्व व स्त्रीला दाबून ठेवणे प्रदर्शित करीत असतो.

वैवाहिक बलात्कार ही एक विकृत गोष्ट असून ब-याचदा ती स्त्रीला अपमानित करण्यासाठी किंवा तिच्यावर वर्चत्व गाजविण्यासाठी केली जाते.यातून पुरुष स्त्रीला तो तिच्यापेक्षा शक्तीशाली असून तिला त्याच्या दयेवर जगावे लागेल हे दाखवत असतो.

जोडप्यांचे वैवाहिक सेक्शुअल संबध-

कधीकधी पत्नी सेक्शची ईच्छा नसल्याने पतीला सेक्स संबधासाठी नकार देते.पण पुरुषांमध्ये स्त्रीपेक्षा सेक्सची ईच्छा अधिक तीव्र असते.त्यामुळे पत्नीने सेक्ससाठी नकार देणे याकडे पुरुष अपमानाच्या दृष्टीने पहातात.

Dr Happy Life Counselling च्या लाईफ कोच Manisha Lomash यांच्या मते निर्सगत: महिलांची शरीर रचना ही सेक्शुअल क्रिया घेण्यासाठी व पुरुषांची सेक्शुअल क्रिया देण्यासाठी करण्यात आली आहे.जेव्हा एखादी स्त्री आपल्या पतीसोबत सेक्स करण्यास नकार देते तेव्हा त्यामागे तिच्या तरुणपणीचा सेक्शुअल अत्याचाराचा इतिहास असू शकतो किंवा ती सेक्शुअल क्रियेकडे ती सकारात्मक दृष्टीने अथवा आनंद मिळवण्याच्या दृष्टीने पहात नाही हा असू शकतो.त्यामुळे कदाचित ती ही गोष्ट तिच्या पतीच्या अपेक्षेप्रमाणे घेऊ शकत नाही व अशावेळी सेक्ससाठी पत्नीने दिलेला नकार पती पचवू शकत नाही.या कारणांमुळे पति व पत्नीमधील सेक्शुअल संबध बिघडतात व पती पत्नीवर या अपमानाचा बदला घेण्यासाठी बळजबरी करु लागतो.

वैवाहिक बलात्काराचे प्रकार-

Non-physical sexual coercion-या प्रकारमध्ये पुरुष स्त्रीवर शारीरिक बळजबरी न करता सेक्स साठी इतर माध्यमातून तिच्यावर अन्याय करु लागतो.२००२ मधील एका अभ्यासानूसार ३० टक्के महिला आपल्या पतीसोबत सेक्स करतात कारण ते तिच्यासाठी खर्च करतात असे आढळून आले आहे.याच अभ्यासात असेही आढळले आहे की या महिलांना सेक्स दरम्यान भिती व अपमान वाटत असते.काही अभ्यासात असे आढळले आहे की स्त्रीया त्याच्या पतीसोबत सेक्स करतात कारण त्यांना भविष्यातील गंभीर परिणामांची भिती वाटत असते.

Threatened or forced sex-या प्रकारामध्ये पती पत्नीला घाबरवून तिच्या सोबत सेक्शुअल सबंध ठेवतात.यासाठी त्यांना भविष्यातील गंभीर परिणामांची भिती दाखवून जबरदस्ती करण्यात येते.

Battering rape-१९८५ मध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासानूसार हा एक वैवाहिक बलात्काराचा सामान्य प्रकार आहे.या प्रकारातून ४८ टक्के वैवाहिक बलात्कार करण्यात येतात.एका अभ्यासानूसार हे बलात्कार पत्नीने केलेल्या अपमानाचा सूड घेण्यासाठी शत्रूत्वाच्या भावनेतून करण्यात आलेले असतात.अनेक वैवाहिक महिलांना शाब्दिक व शारीरिक अन्यायासह या बलात्काराला सामोरे जावे लागते.

Force only rape-या प्रकारामध्ये पुरुष आपल्या पत्नीच्या इच्छेविरुद्ध सेक्स मिळवण्यासाठी शारीरिक बळजबरी करतो.

Obsessive rape-हा बलात्कार फार कमी प्रमाणात घडला जात असून वैवाहिक बलात्कारामध्ये याचे प्रमाण ६ टक्के इतके आढळते.या प्रकारामध्ये पती आपल्या पत्नीकडून पॉर्न अथवा इतर अनसेक्शुअल क्रियांची मागणी करतात.असे पुरुष विकृत असून ते त्याच्या पत्नीला या माध्यमातून त्रास देतात.

वैवाहिक बलात्कार करणारे अपराधी कोण असतात?

कमी आत्मसन्मान असलेले पुरुष-डॉ.जॉन यांच्यामते ज्या पुरुषांना आत्मसन्मानाची वागणूक मिळत नाही ते वैवाहिक बलात्कार करतात.कारण जे पुरुष आत्मसन्मानी असतात ते यासाठी त्याच्या पत्नीवर सक्ती करीत नाहीत तसेच तिच्या इच्छेचा सन्मान करतात व तिला आदराची वागणूक देतात.Manisha Lomash यांच्यामते देखील वैवाहिक बलात्कार करणा-या लोकांना कमी आत्मसन्मान व स्वत: बद्दल द्वेषाची भावना सहन होत नाही व त्यामुळे यातून आपल्या पत्नीवर वर्चस्व गाजवण्याचा ते प्रयत्न करतात.

बेरोजगार पुरुष-२००२ च्या अभ्यासात असे आढळले आहे की वैवाहिक बलात्कार हे बरोजगार पुरुष अधिक प्रमाणात करतात.बेरोजगारीमुळे त्यांच्यामधील आत्मसन्मान कमी होतो व त्यातून ते आपल्या पत्नीवर हा अत्याचार करतात.

घरातील विकृत वातावरणाचा प्रभाव असणारे पुरुष-जर एखाद्याच्या घरामध्ये असे वातावरण असेल म्हणजेच त्या पुरुषाच्या वडीलांचे त्यांच्या आईसोबत असे संबध असतील तर या गोष्टीचा प्रभाव पडल्याने तो देखील त्याच्या पत्नीसोबत असेच वागण्याची शक्यता अधिक असते.

Hypermasculinity-Hypermasculine वृत्तीची माणसे वैवाहिक बलात्काराचे अपराधी असू शकतात.१९९० च्या अभ्यासानूसार अशा केसेसमध्ये या लोकांचे प्रमाण अधिक आढळले आहे.

वैवाहिक बलात्कारचे बळी कोण ठरतात?

अशा प्रकरणांमध्ये आक्रमक स्वभावाचे पती दोषी असले तरी काही प्रमाणात महिला देखील यासाठी कारणीभूत असू शकतात.कारण अनेक प्रकरणांमध्ये बळी पडलेल्या महिला भूतकाळामध्ये लैगिंक छळाला बळी पडलेल्या असतात ज्यामुळे लग्नानंतर त्यांची सेक्स करण्याची इच्छा नसते.काही अभ्यासानूसार वृद्ध विवाहित महिला पेक्षा तरुण विवाहित महिला वैवाहिक बलात्काराला अधिक प्रमाणात बळी पडल्याचे आढळून आले आहे.घटस्फोटीत महिलांना देखील त्यांच्या भूतकाळातील पतीकडून त्रास होण्याचा धोका असतो.

वैवाहिक बलात्काराचे दीर्घकालीन परिणाम काय असतात?

  • क्लिनीकल डिप्रेशन
  • भय
  • चिंता
  • कमी आत्मविश्वास
  • कमी आत्मसन्मान
  • कमी पणाची वागणूक

वैवाहिक बलात्कार करणा-या लोकांना कशी वागणूक द्यावी?

Manisha Lomash यांच्या मते वैवाहिक बलात्काराकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.जर गुन्हा घडत असेल तर बळीला संरक्षण मिळवण्याचा व गुन्हेगाराला कायद्याने शिक्षा करण्याचा अधिकार असला पाहिजे.याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे.पती व पत्नीला समाजातून याबाबत समान वागणूक देण्यात यावी.  दोघांनी मिळून या समस्येचा सामना करण्यासाठी मानसशास्त्रज्ञांची मदत घ्यावी.hypontherapy, psychotherapy व hypnodrama च्या सहाय्याने अपराधी व्यक्तीमधील नकारात्मकता दूर करता येते.त्याच्यावर घडलेल्या संस्काराचा अभ्यास करुन त्याच्यात आत्मसन्मान वाढविण्यावर भर देण्यात येतो शिवाय गरज असल्यास अशा लोकांना सेक्स थेरपी देखील देण्यात येते.

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>