सण, परंपरा आणि त्याचबरोबर उपवास हा आपल्या भारतीय संस्कृतीचा अभिवाज्य भाग आहे. परंतु, मधुमेह असल्यास ब्लड ग्लुकोज मधील थोडासा बदल देखील तुम्हाला त्रासदायक ठरू शकतो. यासाठी तुम्हाला विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. म्हणून आम्ही मुंबईच्या Wockhardt Hospital चे हेड ऑफ मेडिसिन Dr Behram S. Pardiwalla यांच्याशी संवाद साधला. त्यांनी उपवास करताना ब्लड ग्लुकोज अचानक वाढल्यास किंवा कमी झाल्यास काय करावे आणि ते टाळण्याचे मार्ग कोणते, याबाबत मार्गदर्शन केले. तुम्ही मधुमेहाच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करताय का ?
- रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्यावर:
औषधे चालू असल्यास मधुमेहींनी उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण उपवासात तुम्ही घेत असलेल्या आहारानुसार डॉक्टर औषधांचे डोस बदलून देतील. त्यामुळे उपवासाच्या काळात ब्लड ग्लुकोज अचानक कमी होण्यास आळा बसेल. उपवासादरमान्य ब्लड ग्लुकोज कमी झाल्यास उपवास सोडून पटकन काहीतरी खाणे किंवा साखर तोंडात टाकणे गरजेचे आहे. मधूमेहींनो ! जांभूळ खा आणि ब्लड-शुगर नियंत्रणात ठेवा
उपवासादरम्यान ब्लड ग्लुकोज कमी झाल्यास घरच्या घरी करता येण्यासारख्या काही गोष्टी:
- सगळ्यात पहिल्यांदा ग्लुकोज घेण्याची गरज आहे. (जर घरात उपलब्ध असेल तर) नाहीतर लगेचच साखर खा. ३ मिनिटात त्याचा परिणाम होऊ लागतो. तसंच एखादे गोड पेय देखील तुम्ही घेऊ शकता. मधुमेहींनी साखरेऐवजी ‘मध’ खावे का ?
- ब्लड ग्लुकोज नियंत्रित राखण्यासाठी ज्यातून तुम्हाला साखर मिळेल असा पदार्थ चमचाभर तरी खा. चमचाभर साखरेचा परिणाम २५-३० मिनिटं राहतो. जर शक्य असेल तर पुढील समस्या, गंभीरता टाळण्यासाठी उपवास सोडणे योग्य ठरेल.
- पेशंटला स्वतःतून काही करता येणे शक्य होणार नाही या मर्यादेपर्यंत ब्लड ग्लुकोज कमी झाल्यास त्याच्या आजूबाजूच्या लोकांनी किंवा नातलगांनी पेशंट रिकव्हर होण्यासाठी या टीप्स पाळाव्यात. ब्लड ग्लुकोज सतत कमी होत राहिल्यास ही diabetic emergency असल्याचे ओळखावे आणि लगेचच डॉक्टरांची भेट घ्यावी. मधूमेहींनो ! ही 4 लक्षण तुमच्यासाठी Diabetic emergency !
- खाल्यानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यास:
उपवासादरमान्य काही वेळाने खाल्यास ब्लड ग्लुकोज वाढण्याची शक्यता फार कमी असते. आणि असे जरी झाले तरी वाढलेले प्रमाण फार जास्त नसते. तसंच डॉक्टरांनी बदलून दिलेले औषधांचे डोस ब्लड ग्लुकोज नियमित ठेवण्यास फायदेशीर ठरतात.
hyperglycemia आणि लो ब्लड शुगरची लक्षणे सारखीच असल्याने पेशंटला नक्की कोणता त्रास होतोय, हे ओळखणे काहीसे कठीण असते. परंतु, जर तुमचा असा गोंधळ उडाल्यास चिंता करू नका. जर तुम्हाला गुंगी आल्यासारखे, झोपेसारखे वाटत असेल आणि वारंवार लघवी होत असेल, तर हा ग्लुकोजचे प्रमाण सतत वाढत असल्याचा संकेत आहे. जर तुम्ही इन्सुलिन घेत असाल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपवास करण्यास काही हरकत नाही. मधूमेहींनो ! Insulin घेण्यापूर्वी हा सल्ला नक्की जाणून घ्या
मधुमेहावर स्वतःच्या मनाने औषधे अजिबात घेऊ नका. जर तुम्हाला काही त्रास जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. काही लोकांना उपवास न करण्याचा सल्ला दिला जातो. म्हणून वृद्ध असल्यास, ब्लड ग्लुकोज खूप पटकन कमी होत असल्यास किंवा किडनीचा कोणता आजार असल्यास उपवास अजिबात करू नका. मधुमेह आहे पण इतर समस्या नसल्यास तुम्ही उपवास करू शकता. परंतु, उपवासापूर्वी डॉक्टरांकडून औषधांचे डोस अडजस्ट करून घेण्यास विसरू नका. मधूमेहींच्या आहाराबाबतचे दूर करा हे ’6′ गैरसमज !
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock