एखाद्या विशिष्ट कार्यक्रमासाठी किंवा कोणालातरी आदर्श मानून झटपट वजन कमी करण्यासाठी अनेकजण क्रॅश डाएटचा पर्याय निवडतात. पण अशाप्रकारे झटपट वजन घटवल्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. झटपट वजन कमी करून पुन्हा रेग्युलर डाएट फॉलो केल्यास वजन वाढण्याचाही धोका असतो. म्हणूनच वजन कमी करण्याचा निश्चय केला असेल तरीही तो झटपट करण्यापेक्षा हळूहळू वजन घटवण्यासाठी आहारतज्ञ उर्वशी स्वाहनी यांचा हा खास सल्ला नक्की लक्षात ठेवा.
1. electrolyte imbalance चा धोका उद्भवू शकतो - शरीरात इलेक्ट्रोलेट बॅलन्सची पातळी कमी जास्त झाल्यास त्याचा परिणाम कार्डियोव्हसक्युलर फंशनवर होतो. अनेकदा क्रॅश डाएटवर असणार्या लोकांच्या शरीरात सोडीयमची पातळी कमी होते. त्यामुळे थकल्यासारखे वाटते. गरगरते.
2. मेटॅबॉलिझम कमी होते - शरीराला आवश्यक असणार्या कॅलरीजपेक्षा कमी डाएट घेतल्यास उपासमार होते. यामुळे शरीरात एनर्जी साचवून ठेवली जाते. त्याचा परिणाम मेटॅबॉलिझमवरही होतो. शरीराला पुरेसे प्रोटीन,न मिळाल्यास स्नायू कमजोर होतात. यामुळेदेखील शरीराचा मेटॅबॉलिझम रेटही कमी होतो. क्रॅश डाएटप्रमाणेच मेटॅबॉलिझम मंदावण्यास कारणीभूत ठरतात या ’6′ चूका
3. मिनरल्सची कमतरता - क्रॅश डाएटमुळे जसे हृद्याचे आरोग्य धोक्यात येते तसेच व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचीदेखील कमतरता निर्माण होते. शरीरात मुबलक आयर्न नसल्यास अॅनिमियाचा त्रास बळावू शकतो तर व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे ऑस्टोपोरायसिसचा त्रास वाढतो. या ’5′ आजारांमधून वाढतो ‘अॅनिमिया’चा त्रास !
4. डीहायड्रेशनचा त्रास वाढतो - क्रॅश डाएटवर असताना अनेकदा घटणारे वजन हे शरीरातील वॉटर वेट कमी करते. क्रॅश डाएटमुळे फॅट कमी होतीलच असे नाही. सोबतच शरीराला आवश्यक असणारे पाणीदेखील न मिळाल्याने अनेक समस्या वाढू शकतात. डोकेदुखी, थकवा, बद्धकोष्ठता यामुळेही डीहायड्रेशनचा त्रास वाढतो. वेळीच डीहायड्रेशनच्या समस्येकडे लक्ष न दिल्यास किडनीच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होऊ शकतात. डीहायड्रेशनचा त्रास अधिक गंभीर करतील हे ’7′ पदार्थ
5. शरीराचे चक्र बिघडते - लहान सहान गोष्टी असतील तर शरीर त्यानुसार स्वतःमध्ये बदल करते. मात्र अचानक आणि मोठे बदल झाल्यास आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात. अचानक अन्न घेण्याकहे प्रमाण कमी झाल्यास, शरीराचे चक्र बिघडते.
Read this in English Translated By – Dipali Nevarekar छायाचित्र सौजन्य – Shutterstock