Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

प्रेगन्सी टेस्ट बाबत या 5 गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

$
0
0

आजकाल प्रेगन्सी टेस्टसाठी अनेक पर्याय उपलब्ध असल्यामुळे त्यापैकी नेमका कोणता पर्याय निवडावा हे आव्हानात्मक असू शकते.जर तुमचा कोणती प्रेगन्सीटेस्ट करावी याबाबत गोंधळ उडाला असेल तर दिल्लीच्या सृष्टी हेल्द केअर सेंटरच्या Gynaecologist डॉ.सीमा गुप्ता यांचे याबाबतचे हे मार्गदर्शन अवश्य वाचा.तसेच जाणून घ्या Pregnancy कन्फर्म करण्यासाठी मदत करतात या ’3′ टेस्ट !

१.तुमचे डॉक्टर तुम्हाला Quantitative pregnancy test करण्याचा सल्ला देऊ शकतात-

काही प्रेगन्सी युरीन टेस्ट या Qualitative test असून त्यामुळे तुम्हाला फक्त तुमच्या युरीन मध्ये HCG उपस्थित आहे का हे समजू शकते.पण यासाठी Quantitative युरीन टेस्ट देखील उपलब्ध असतात ज्यामुळे तुम्हाला रक्तातील HCG चे प्रमाण समजू शकते.मिसकॅरेज चा धोका असणा-या गर्भवती महिलांचे गर्भधारणेनंतर रक्तातील HCG चे प्रमाण वाढले आहे का हे तपासण्यासाठी डॉक्टर अशा महिलांना Quantitative युरीन टेस्ट करण्याचा सल्ला देतात.तसेच जाणून घ्या गर्भपातानंतर पुन्हा बाळासाठी प्रयत्न करण्यापुर्वी करा या ५ डायग्नोस्टीक टेस्ट

२.तुमची आरोग्यस्थिती व औषधोपचार यांचा टेस्ट रिझल्टवर परिणाम होऊ शकतो-

गर्भधारणेसाठी प्रयत्न करताना घेण्यात येणा-या काही विशिष्ट औषधांमध्ये काही प्रमाणात HCG असते व त्यामुळे तुमच्या लघवीमधील या हॉर्मोन्सचे प्रमाण वाढू शकते.त्यामुळे कधीकधी तुम्ही गरोदर नसताना देखील तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट दाखविला जाऊ शकतो.काही वेळा काही Pituitary disorders मुळे देखील तुम्हाला चुकीचा रिझल्ट मिळू शकतो.तसेच गरोदरपणात दुस-या व तिस-या तिमाहीत या टेस्ट नक्की करा

३.महागड्या प्रेगन्सी टेस्ट अचूक असतातच असे नाही-

जर तुम्ही गरोदर आहात का याबाबत संभ्रमात असाल तर तुम्ही घरीच प्रेगन्सी टेस्ट अथवा डिजीटल प्रेगन्सी टेस्टने गर्भधारणा झाली आहे का ते तपासू शकता.त्यात फार तफावत नाही ना हे मात्र जरुर तपासा.कारण अचूक परिणाम पहाण्यासाठी प्रत्येकवेळी महागडी प्रेगन्सी टेस्ट करणेच गरजेचे आहे असे नाही.तसेच जाणून घ्या IVF पद्धतीने यशस्वी गर्भधारणेसाठी काय कराल ?

४.प्रेगन्सी टेस्ट सकाळी करा-

अनेक प्रेगन्सी टेस्ट कीटवर टेस्ट सकाळी करावी अशी सूचना दिलेली असते.कारण झोपेनंतर काही तासांनी युरीनमध्ये HCG निर्माण होत असते.त्यामुळे सकाळी युरीन टेस्ट केल्यामुळे तुम्हाला अधिक अचूक रिझल्ट मिळण्याची शक्यता असते.प्रेगन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येण्यासाठी तुमच्या युरीनमध्ये HCG चे प्रमाण कमीतकमी 25 IUs असण्याची आवश्यक्ता असते.असे असले तरी सकाळी प्रेगन्सी टेस्ट करणे बंधनकारक नाही फक्त त्यामुळे तुम्हाला अधिक अचूक रिझल्ट मिळण्याची शक्यता असते.आई होण्याचा निर्णय वयाच्या कोणत्या टप्प्यावर घेणं अधिक योग्य आहे ?हे देखील जरुर वाचा.

५.सर्व प्रेगन्सी टेस्ट समान गोष्टी तपासतात-

उपलब्ध असलेल्या अनेक प्रेगन्सी टेस्ट पैकी तुम्ही घरीच टेस्ट करा किंवा क्लिनीकमध्ये जाऊन प्रेगन्सी टेस्ट करा. या सर्व टेस्ट युरीनमध्ये Human Chorionic Gonadotropin (HCG) आहे का हेच तपासतात.तसेच जाणून घ्या गरोदरपणात आढळणारी ही ’20′ लक्षणं अगदी सामान्य आहेत

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock

 

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>