Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

‘सनी लिऑन’ची खास फीटनेस व ब्युटी सिक्रेट्स !

$
0
0

लावणी या अस्सल मराठमोळ्या नृत्यप्रकारावर अनेक मराठी आणि हिंदी तारकांना थिरकताना आपण पाहिले आहे. पण यंदा इटलीत क्रुझवर होणार्‍या इम्फा 2015 अवॉर्ड्समध्ये पहिल्यांदा सनी लिऑन लावणीवर थिरकताना दिसणार आहे.  अल्पावधीत बॉलीवूडमध्ये आपल्या सौंदर्याने सार्‍यांवर जादू करणारी ही सुंदरी आता मराठी तारांगणात अवतरणार आहे.  मग पहा तिची खास फीटनेस आणि ब्युटी सिक्रेट्स !!!

सनी लिऑनची फीटनेस सिक्रेट्स - 

डॅनियल वेबनर हे सनी लिऑनचे पतीच तिचे पर्सनल ट्रेनर असल्याने सनीच्या फीटनेसकडे कटाक्षाने लक्ष दिले जाते. सनी नियमित आठवड्यातून 2-3 दिवस जिममध्ये जाते. त्या व्यायामामध्ये कार्डीयो आणि स्वर्क्ट्सचा समावेश असतो. कामानिमित्त बाहेर असतानाही ती व्यायामाकडे दुर्लक्ष करत नाही. अशावेळी सनी योगसाधना आणि पॅलेट्स करते.

  • डाएट - 

आहाराच्या बाबतीतही सनी सजग आहे. आहारात भाज्या आणि दूधाचा वापर प्रामुख्याने करते. तसेच जंकफूड पूर्णपणे टाळते. आरोग्याप्रमाणेच त्वचेचे सौंदर्य  राखण्यासाठी मुबलक पाणी पिणे गरजेचे आहे. सनी नियमित 8 ग्लास पाणी पिते. याशिवाय नियमित शहाळ्याचं पाणी पिण्याकडे तिचा कल असतो. आहाराचे हे पथ्य पाळताना ती नियमित 20 मिनिटे चालणे कधीच टाळत नाही.

सनी लिऑनची ब्युटी सिक्रेट्स - 

सनी लिऑनच्या फीटनेस सोबतच तिचे सौंदर्यही वाखाण्याजोगे आहे. त्वचा 90 % गोष्टी शोषून घेते. हा सनी लिऑनचा विश्वास आहे. त्यामुळे रोज झोपण्यापूर्वी मेकअप काढणे हा तिचा नियम आहे. तसेच रात्री झोपण्यापूर्वी सनी आंघोळ करते.  केसांमुळे स्त्रीचे सौंदर्य अधिक खुलते. मग सनी याबाबत कशी लांब राहील. केसांचे आरोग्य जपण्यासाठी ती खोबरेल तेलाची चंपी आवश्यक आहे. असे तिचे म्हणणे आहे. मात्र सतत कामात असताना किंवा हेअरस्टाईलिंगमुळे केस खराब झाल्यास ती ते टोपी किंवा हॅटने लपवते.  सनी लिऑनच्या ब्युटी रिजीममधील आणखी एक प्रमुख गोष्ट म्हणजे ‘स्पा’ ! सनी आवश्यकतेनुसार स्पा मसाज नक्की घेते.

 

संबंधित दुवे -

अमृता खानविलकरचा फीटनेस फंडा

मी कधीच फेशियल, ब्लिचिंग केलं नाही : तेजस्विनी पंडीत ( Exclusive Beauty Secrets )    

व्यायाम ‘सिक्स पॅक अ‍ॅब ‘साठी नाही तर निरोगी स्वास्थ्यासाठी करा: भूषण प्रधान   


मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’पेज व‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या‘फोरम‘ ला भेट द्या.

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>