Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

ब्लॅकहेड काढण्यासाठी घरीच Blackhead Extractor वापरणे योग्य आहे का?

$
0
0

तेलकट व पिंपल्स असलेल्या त्वचेवर सतत ब्लॅकहेड व व्हाईटहेड येत असतात.प्रसिद्ध YouTube Dermatologist Dr Sandra Lee उर्फ Dr Pimple Popper यांच्याकडून जाणून घेऊयात या समस्येवर कसा मार्ग काढावा.त्वचेवरील ब्लॅकहेड काढल्यामुळे तुमची त्वचा अधिक खुलून दिसते.हे ब्लॅकहेड काढण्यासाठी मेटलचे ब्लॅकहेड रिमूव्हर वापरणे योग्य ठरेल.तसेच वाचा धणे-हळदीच्या मिश्रणाने दूर करा पिंपल, ब्लॅकहेड्सची समस्या !

pimple  extractor

या ब्लॅकहेड रिमूव्हरला Blackhead Extractor किंवा Comedone Extractor असे म्हणतात.हे साधन म्हणजे धातूची एक पातळ काडी असून त्याच्या एका टोकाला तीक्ष्ण लान्स व एका टोकाला छोटासा लूप असतो.तुम्ही हा लूप ब्लॅकहेड वर दाबू शकता.हा मेटलचा लूप ब्लॅकहेडच्या आत जाऊ शकतो.जर तुम्हाला हे साधन पिंपल वर वापरायचे असेल तर प्रथम दुस-या टोकाला असलेल्या लान्सने पिंपल फोडून मग तो स्वच्छ करावा.यासाठी वाचा ओव्हरनाईट’ पिंपल हटवण्याचा हमखास घरगुती उपाय.

जेव्हा हलका दाब देऊन तुम्ही हे साधन वापरता तेव्हा ब्लॅकहेड फुटतो व त्यातील घाण व पू बाहेर येते.योग्य रितीने हे साधन वापरुन तुम्ही तुमच्या त्वचेवरील कुरुप व त्रासदायक ब्लॅक स्पॉट कमी करु शकता.मात्र डॉ. पिंपल पॉपर यांनी सांगितल्याप्रमाणे हे साधन वापरणे अगदी सहज व .सोपे आहे असे समजू नका.कारण हे साधन वापरताना तुमची फक्त एकच चुक देखील तुम्हाला फार महागात पडू शकते.Blackhead Extractor चुकीच्या हातात पडल्यास त्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो.वाचा पिंपल्स फोडल्यानंतर त्वचेवर डाग पडू नये म्हणून काय कराल?

यासाठीच Skinfiniti Skin & Laser Clinic च्या सीईओ व प्रसिद्ध Cosmetic Dermatologist डॉ.जयश्री शरद यांच्यामते ब्लॅकहेड काढण्यासाठी तज्ञांचीच मदत घ्यावी.त्यामुळे डॉ.शरद यांच्यामते Blackhead Extractor वापरणे योग्य नाही.त्यामुळे त्वचेमध्ये सुक्ष्म जीव-जंतूचा संसर्ग होण्याचा धोका असतो.तसेच त्यामुळे त्वचेला इनफेक्शन होणे,फोड अथवा तीव्र पिंपल येण्याचा धोका देखील वाढतो.या साधनामुळे त्वचेच्या आतील थराचे नुकसान होऊन त्वचेवर चट्टे अथवा व्रण उठण्याची शक्यता असते.

मात्र तुम्हाला Blackhead Extractor हे साधन वापरणे अपरिहार्य असेल तर प्रथम ते उकळत्या पाण्यामध्ये Sterilise करुन घ्या.डॉ.शरद यांच्यामते Sterlisation साठी क्लिनीकमध्ये वापरण्यात येणारी Autoclave Machine वापरणे उत्तम आहे.तसेच यासाठी ब्लॅकहेड काढण्याचे योग्य तंत्र देखील शिकून घेणे फायदेशीर ठरेल.जर ब्लॅकहेड अथवा व्हाईटहेड योग्य पद्धतीने काढले गेले नाहीत तर त्या जागी फोड येतात व त्यात पू होतो.डॉ.शरद यांच्यामते जाड व टोकदार कडांपेक्षा कमी धारदार कडा असलेले Blackhead Extractor निवडा.तसेच त्यांच्यामते ब्लॅकहेड काढण्याआधी चेह-यावर वाफ देणे गरजेचे नसले तरी असे केल्यास चांगला फायदा होऊ शकतो.अ‍ॅक्ने, ब्लॅकहेडचा त्रास दूर करण्यासाठी कसा कराल मुलतानी मातीचा वापर.

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>