Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

व्हर्टिगोचा त्रास असल्यास डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा ?

$
0
0

तुम्हाला व्हर्टिगोची लक्षणे जाणवायला लागल्यावर तुम्ही काय करता ? प्रथमतः तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करता. अपुऱ्या झोपेमुळे किंवा कामाच्या अतिरिक्त ताणामुळे गरगरल्यासारखे वाटत असेल असा तुम्ही विचार करता. तसंच चक्कर आल्यानंतर काही मिनिटं बसून पुन्हा आपण कामाला सुरवात करतो. आपल्यापैकी बरेचजण असे करतात. परंतु, हे योग्य नाही. कारण व्हर्टिगो (चक्कर येणे किंवा तोल गेल्यासारखे वाटणे) हा न्यूरॉलॉजिकल समस्येचा संकेत आहे. Heading the Headache & Vertigo Clinic चे Dr Pawan Ojha, यांच्या सल्ल्यानुसार याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते आणि डॉक्टरांचा सल्ला केव्हा घ्यावा, याबाबत मार्गदर्शन केले.

  • डॉक्टरांचा सल्ला केव्हा घ्यावा ?

शरीराचा समतोल vestibular system द्वारे नियंत्रित केला जातो. vestibular system मधून मेंदूला संकेत दिला जातो. चक्कर येणे, डोके गरगरल्यासारखे वाटणे, तोल जाणे, घेरी येणे ही व्हर्टिगोची सामान्यपणे दिसून येणारी लक्षणे आहेत. काही वेळेस पेशन्टच्या मानसिकतेवर परिणाम होऊन असुरक्षितता, नैराश्य आणि psychosis सारख्या मानसिक आजारांची भीती पेशंटच्या मनात निर्माण होते. चक्कर आल्यानंतर कोणते प्रथमोपचार कराल ?

मळमळ आणि उलट्या होण्याबरोबर व्हर्टिगोचा त्रास होणार असेल तर त्वरित डॉक्टरांची मदत घ्यावी. व्हर्टिगो किंवा सिव्हीयर व्हर्टिगो यामुळे तोल जाणे, थकवा येणे, बोलताना किंवा गिळायला त्रास होणे किंवा इतर न्यूरॉलॉजिकल लक्षणे जाणवताच त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. व्हर्टिगोबरोबर इतर न्यूरॉलॉजिकल लक्षणे दिसून आल्यास हा ब्रेन स्ट्रोक किंवा ट्युमरचा संकेत असू शकतो. यासाठी लगेचच मेडिकल हेल्प घेण्याची गरज असते. तुम्हाला ब्रेन ट्युमरचा धोका आहे का?

डोकेदुखीप्रमाणे व्हर्टिगो देखील सामान्य झाला आहे. भारतात ५ पैकी १ ला हा त्रास आहे. डोकेदुखी किंवा व्हर्टिगो असताना तज्ज्ञांचा सल्ला न घेतल्यास आजाराचे निदान होणार नाही व त्यामुळे त्यावर वेळीच योग्य ते उपचार होणार नाहीत. पेनकिलर्स घेण्याने आजाराची गंभीरता अधिक वाढेल. लक्षणे दिसताच आजाराचे लवकर आणि योग्य निदान होणे महत्त्वाचे आहे. कारण त्यावरच पुढील उपचार अवलंबून असतात. म्हणून, व्हर्टिगोचे कोणतेही लक्षण जाणवल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच योग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या. ‘अ‍ॅक्युप्रेशर’- मिनिटाभरात डोकेदुखी दूर करणारा झटपट उपाय !

 

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>