Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

‘मांजा’चा हा ट्रेलर पाहून तुम्हीदेखील तुमच्या मुलांचे मित्र नेमके कोण आहेत हे नक्की तपासून पहाल !

$
0
0

मांजा या आगामी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. सायकोथ्रिलर असणार्‍या ‘मांजा’ या चित्रपटाचा ट्रेलर पाहूनच अनेकांच्या अंगावर काटा आला असेल. एका अबोल मुलाच्या शांत स्वभावाचा गैरफायदा घेत त्याचाच मित्र त्याला चूकीच्या वळणावर आणतोय हे जेव्हा आईला कळंत.. तेव्हा आपल्या टीनएज मुलाला पुरेसे स्वातंत्र्य देऊन मित्राच्या चक्रव्युहातून कसं सोडवावं हे सांगणारा नात्याचा ‘मांजा’ चित्रपटातून उलगडणार आहे.

आजकाल कमी वयात खूप माहिती इंटरनेट, सोशल मिडीयाच्या माध्यमातून मुलांना उपलब्ध होत आहे. त्यामुळे पालक आणि मुलांमधील जनरेशन गॅप वाढतेय.पिअर प्रेशरखाली येऊन मुलं चूकीच्या मार्गावर भरकटत आहेत. अशावेळी मुलं आणि पालक यांच्यामधील पुरेसा संवाद आणि संस्कारांची शिदोरी फार गरजेची आहे. पण पालकांकडून 100%  प्रयत्न करूनही  आपली मुलं चूकीच्या वळणावर जात आहेत हे वेळीच ओळखण्यासाठी मुलांच्या वागण्या-बोलण्यातील या काही बदलांकडे लक्ष देणं गरजेचे आहे.

  1. वागण्यातील बदल - एरवी किमान घरातील वडीलधार्‍या मंडळींचा धाक म्हणून अदबीने बोलणारी मुलं अचानक वडिलधार्‍या लोकांना उलट सुलट उत्तरं देत असल्यास त्याच्या वागणूकीतील बदलांकडे वेळीच लक्ष द्या. अनेकदा त्यांच्या मित्रपरिवारातील लोकांकडून ऐकलेल्या गोष्टींची मोकळीक घरात मिळत नसल्यास अनेकदा मुलांची चिडचिड होते आणि ती मोठ्या लोकांना उलट उत्तरं करतात.
  2. अधोगती - वयात आलेल्या मुलांमध्ये शारिरीक आणि मानासिक बदल होताना चिडचिड होणं हे एक सामान्य लक्षण आहे. पण अभ्यास चांगली असलेली मुलं अचानक मित्र परिवारात राहून खूप वेळ टंगळ मंगळ करत असल्याने त्याचा परिणाम प्रगतीपुस्तकावर दिसत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका.
  3. आवडीच्या गोष्टींमधून लक्ष उडणं - वाईट संगत  लागली की आपसुकच त्यांच्या वागण्या-बोलण्यात बदल व्हायला सुरवात होते. मित्रांच्या प्रभावातून काही चुकीच्या गोष्टींकडे ओढा वाढू शकतो. मुलांच्या छंदापासून, त्यांच्या आवडीच्या गोष्टींपासून लक्ष हटते आणि मारामारी करणं, पुस्तकं फाडणं, इतरांना चिडवणं अशा गोष्टींचे प्रमाण वाढते.
  4. फारच उद्धटपणे किंवा फारच गप्प गप्प राहणं –  चूकीच्या संगतीत राहिल्यानंतर आपल्यावर झालेले संस्कार किंवा घरातून सांगितल्या जाणार्‍या गोष्टी आणि नव्याने दिसणारे, मित्रांकडून शिकवल्या जाणार्‍या गोष्टी यांच्यातील तफावत पाहता मुलांमध्ये गिल्ट निर्माण होतो. यामधूनच मुलं अगदी टोकाची भूमिका घेतात. काही वेळेस ती खूपच उद्धट होतात तर काही वेळेस संवादाची सारी माध्यमं बंद करण्याचा प्रयत्न करतात. मुलांना पॉर्न बघण्यापासून कसे परावृत्त कराल ?
  5. चूकीच्या सवयी  लागतात – शक्यतो सुरक्षित घरात किमान मुलांसमोर सर्रास दारू पिणं, धुम्रपान करणं, दारू पिऊन अद्वातद्वा बोलणं अशा गोष्टी टाळल्या जातात. पण घरात अशाप्रकारचे नियम पाळूनही मुलं छुप्या पद्धतीने व्यसनाच्या अधीन होत असल्याचे तुम्हांला आढळल्यास त्यांच्याशी बोला. त्यांच्या मित्रपरिवारात कोण मंडळी आहेत याची विचारणा करा. तुमची मुलं लपून सिगारेट, ड्रग्ज घेतात का ? हे ओळखण्याचे ’9′ संंकेत
  6. नवी संगत - अचानक तुमच्या मुलांचा मित्रपरिवार बदलल्यास, जुन्या मित्रांऐवजी नव्या मित्र-मैत्रीणींसोबत सतत फिरत असल्यास आणि त्यानंतर वागण्या- बोलण्यात बदल होत असल्यास काळजी घ्या. त्यांच्या संपर्कातील नवी मंडळी कोण आहेत ? काय करतात ? कुठे राहतात याबाबत माहिती मिळवा.

मुलांच्या वागाण्या बोलण्यातील बदलांकडे पालकांनी कसे पहावे ?

अचानक मुलांमध्ये झालेला बदल, त्यांच्या वागण्या-बोलण्यातील बदल, उद्धटपणा किंवा अगदीच काही न बोलणं पालकांना त्रासदायक ठरू शकते. अशावेळी वयात आलेल्या मुलांसोबत नेमके कसं  वागावे हे पालकांना कळत नाही. मुलांना रागवताना नकळत झालेल्या चूकांमुळे प्रश्न अधिक गहन बनू शकतो म्हणूनच या गोष्टींकडे पालकांनी लक्ष देणं गरजेचे आहे. मुलांना रागवताना या ’5′ चुका टाळा

  1. मुलांशी बोला - तुमच्या मुलांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी थेट विषया वर बोला. सहाजिकच मुलांना त्यांच्या विश्वाबाबत किंवा मित्र मैत्रिणींबाबत खुल्याने बोलणं आवडणार नाही. पण त्यांना त्याचे फायदे – तोटे वेळीच समजावून सांगा.
  2. संस्कार - मुलांना लहानपणापासूनच चांगल्या – वाईट गोष्टींची समज करून द्या. मुलं जेव्हा चुकतील त्या वेळीच त्यांना त्यांची चूक समजावून सांगा. कारण चांगल्या संस्कारांची शिदोरी मुलांसोबत आयुष्यभर राहते तसेच त्यावर त्यांचा स्वभाव घडत असतो. या 9 चांगल्या सवयी पुढच्या पिढीला नक्की शिकवा
  3. संयम पाळा – मुलांचं चूकीचं वागणं, त्याच्या वागणुकीतील बदल प्रकर्षाने जाणवू लागले की सहाजिकच पालकांचा संयम सुटतो. मुलांवर राग काढला जातो. पण यामुळे परिसथिती अधिक चिघळण्याची शक्यता असते. शांत आणि संयमी पालक होण्यासाठी ‘५’ खास टीप्स !
  4. मुलांना पुरेसा वेळ द्या - आजकाल कामाच्या व्यापामध्ये आणि त्यासाठीच्या प्रवासामध्ये प्रत्येक चाकरमन्याचा बराचसा वेळ जातो. यामुळे घराकडे, मुलांकडे बसून बोलायचा वेळ कमी पडतो. पण तुम्ही मुलांसोबत किती वेळ राहता यापेक्षा जास्त उपलब्ध वेळेचा कसा उपयोग करता हे गरजेचे आहे.

आणि हे सारे प्रयत्न करूनही मुलांना चूकीच्या मार्गावरून बाहेर काढणं कठीण होत असेल तर संयम न ढळू देता मानसोपचारतज्ञांची मदत घ्या. तज्ञांच्या मदतीने मुलांना समजवण्याचा नक्की प्रयत्न करा.

तुम्ही अजून पाहिला नसेल तर नक्की पहा ‘मांजा’चा ट्रेलर

व्हिडियो सौजन्य - Manjha The film/youtube

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>