मेष-(२१ मार्च ते २० एप्रिल)- ज्यांना श्वसनाच्या व ह्रदय समस्या आहेत अशा लोकांनी या आठवड्यामध्ये सावध रहावे.अस्वस्थ वाटू लागल्यास त्वरीत डॉक्टरांकडे जावे.निरोगी जीवनासाठी जीवनशैलीमध्ये बदल करण्याची आवश्यक्ता आहे.
वृषभ-(२१ एप्रिल ते २१ मे)-या आठवड्यामध्ये देखील तुमचे आरोग्य उत्तम असल्यामुळे आठवडाभर तुम्ही उत्साही रहाल.आरोग्य स्वास्थामुळे कामाच्या ठिकाणी,घरी व शालेय जीवनात तुमची प्रगती होईल.भविष्यात देखील तुम्हाला आरोग्याबाबत काळजी करण्याचे कारण नाही.मात्र दररोज व्यायाम व मेडीटेशनचा सराव अवश्य करा.
मिथुन-(२२ मे ते २१ जून)-ज्यांना अनियंत्रित रक्तदाबाची समस्या आहे त्यांनी नियमित चेक-अप करावे.कदाचित तुम्हाला भयंकर दातदुखीची समस्या होऊ शकते.त्यामुळे दातांची वेळीच काळजी न घेतल्यास दात गमवावा लागू शकतो.यासाठी त्रास जाणवू लागताच तुमच्या डेन्टीस्ट कडे जाऊन उपचार करुन घ्या.
कर्क-(२२ जून ते २२ जुलै)-जरी या आठवड्यामध्ये तुमच्या आरोग्याला भंयकर धोका दिसत नसला तरी ज्यांना श्वसनाची समस्या आहे त्यांनी काळजी घ्यावी.भविष्यात समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी आत्ताच काळजी घेणे योग्य ठरेल.मधूमेहींनी देखील समस्या टाळण्यासाठी आहारामध्ये पत्थे पाळावीत.
सिंह-(२३ जुलै ते २२ ऑगस्ट)-या आठवड्यामध्ये तुम्हाला पचनसमस्या व अॅसिडिटीची समस्या होऊ शकते.त्यामुळे तुमची पचनक्रिया मंदावेल.पचनसंस्था सुधारण्यासाठी आहारतज्ञांचा सल्ला घ्या.रात्री उशीरा जेवणे व चमचमीत पदार्थ खाणे टाळा.
कन्या-(२३ ऑगस्ट ते २२ सप्टेबर)-तुमचे आरोग्य स्वास्थाचे असल्यामुळे या आठवड्यामध्ये तुम्हाला आरोग्याबाबत फार काळजी करण्याची गरज नाही.मात्र ज्यांना पूर्वी आरोग्य समस्या झाल्या असतील त्यांचे पूर्वीचे आजारपण पुन्हा वर येण्याचा धोका आहे.त्यामुळे आजाराची लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.आजारपण पूर्ण बरे व्हावे यासाठी पर्यायी थेरपीचा वापर करा.
तूळ-(२३ सप्टेबर ते २२ ऑक्टोबर)-ज्यांना पचनाची समस्या आहे त्यांना त्रास होऊ शकतो.तुम्ही यासाठी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.ते तुम्हाला आहार व औषधांमध्ये बदल सूचवू शकतात.इतरांसाठी हा आठवडा आरोग्यदायी असेल.तुम्हाला या आठवड्यामध्ये अधिक उत्साही वाटेल.
वृश्चिक-(२३ ऑक्टोबर ते २२ नोव्हेंबर)-रक्तदाबाची समस्या असलेल्या लोकांव्यतिरिक्त इतरांसाठी हा आठवडा आरोग्यदायी असेल.जर तुम्हाला रक्तदाबाची समस्या असेल तर रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी आहार व औषधांबाबत योग्य काळजी घ्या.निरोगी जीवनासाठी ताण-तणावापासून दूर रहा.
धनु-(२३ नोव्हेंबर ते २१ डिसेंबर)-मधूमेहींसाठी हा आठवडा आरोग्याचा नाही.यासाठी आहारातून कार्बोहायड्रेट व साखर पूर्ण कमी करा.रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमित चेक-अप करा.तसेच आहार व औषधे वेळेत घ्या.इतरांसाठी हा आठवडा आरोग्याचा असेल.
मकर-(२२ डिसेंबर ते २० जानेवारी)-रक्तदाबाची समस्या असलेल्या लोकांनी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.औषधांमध्ये बदल केल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात येईल.तसेच नियमित चेक-अप करा व आहाराबाबत पत्थे पाळा.
कुंभ-(२१ जानेवारी ते १८ फेब्रुवारी)-जरी हा आठवडा तुमच्यासाठी आरोग्यदायी असला तरी तुम्हाला तीव्र अॅसिडीटीचा त्रास होऊ शकतो.त्यामुळे कदाचित तुम्हाला आठवडाभर अस्वस्थ वाटू शकेल.त्यामुळे सतत अॅन्टासिड घेण्यापेक्षा आहारामध्ये ताज्या भाज्या व फायबरयुक्त तृणधान्यांचा समावेश करा.भरपूर पाणी पिण्याचा देखील चांगला फायदा होईल.
मीन-(१९ फेब्रुवारी ते २० मार्च)-अनुकूल ग्रहदिशेमुळे हा आठवडा तुमच्यासाठी आरोग्य व स्वास्थाचा असेल.त्यामुळे आरोग्याबाबत विशेष काळजी करण्याचे कारण नाही.मात्र रक्तदाबाची समस्या असलेल्या लोकांनी आहार व औषधे वेळेवर घ्यावीत.