जेवणानंतर अनेकांना बडीशेप-धनाडाळ किंवा ओवा खाण्याची सवय असते. जेवणानंतर बडीशेप सोबत धनाडाळ का खावी ? हे नक्की जाणून घ्या. बडीशेप खाल्ल्याने पचन सुधारायला मदत होते. सोबतच बडीशेपमधील अॅन्टी बॅक्टेरियल गुणधर्म तोंडाला येणारा दुर्गंधीचा वास कमी करते. तसेच पोटफुगीचा त्रास कमी होतो. मासिकपाळीच्या दिवसात पोटात क्रॅम्स येत असल्यास हा त्रासदेखील कमी होण्यास मदत होते. वॉटर रिटेंन्शनचा त्रास आटोक्यात आणण्यास, वजन घटवण्यास आणि अॅनिमियाचा धोकादेखील आटोक्यात ठेवण्यास मदत होते. इतकी फायदेशीर असलेली बडीशेप केवळ जेवणानंतर खाण्यापेक्षा अधिक चांगल्याप्रकारे आहारात त्याचा समावेश करण्यासाठी या ट्रिक्स नक्की जाणून घ्या.
1. बडीशेप सरबत -
कपभर बडीशेपाचे दाणे आणि कपभर साखर 7-8 ग्लास पाण्यात भिजत ठेवा. हे मिश्रण असेच रात्रभर भिजत ठेवा. पाण्यामध्ये हळूहळू बडीशेपचा फ्लेवर उतरेल. उन्हाळ्याच्या दिवसात शरीरात थंडावा निर्माण होण्यासाठी बडीशेपाचे सरबत फायदेशीर ठरते. पिण्यापूर्वी हे सरबत गाळा. जर खूपच जास्त वास असेल तर गरजेनुसार त्यामध्ये पाणी मिसळा. साखरेऐवजी तुम्ही मधही मिसळू शकता.
2. व्हेजिटेबल किंवा मीट स्टॉक –
सूप बनवताना तुम्ही व्हेजिटेबल किंवा मीट स्टॉकमध्येही बडीशेप मिसळू शकता. चमचा बडीशेपाचे दाणेही स्टॉकचा आस्वाद वाढवतात. मुलांच्या हेल्दी टेस्टी पदार्थांसाठी व्हेजीटेबल स्टॉक कसा तयार करुन ठेवाल ?
3. डाळ -
डाळ, आमटी याची चव वाढवण्यासाठी बडीशेपाची पूड मिसळा. त्याचा आस्वाद अधिक वाढतो.
4.काढा -
मान्सूनच्या दिवसात किंवा वातावरणात थंडावा निर्माण झाल्यानंतर बडिशेपाचे काही दाणे पाण्यात उकळा. या काढयामध्ये मध मिसळून प्या. ग्रीन टीमध्येही बडीशेपाचे काही दाणे मिसळू शकता. यामुळे फ्लेवर अधिक सुधारतो. दूधाच्या चहामध्येही बडीशेपाचे दाणे मिसळू शकतो.
5. लोणची -
प्राचीन काळी लिंबाच्या, आंबा, कैरीच्या लोणच्यामध्ये स्वाद वाढवण्यासाठी बडीशेप वापरली जात असे.
6. फ्रेश सलाड ड्रेसिंग -
बडीशेपाची पावडर करून त्याचा वापर सलाडवर ड्रेसिंगसाठी करा. यामुळे सलाड स्वादिष्ट होते.
7. गोडाचे पदार्थ -
योगर्ट, फ्रुट सलाड यामध्ये आयत्यावेळेस तुम्ही बडीशेप पूड मिसळू शकता. यासोबतच पॅनकेक आणि मालपुवाच्या मिश्रणामध्ये तसेच पुरणपोळीच्या पुरणामध्येही बडीशेपाची पूड मिसळू शकता. मसाला दूधाची चव वाढवण्यासाठीदेखील बडीशेप अत्यंत फायदेशीर आहे. दूधात हे ’7′ घटक मिसळून त्याला बनवा अधिक टेस्टी आणि हेल्दी !!
Read this in English Translated By – Dipali Nevarekar छायाचित्र सौजन्य – Shutterstock