पावसाळ्यात सामान्यत: कावीळ हा आजार होतो.आयुर्वेदामध्ये कावीळ या आजाराला कामला (Kamala) या नावाने ओळखले जाते.कावीळ झाल्यास त्वचा व डोळे पिवळे दिसू लागतात.रक्तातील Bilirubin ची पातळी वाढल्यामुळे हा पिवळसरपणा येतो.यासाठी काविळीच्या या ’8′ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.
कावीळची काही लक्षणे-
- डोळे,त्वचा,जीभ व लघवी पिवळी होणे मूत्रपरिक्षणावरून ओळखा कसे आहे तुमचे आरोग्य !
- पोटाच्या वरील भागात वेदना
- प्रचंड थकवा
- सौम्य ताप
- बद्धकोष्टता
- सेक्सची इच्छा कमी होणे
- उलटी
कावीळ होण्याची कारणे-
- लाल रक्त पेशींच्या विघटनामधून हिमोग्लोबिन प्रसारित होते.हिमोग्लोबिम मधील हिम चे बिलुरुबिन मध्ये रुपांतर होते.चयापचय व उत्सर्जनासाठी पुढे ते यकृतामध्ये पाठवले जाते.जेव्हा या चयापचय व उत्सर्जन क्रियेत बिघाड होतो तेव्हा बिलुरुबिन ची पातळी वाढून काविळ हा आजार होतो.त्यामुळे पिवळसर रंग निर्माण होतो.काविळ हा आजार यकृताचा हिपॅटायटीस या व्हायरल इनफेक्शनमुळे,यकृत व स्वादुपिंडाच्या कर्करोगामुळे,पित्त नलिका ब्लॉक झाल्यामुळे होऊ शकतो.
- अतिप्रमाणात मद्यपान केल्यामुळे Cirrhosis होतो ज्यामुळे काविळ होऊ शकते.Acetaminophen,Steroids व Birth control pills अशा औषधांमुळे देखील यकृतावर परिणाम होऊन कावीळ होण्याची शक्यता असते.
- आयुर्वेदानूसार काविळ हा पित्त दोषामुळे होणारा विकार आहे.तिखट,तेलकट व उष्ण पदार्थ,अल्कोहोल व कॅफेन या पदार्थामुळे पित्त आणखी वाढण्याची शक्यता असते.ज्यामुळे पित्त नलिकेमध्ये अडथळा येतो व पित्त रक्तप्रवाहामध्ये साचू लागल्याने डोळे व त्वचा पिवळसर दिसू लागतात.तसेच वाचा पावसाळ्यात आजारपण दूर ठेवण्यासाठी हे ’9′ पदार्थ टाळा
- दिवसा झोप येणे,सतत थकल्यासारखे वाटणे,राग,ताण-तणाव व चिंता काळजी देखील कावीळ होण्याची कारणे आहेत.
कावीळ झाल्यास काय आयुर्वेदिक उपचार करावेत?
कावीळ आजार बरा करण्यासाठी आयुर्वेदामध्ये व्यापक दृष्टिकोनातून विचार केला जातो.त्यामुळे काविळ झाल्यास आयुर्वेदिक तज्ञ तुम्हाला काही दिवस ठराविक औषधे घेण्याचा सल्ला देतात.उपचारादरम्यान तुम्ही काय खावे व काय खाऊ नये यासाठी आहारामध्ये काही पत्थे पाळावी लागतात.तसेच या आयुर्वेदीक उपचार आणि डाएट टीप्सने रहा पावसाळ्याच्या दिवसात अधिक हेल्दी !देखील जरुर वाचा.
सामान्यत: काविळ झाल्यास खाली दिलेली काही आयुर्वेदिक औषधे स्वतंत्रपणे तर काही औषधे संयुक्तपणे घेण्याचा सल्ला देण्यात येतो-
Giloe किंवा guduchi, [Tinospora cordifolia]-गुडूची हे औषध भारत,श्रीलंका व म्यानमार येथे आढळते.या झाडांच्या खोडापासून पावडर निर्माण करण्यात येते ज्याला गुडूची सत्व असे म्हटले जाते.The Indian Journal of Anaesthesia मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानूसार कावीळ झालेल्या रुग्णांना दिवसभरात १६ mg/kg गुडूची सत्व दिल्याने कावीळ आजारामुळे होणारा मृत्युदर ६१.५ वरुन २५ टक्क्यांवर खाली घसरला असल्याचे आढळून आले.व ज्यांच्या उपचारांमध्ये या औषधाचा वापर केला गेला नाही त्यांचा दर ३९ वरुन ६.२५ टक्कावर गेला.या औषधामुळे काही रुग्णांमध्ये भुकेचे प्रमाण वाढून ताप व उलटी-मळमळ या लक्षणांमध्ये सुधारणा दिसून आली.आयुर्वेदिक तज्ञ कावीळ झालेल्या रुग्णांना या औषधाची पावडर दिवसभरातून दोन वेळा गरम पाण्यातून घेण्याचा सल्ला देतात.
Kutki [Picrorhiza kurroa]-कुटकी ही बारमाही औषधी वनस्पती असून भारतातील शीतोष्ण प्रदेशामध्ये आढळते.या वनस्पतींच्या ३ ते ४ वर्ष जुन्या असलेल्या मुळ्यांपासून तयार झालेला Picroliv हा घटक काविळ प्रमाणेच यकृताच्या इतर समस्यांसाठी देखील गुणकारी असतो.संशोधकाच्या मते या औषधाचा Picroliv हा घटक Anti-cholestatic असतो.ज्यामुळे पित्त नलिका मोकळ्या होतात व रक्तात पित्त साठत नाही.या औषधाची पावडर देखील दिवसातून दोनदा गरम पाण्यासोबत घेण्याचा सल्ला देण्यात येतो.
Vasaka [Adhatoda vasica]-भारतामध्ये ही सदाबहार औषधी वनस्पती हिमालयामध्ये आढळते.या औषधाचा वापर कावीळसह ब्रॉन्कायटीस व फुफ्फुसांच्या विकारावर देखील करण्यात येतो.लक्षात ठेवा जर तुम्ही इतर कोणतीही औषधे घेत असाल तर या औषधी वनस्पतीचा वापर करु नका.कावीळ बरी करण्यासाठी या वनस्पतीच्या पानांचा वापर करण्यात येतो.या वनस्पतींच्या पानांचा दोन औंस रस,जेष्ठमधाची पावजर व समान प्रमाणात साखर तसेच अर्धा चमचा मधासोबत घेण्यात येते.
तसेच Myrobylan (bibhitaki), Chebulic Myrobylan (haritaki) व Gooseberry यापासून तयार करण्यात आलेले त्रिफळा,गुडूची व वसकाची पाने,कडूलिंबाच्या साली यांची समप्रमाणात पावडर करुन ही पावडर दिवसभरात दोनदा मधासोबत घेण्यात येते.
कुमारी आसव Kumari asava-कुमारी आसव हे दालचिनी,वेलची,काळीमिरी,त्रिफला अशा २० हून अधिक औषधी वनस्पती व मध व गुळासह तयार केलेले मिश्रण आहे.हे औषध श्वेतपदर अथवा Leucorrhoea यावर देखील प्रभावी आहे.तसेच यामुळे पित्तनलिका मोकळ्या होतात व यकृत तसेचे पित्ताशयाचे कार्य सुधारते.हे औषध तज्ञ दिवसभरात दोनदा दोन ते सहा चमचे इतक्या प्रमाणात घेण्याचा सल्ला देतात.
आरोग्यवर्धिनी वटी Arogyavardhini Vati-हे आयुर्वेदिक औषध कावीळ,फॅटी लिव्हर सिन्ड्रोम,व्हायरल हिपॅटायटीस व अल्कोहोलिक हिपॅटायटीस या विकारांसाठी देण्यात येते.आयुर्वेदिक औषधांसह या वटीमध्ये शुद्ध पारा,सल्फरसह लोखंड व तांब्याची राख असते.त्यामुळे आयुर्वेदिक तज्ञांसाठी ही एक चिंतेची बाब अाहे.न्यू दिल्ली येथील All India Institute of Medical Sciences च्या संशोधकांच्या मते या वटीचा मेंदू,यकृत व किडनीवर विपरित परिणाम होत नाही.प्रौढ माणसे दिवसभरात या औषधाचा २५०mg ते ५००mg चा डोस घेऊ शकतात.जास्तीत जास्त या औषधांचा दिवसभरातून तीनदा १०००mg या प्रमाणात डोस दिला जाऊ शकतो.
ही आयुर्वेदिक औषधे घेताना आहारात पाळावीत अशी पत्थे-
- कावीळ झालेल्या रुग्णांनी या औषधांसोबत ऊसाचा रस,फळांचा रस प्यावा व मनुका खाव्या.या पदार्थांमुळे मूत्राद्वारे बिलीरुबिन बाहेर पडू शकते.याच कारणासाठी कावीळ झालेल्या रुग्णांनी पाणी देखील भरपूर प्रमाणात प्यावे.
- कावीळ झालेल्या रुग्णाने ताक पिणे देखील फायदेशीर आहे.यासाठी अनेक आयुर्वेदिक औषधे ताकासोबत घेण्याचा सल्ला देण्यात येतो.
- तसेच आहारामध्ये ताजी फळे व भाज्यांचा समावेश करा.लिंबू,टोमॅटो व मुळा आहारात अवश्य समाविष्ट करा.
काय खाणे टाळाल-
काविळीचा त्रास पुन्हा उलटू नये म्हणून या ’6′ गोष्टींची काळजी घ्या
संदर्भ-
- Pradhan SL, Pradhan PS. Ayurvedic medicine and anaesthesia. Indian Journal of Anaesthesia. 2011;55(4):334-339. doi:10.4103/0019-5049.84832.
- Verma PC, et al. Pharmacology and Chemistry of a Potent Hepatoprotective Compound Picroliv Isolated from the Roots and Rhizomes of Picrorhiza kurroa Royle ex Benth. (Kutki). Current Pharmaceutical Biotechnology. Volume 10, 6: 641-649, DOI: 10.2174/138920109789069314.
- Sampath Kumar K P, et al. Indian traditional herbs Adhatoda vasica and its Medicinal application. J Chem Pharm Res, 2010, 2(1): 240-245. 2010.
- Sankaranarayanan A S. Folklore medicines for jaundice from Coimbatore and Palghat district of Tamil Nadu and Kerala, India. Ancient Science of Life. Vol No. VII Nos. 3 & 4, January & April 1988, Pages 175 – 179.
- Kumar G, et al. Safety evaluation of an Ayurvedic medicine, Arogyavardhini vati on brain, liver and kidney in rats. J Ethnopharmacol. 2012 Mar 6;140(1):151-60. doi: 10.1016/j.jep.2012.01.004.
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock