दूध हे परिपूर्ण अन्नासमान मानली जाते. यामधून कॅल्शियम, पोटॅशियम, व्हिटामिन डी चा शरीराला पुरवठा होतो. आवडीनुसार काही जण गरम किंवा थंड दूध पितात. पण यापैकी नेमका आरोग्यदायी मार्ग कोणता ? हा प्रश्न तुमच्याही मनात रेंगाळतोय ना.. मग प्रसिद्ध आहारतज्ञ नेहा चंदना यांनी याबाबत दिलेला सल्ला तुम्ही जरूर पहा…
लॅक्टोजचा त्रास होत नसल्यास गरम दूध प्यावे -
गरम दूध पिणे हे पचायला हलके असल्याने ते पिणे फायदेशीर आहे. थंड दूध प्यायचे झाल्यास त्यात सिरेल्स, कॉर्नफ्लेक्स मिसळून खावे. मात्र लॅक्टोजचा त्रास होत असल्यास, दुग्धजन्य पदार्थ पचण्यास त्रास होत असेल तर थंड दूध पिणे टाळा. दूध उकळल्याने त्यातील लॅक्टोजचे विघटन होते त्यामुळे गरम दूध पिणे हा उत्तम मार्ग आहे. अन्यथा पचनाचा त्रास झाल्याने ब्लोटींग किंवा डायरियाचा त्रास होण्याचा संभव असतो.
ग्लासभर गरम दूध प्यायल्याने झोप चांगली येते -
झोपण्यापूर्वी ग्लासभर गरम दूध प्यायल्याने शांत झोप मिळण्यास मदत होते. दूधातील अमिनो अॅसिड सेरोटोनीन आणि मेलाटोनीन या झोप प्रवृत्त करणार्या केमिकल्सची निर्मिती करण्यास मदत करतात. यामुळे शरीर शांत व आरामदायी बनते. गरम दूधामध्ये हळद मिसळल्यास तुम्ही ’7′ आजारांना दूर ठेवू शकता.
पित्त कमी करण्यास थंड दूध प्रभावी -
पित्तामुळे पोटात होणारी जळजळ कमी करण्यास थंड दूध मदत करते. नियमित जेवणानंतर अर्धा ग्लास थंड दूध प्यायल्यास शरीरात निर्माण होणारे पित्त रोखण्यास मदत होते. ( नक्की वाचा – ‘पित्ता’वर विजय मिळवा १० घरगुती उपचारांनी ! )
डीहायड्रेशनचा त्रास कमी करण्यासाठी थंड दूध उत्तम -
ग्लासभर थंड दूध प्यायल्याने डीहायड्रेशनचा त्रास कमी होण्यास मदत होते. सकाळी नाश्त्याच्यावेळी थंड दूध पिणे अधिक फायदेशीर ठरते. मात्र सर्दी-पडशाचा त्रास होत असल्यास थंड दूध पिणे टाळा.
संबंधित दुवे -
दुधासोबत हे चार पदार्थ खाणे टाळलेलेच बरे !
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
Translated By - Dipali Nevarekar
Source – Hot or cold milk– Which one should you drink?
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’पेज व‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या‘फोरम‘ ला भेट द्या.