Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

लहान मुलांना चिकनगुनियापासून दूर कसे ठेवाल ?

$
0
0

देशभरामध्ये सध्या Vector-Borne Diseases प्रकरणे अधिक वाढत आहेत.पावसात वातावरणात निर्माण झालेला ओलसरपणा डास व जिवाणूंच्या वाढीसाठी अत्यंत पोषक असतो.चिकनगुनिया हा एक Arthropod-Borne Viral Disease असून तो Aedes Aegypti या डासांमार्फत संक्रमित होतो.या वर्षी दिल्लीमध्ये या आजाराचे ९६ संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत.हे इनफेक्शन झालेल्या रुग्णांमध्ये महिन्याभरामध्ये तीव्र सांधेदुखी व नैराश्य अशी लक्षणे आढळून येतात.प्रौढांपेक्षा लहान मुले या आजाराला लवकर बळी पडतात.यासाठी वाचा चिकनगुनियामध्ये सांध्यांचे दुखणे कसे कमी कराल ?

बेंगलोरच्या फोर्टीस हॉस्पिटलचे Pediatrician and Neonatologist डॉ.योगेश गुप्ता यांच्यामते लहान मुले चिकनगुनियाला लवकर बळी पडतात कारण लहान मुलांना घराबाहेर खेळणे फार आवडते व बाहेर उघड्यावर चिकनगुनिया आजार पसरवणारे डास असतात.तसेच लहान मुले खेळताना शॉर्ट पॅन्ट,फ्रॉक,कमी बाह्या असलेले शर्ट अथवा फ्रॉक घालतात त्यामुळे सहाजिकच त्यांचे हात-पाय उघडे असल्यामुळे डास याचा फायदा घेतात व त्यांना चावतात. यामुळे लहान मुलांना चिकनगुनिया होण्याची शक्यता अधिक वाढते.यासाठीच देशभरातील डॉक्टर व हेल्द केअर प्रोफेशनल पालकांना मुलांना या आजारपणापासून वाचविण्यासाठी सावधगिरी बाळगण्यास सांगतात.तसेच जाणून घ्या काही विशिष्ट लोकांनाच डास अधिक का चावतात याची ’3′ कारणं !

चिकनगुनियाचे विषाणू शरीरात कसे पसरतात?

जेव्हा Aedes Aegypti डास एखाद्या व्यक्तीला दंश करतात तेव्हा त्यांच्यामार्फत चिकनगुनियाचे विषाणू त्या व्यक्तीच्या त्वचेतून त्याच्या रक्तात संक्रमित होतात.डॉ.गुप्ता यांच्या मते चिकनगुनियाचे विषाणू रुग्णाच्या शरीरात पसरतात व शरीरातील Connective Tissues व Epilithial Cells चे नुकसान करतात.त्यानंतर हे विषाणूंची निर्मिती वाढू लागते व पांढ-या रक्त पेशी हे विषाणू रक्तामध्ये पसरवतात.तसेच जर गर्भवती महिलेला तिच्या प्रसूतीआधी चार दिवस या व्हायरस चे संक्रमण झाले तर मातेकडून बाळाला देखील यांचे संक्रमण होते.

लहान मुलांमध्ये चिकनगुनियाची कोणती लक्षणे आढळतात?

चिकनगुनियाची लक्षणे इनफेक्शन झाल्यानंतर २ ते १२ दिवसांनी दिसू लागतात.या आजाराची लक्षणे अगदी नगण्य ते गंभीर स्वरुपात असतात.डॉ.गुप्ता यांच्या मते मुलांमधील चिकनगुनियाची लक्षणे निरनिराळी असू शकतात.प्रौढांमध्ये मात्र ती काही प्रमाणात एक समान आढळून येतात.

यासाठी जाणून घेऊयात लहान मुलांमध्ये आढळून येणारी चिकनगुनियाची काही लक्षणे-

असे असले तरी एक चांगली गोष्ट म्हणजे मुले या आजारपणातून लवकर बरी होऊ शकतात.डॉ.गुप्ता यांच्या मते लहान मुलांचे सांधे विकसित होत असल्यामुळे त्यांना सांधेदुखीचा त्रास जास्त काळ होत नाही.तसेच चिकनगुनियाचे विषाणू लहान मुलांच्या मांड्या व गुडघ्यासारख्या फक्त मोठ्या सांध्यांवरच हल्ला करत असल्यामुळे वेदना सहन करणे शक्य असते.पण प्रौढांमध्ये मात्र मनगटा सारख्या अगदी लहान सांध्यावर देखील याचा परिणाम होत असल्यामुळे त्यांच्या वेदना असह्य असतात.जाणून घ्या ताप वाढण्यामागील ही ’10′ कारणं तुम्हांला ठाऊक आहेत का ?

लहान अर्भकांचे त्यांच्या आईकडून मिळालेल्या IgG या अॅन्टीबॉडीज मुळे त्यांच्या जन्माच्या सहा महिन्यांपर्यंत प्राणघातक आजारांपासून संरक्षण होत असते.त्यामुळे सहा महिन्यांपेक्षा मोठ्या बाळाची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

लहान मुलांना चिकनगुनिया झाल्यास काय उपचार करावेत?

डॉ.गुप्ता यांच्यामते चिकनगुनिया वर विशेष उपचार उपलब्ध नाहीत.त्यामुळे डॉक्टर प्रथम लहान मुलांचा ताप कमी व्हावा यासाठी त्यांना तापावरील औषधे,डी-हायड्रेशन व पेन किलर्स देतात.तसेच ताप उतरल्यावर रुग्णाला बेड रेस्ट करण्याचा सल्ला देण्यात येतो.कोणत्याही परिस्थितीत यासाठी मुलांना NSAIDs (Non Steroidal Anti Inflammatory Drugs) किंवा Aspirin देऊ नये.कारण ही औषधे ब्लड थिनर्स असतात.अशा रुग्णांना प्लेटलेट चे भयंकर नुकसान झाल्यामुळे नेहमी रक्तस्त्राव होण्याचा धोका असतो.यासाठी वाचा प्रिस्क्रिप्शनशिवाय वेदनाशामक औषधे खरेदी करणे सुरक्षित आहे का ?

डॉ.गुप्ता यांच्यामते पालकांनी अशा वेळी आपल्या मुलाचा ताप कमी व्हावा यासाठी paracetamol देण्याची गरज असते.चिकनगुनिया या विकाराचे डेंग्यू या विकाराशी साधर्म्य आढळून येते.त्यामुळे दोन्हीही प्रकारामध्ये हायड्रेशन फार गरजेचे आहे.जर मुलांचा ताप उतरत नसेल व त्यांना इतर त्रास होत असेल तर त्वरीत तुमच्या मुलांना डॉक्टरकडे घेऊन जा.तसेच जाणून घ्या ताप आल्यानंतर कधी घ्यावा डॉक्टरांचा सल्ला ?

शास्त्रज्ञांकडून चिकनगुनियावर नवीन लस विकसित करण्यात आली आहे.मात्र त्या लसीमुळे रुग्णाची सांधेदुखी अधिक तीव्र होत असल्यामुळे या लसीच्या प्रभावाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

लहान मुलांना चिकनगुनिया होऊ नये यासाठी काय काळजी घ्याल?

डॉ.गुप्ता यांच्या मते इतर आजारपणा प्रमाणेच चिकनगुनियावर देखील आजारपणानंतर उपचार करण्यापेक्षा आधीच प्रतिबंधानत्मक काळजी घेणे योग्य ठरेल.यासाठी चिकनगुनिया पसरवण्या-या डासांपासून दूर रहा.यासाठी वाचा डासांना पळवून लावा या ’10′ नैसर्गिक उपायांनी !

  • डासांना दूर ठेवण्यासाठी योग्य ते उपाय करा.यासाठी वाचा Mosquito repellent cream वापरणं फायदेशीर आहे का ?
  • घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा व त्या भागात पाणी साठणार नाही याची देखील योग्य ती काळजी घ्या.घराच्या आजूबाजूला साठलेल्या कच-याची योग्य विल्हेवाट लावा.
  • लहान मुलांना फुलबाह्यांचे शर्ट व फुलपॅन्ट घालूनच घराबाहेर खेळायला पाठवा.
  • तुमच्या मुलांना हलक्या रंगाचे कपडे घाला कारण डास गडद कपड्यांकडे आकर्षित होतात.

काही घरांमध्ये फक्त संध्याकाळी अथवा झोपताना Mosquito Repellents वापरले जाते.मात्र लक्षात ठेवा Aedes Aegypti डास दिवसा फिरत असतात.चिकनगुनिया पासून वाचण्यासाठी दिवसा देखील डासांना पळवून लावण्यासाठी योग्य उपाययोजना करा.कारण मुलांना चिकनगुनिया मधून बरे होण्यास कमीत कमी ७ ते १० दिवस लागू शकतात.यासाठी कडूलिंब – डास दूर करण्याचा परिणामकारक नैसर्गिक उपाय ! जरुर करा.

  Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles