Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

गर्भपात टाळण्यासाठी या ५ कारणांबाबत सावध रहा.

$
0
0

स्त्रीला तिच्या इच्छेनूसार गर्भपात करुन घेण्याचा अधिकार जरी असला तरी कधीकधी तिची इच्छा नसूनही काही कारणांमुळे तिला अचानक मिसकॅरेजला सामोरे जावे लागू शकते.मुंबईच्या कोहनूर हॉस्पिटलचे कन्सल्टंट गायनेकॉलॉजिस्ट डॉ.गणपत सावंत यांच्यामते कधीकधी अचानक काही शारीरिक व रोगप्रतिकारक समस्यांमुळे एखाद्या स्त्रीचा अचानक गर्भपात होऊ शकतो.ब-याचदा मिसकॅरेज गर्भधारणेच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये होण्याची शक्यता असते.यासाठी वाचा गर्भारपणाच्या पहिल्या तीन महिन्यात कोणती काळजी घ्याल ?

जाणून घेऊयात अचानक मिसकॅरेज होण्याची काही कारणे-

१.Chromosomal abnormalities(गुणसूत्रांमधील विकृती)-ब-याचदा मिसकॅरेज होण्याचे कारण माता-पित्यांच्या गूणसूत्रांमध्ये असलेली विकृती असू शकते.जीन्समध्ये झालेल्या बदलांमुळे असे घडू शकते.तसेच जाणून घ्या या 7 कारणांमुळे वाढते Preterm Labour ची शक्यता

.Immunological problems(रोगप्रतिकार समस्या)-ब-याचदा मातेची रोगप्रतिकार शक्ती फॉरेन बॉडीच्या स्वरुपात पित्याच्या शरीरातील पेशींचे परिक्षण करुन त्यावर हल्ला करते.त्यामुळे गर्भाची वाढ न होता गर्भपात होण्याची शक्यता वाढते.अनेकदा माता-पित्यांचा Rh निराळा असल्यामुळे देखील असे घडू शकते.यासाठी मिसकॅरेज टाळण्यासाठी ५ आयुर्वेदिक उपाय ! जरुर करा.

३.गर्भाशयामधील दोष -फायब्राइड,Uterine perforation,इनफेक्शन व वेगळे गर्भाशय असणे अशा शरीरातील आंतरिक समस्यांमुळे गर्भधारणा टिकून  रहाणे कठीण होते व गर्भपात होतो.इनफेक्शन व गर्भाशय कमजोर असणे यामुळे देखील गर्भाची वाढ होणे कठीण होते व त्यामुळे अशा स्थितीमध्ये मिसकॅरेज होण्याची शक्यता वाढते.यासाठी जाणून घ्या गर्भाशयातील फायब्राइडस,पॉलिप्स व सिस्ट यामध्ये नेमका काय फरक आहे?

४.इन्डोक्राइन किंवा हॉर्मोनल समस्या- गर्भधारणे दरम्यान स्त्रीचे आरोग्य उत्तम असावे असे यासाठीच सांगितले जाते.मधूमेह,थायरॉईड किंवा इतर इन्डोक्राइन किंवा हॉर्मोनल समस्या यामुळे गर्भधारणेच्या सुरुवातीलाच मिसकॅरेज होण्याचा धोका वाढतो.यासाठी गरोदरपणातील थायरॉईडची समस्येबाबत या 5 गोष्टी नक्की जाणून घ्या.

५.Hematological reasons-अनेकदा Thrombosis सारख्या रक्ता संबधित विकारांमुळे देखील गर्भधारणेच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये  गर्भपात होण्याची शक्यता वाढते.तसेच रक्त गोठू नये यासाठी घेण्यात येणारी औषधे देखील गर्भपाताचे कारण होऊ शकतात.यासाठी वाचा मासिकपाळी की गर्भपात – नेमका कशामुळे होतोय रक्तस्त्राव हे कसं ओळखाल ?

डॉ.सावंत यांच्या मते वरील कारणे गर्भपातासाठी कारणीभूत असली तरी लक्षात ठेवा ब-याचदा गर्भपाताचे नेमके कारण समजणे कठीण असू शकते.जर एखाद्या महिलेला एकदा किंवा दोनदा मिसकॅरेजला सामोरे जावे लागले असेल तर तिने पुन्हा गर्भधारणेसाठी प्रयत्न करण्यापूर्वी गर्भपाताचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी संपूर्ण आरोग्य तपासणी करुन डॉक्टरांचा अचूक सल्ला घेणे आवश्यक आहे.यासाठी वाचा गर्भपातानंतर पुन्हा बाळासाठी प्रयत्न करण्यापुर्वी करा या ५ डायग्नोस्टीक टेस्ट

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>