Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

बलात्कार्‍याचे गुप्तांग कापणं या शिक्षेने बलात्कार कमी होऊ शकतात का ?

$
0
0

केरळमधील २३ वर्षीय मुलीने तिच्यावर जबरदस्ती करणा-या साधूचे गुप्तांग कापल्याच्या बातमीने शहरामध्ये खळबळ निर्माण झाली होती.या घटनेबाबत समाजातून मिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या गेल्या.या घटनेमधील गुन्ह्याचा तपशील कमी होऊन तिच्या बद्दल समाजामधून सहानूभुती अधिक प्रमाणामध्ये व्यक्त करण्यात आली.केरळ महिला आयुक्तांनी या महिलेच्या कृतीबाबत अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.एवढेच नाही तर केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी देखील तिच्या या धाडसी कृतीचे कौतुकच केले.मात्र सर्वांनीच या घटनेला चांगला प्रतिसाद दिला नाही.माजी खासदार व केंद्रिय मंत्री शशी थरुर यांनी या महिलेला अटक करण्याची मागणी केली.

काही असले तरी ही घटना न्यायव्यवस्थेला विरोध दर्शविते.जगातील सर्वात मोठ्या लोकशाही मध्ये लोकांना न्याय मिळवण्यासाठी स्वत:च निर्णय घ्यावा लागत असल्याचे यातून दिसून येते.आपल्याला या घटनेबाबत वादविवाद करायचा नाही.देशभरातील प्रत्येक बलात्काराच्या घटनेनंतर मग ती निर्भया केस,जिशा मर्डर केस असो अथवा नुकतीच घडलेली रोहतक रेप आणि मर्डर केस असो प्रत्येक केस मध्ये समाजातून गुन्हेगारांना दंड करण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे.या संदर्भात एक ३० वर्षांच्या एका आईचे मत असे की अशा लोकांचे निर्बिजीकरण करावे ज्यामुळे भविष्यामध्ये पुन्हा असा अपराध इतर कोणीही करणार नाही.तर काही लोकांच्या मते जर बलात्कार करणारे त्यांच्या या अवयवाचा दुरुपयोग करीत असतील तर समाजाने त्यांचा हा अवयवच त्यांच्यापासून काढून घेतला पाहिजे.सोशल मिडीयावर देखील याबाबत पुरुषत्व गमावण्याच्या भितीमुळे भविष्यामध्ये समाजात  बलात्काराची प्रकरणे कमी होतील अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. यासाठी नक्की वाचा बघ्याची भूमिका सोडा आणि डॉली देखमुखप्रमाणे एक पाऊल पुढे या !

याबाबत तज्ञांचे काय मत आहे हे जाणून घेऊयात-

यामुळे भविष्यात बलात्काराचे प्रमाण कमी होईल का?

हिंदूजा नॅशनल हॉस्पिटलचे सायक्रायटीस्ट व कन्सल्टंट Dr Kersi Chavda यांच्या मते सेक्शुअल इच्छा ही एक शक्तीशाली व बायोलॉजिकल इच्छा असून रेपिस्ट त्यावर मात करु शकत नाहीत.निर्भया बलात्कार प्रकरणानंतर काही महिने जनतेमधून प्रचंड संताप व्यक्त केला जाऊन देखील परिस्थिती बदलली नाही.कारण त्यानंतर देखील अनेक बलात्काराच्या घटना घडल्या.जनमानसामध्ये असलेल्या या संतापामुळे भविष्यामध्ये सुधारणा व्हावी अशी आशा आहे.मात्र निर्भया केसमधील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झाल्यावर देखील बुलंदशहर गॅन्ग रेप किंवा रोहतक हत्याप्रकरणे घडली आहेत.

Dr Kersi Chavda यांच्यासह डॉ.हॅपी लाइफच्या लाइफ कोच Manisha Lomash यांच्या मते या प्रकरणामध्ये गुन्हेगाराला असा दंड देऊन काहीही होणार नाही.कारण बलात्कारी कधी बलात्कार करतात हे निश्चित सांगता येऊ शकत नाही.त्यामुळे  या क्लिष्ट समस्येकडे पहाण्याचा हा मार्ग योग्य नाही.

असे करुन आपण गुन्हेगाराला पुन्हा बलात्कार करण्यापासून थांबवू शकतो का?

Dr Kersi Chavda यांच्यामते असे निश्चित करता येऊ शकते.सेक्शुअल अवयव नसल्यास रेपिस्टला सेक्शुअल इच्छा अथवा त्या शमविण्याचे साधन प्राप्त होऊ शकत नाही.पण त्यामुळे तो इतर माध्यमातून महिलांना त्रास देऊ शकतो.कदाचित गुन्हेगार लैगिंकदृष्या असक्षम झाल्यामुळे महिलांवर हल्ला करु शकतो.अशा मुळे त्यांचा हिंसाचार वाढण्याची अधिक शक्यता असू शकते.पंरतू हे सर्वस्वी त्या गुन्हेगारावर अवलंबून असल्यामुळे प्रत्येक केसमधील प्रतिक्रिया निरनिराळी असू शकते.

या समस्येला सोडविण्याचा तर्कशुद्ध उपाय कोणता आहे ?

Manisha Lomash यांच्यामते या समस्येची मुळे समाजामध्ये खोलवर रुतलेली आहेत.त्यामुळे ही समस्या सोडविण्यासाठी त्याकडे व्यापक दृष्टीकोनातून पहाण्याची गरज आहे.जोपर्यंत याबाबत समाजाचा दृष्टीकोन बदलत नाही तोपर्यंत अशा घटना घडतच राहतील.सुरक्षित समाज निर्माण करण्यासाठी मुला-मुलींना प्रशिक्षित करणे,लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे, पालक व शिक्षकांनी योग्य संदेश देणे फार गरजेचे आहे.

तसेच जाणून घ्या सोशल मीडिया वर स्त्रीची होणारी अवहेलना कधी थांबणार ?

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>