स्वाइन फ्लू च्या भितीपोटी अनेक जण हा आजार टाळण्यासाठी वेगवेगळे उपाय शोधत असतात.जरी स्वाइन फ्लू या आजारापासून वाचण्यासाठी अथवा स्वाइन फ्लू बरा करण्यासाठी कोणताही विशिष्ट आहार नसला तरी स्वाइन फ्लू इनफेक्शन टाळण्यासाठी रोग प्रतिकारशक्ती वाढवणे हे नक्कीच फायदेशीर ठरते.यासाठी जाणून घ्या स्वाइन फ्लू पासून बचावण्यासाठी कोणता आहार घ्यावा तसेच कोणते पदार्थ खाणे टाळावे.तसेच जाणून घ्या स्वाइन फ्लू रोखण्यासाठी हे खबरदारीचे उपाय.
स्वाइन फ्लू टाळण्यासाठी काय खाल ?
- व्हिटॅमिन डी युक्त पदार्थ-Sanjay Gandhi Postgraduate Institute of Medical Sciences व National Institute of Virology यांच्या संयुक्त सहाकार्याने करण्यात आलेल्या एका अभ्यासानूसार आहारामध्ये व्हिटॅमिन डी युक्त पदार्थ वाढवल्याने स्वाइन फ्लूचा धोका कमी करता येतो.पुरेश्या प्रमाणात सुर्यप्रकाश मिळाल्यास देखील स्वाईन फ्लू होण्याची शक्यता कमी होते.व्हिटॅमिन डी मुळे H1N1 या विषाणूचा Inflammatory Response कमी करण्यास मदत होते.तसेच तुमच्या मुलांना स्वाईन फ्लूपासुन बचावण्यासाठी ’10′ मह्त्त्वपूर्ण टीप्स जरुर करा.
- ज्या लोकांपर्यंत तापाच्या लस उपलब्ध होत नाहीत त्यांना डॉक्टर व्हिटॅमिन डी च्या गोळ्या घेण्याचा सल्ला देतात.व्हिटॅमिन डी मुळे श्वसनाचे इनफेक्शन होण्याचा धोका कमी होतो व इन्फ्लूएन्झा विरुद्ध लढण्यास मदत होते.मशरुम या भाजी मध्ये व्हिटॅमिन डी मोठ्या प्रमाणावर असते.तर मांसाहारी आहारात Salmon, Sardines व अंड्याचा पांढरा भाग या पदार्थांमधून मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन डी प्राप्त होते.स्वाइन फ्लू टाळण्यासाठी डॉक्टर या आहारासोबत आठवड्यातून तीनदा दिवसभरात २० मिनीटे सुर्यप्रकाशात रहाण्याचा सल्ला देतात.जाणून घ्या चिकन खाल्ल्याने स्वाईन फ्लू होतो का ?
- रोग प्रतिकारशक्ती वाढवणारे पदार्थ-रोगप्रतिकार शक्ती मजबूत असल्यास आजारांपासून वाचणे सहज शक्य होते.व्हिटॅमिन ए,व्हिटॅमिन बी व व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांमुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.तसेच यासाठी तुमच्या आहारामध्ये झिंक व सेलेनियम असणे गरजेचे आहे.यासाठी तुमच्या आहारामध्ये ब्राऊन राईस,सनफ्लॉवर सीड्स,मांस व Crustaceans या पदार्थांचा समावेश करा.तसेच आलं व लसूण या पदार्थांमध्ये अॅन्टीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असल्यामुळे टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास चांगली मदत होईल.
- प्रोबायोटीक्स-आहारामध्ये दूध व दह्यासारखे प्रोबायोटीक्स असणे गरजेचे आहे.प्रोबायोटीक्स मुळे आतड्यांमध्ये चांगले जिवाणू तयार होतात जे पचनास मदत करतात.या पदार्थांमुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती देखील वाढते.तसेच या पदार्थांमुळे पोटामध्ये हानिकारक जिवाणू तयार होत नाहीत.
स्वाइन फ्लू टाळण्यासाठी काय खाणे टाळाल?
स्वाइन फ्लू हा आजार संक्रमित व्यक्तीच्या शिंक अथवा खोकल्याद्वारे हवेतून प्रसारित होतो.लक्षात ठेवा हा आजार अन्नातून संक्रमित होत नसून हातामधील जीवजंतूद्वारे पसरला जाऊ शकतो.असे असले तरी चांगले शिजवलेले व हेल्दी पदार्थ खा ज्यामुळे तुमच्या रोगप्रतिकारशक्तीवर विपरित परिणाम होणार नाही.
स्वाइन फ्लू व्हिडियो: स्वाइन फ्लूची ही लक्षणं वेळीच जाणा आणि धोका टाळा
स्वाइन फ्लू झाल्यास काय खाल?
- ताप कमी व्हावा यासाठी पुरेश्या प्रमाणात पाणी व फळांचा रस प्या.तापामुळे डी-हायड्रेशन होऊ शकते यासाठी तापामध्ये हायड्रेट रहाण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा.काही लोकांना स्वाइन फ्लू मध्ये उलटी,मळमळ व डायरियाचा देखील त्रास होतो.
- जर तुम्ही तापाने बेजार झाला असाल तर भरपूर ताज्या भाज्या,फळे व तृणधान्ये आहारातून घ्या.कारण या पदार्थांमध्ये फायटोकेमिकल्स असतात ज्यामुळे तुम्ही लवकर बरे होऊ शकता.व्हायरल इनफेक्शन पासून लढण्यासाठी या पदार्थांमधील झिंक व पोटॅशियम मधून तुम्हाला अॅन्टीबॉडीज व मिनरल्स मिळतात.
न्यू दिल्लीच्या मॅक्स सूपर स्पेशलिटी हॉस्पिटलचे Sr Consultant- Internal Medicine डॉ.विनीत अरोरा यांच्यामते जर तुम्हाला ताप आला असेल तर रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ताजी फळे,भाज्या व प्रोटीनयुक्त पदार्थ खाणे आवश्यक आहे.तसेच ताप व खोकला असल्यास घरी शिजवलेले अन्नच खाणे गरजेचे आहे.तसेच वाचा स्वाइन फ्लूच्या नेमक्या लक्षणांची तुम्हाला माहिती आहे का ?
स्वाइन फ्लू झाल्यास काय खाणे टाळाल?
- डॉ.विनीत अरोरा यांच्या मते ताप आल्यास बाहेरील व रस्त्यावरील पदार्थ खाणे टाळा.
- गोड पदार्थ व साखर असलेले पेय घेतल्यामुळे तुम्हाला डायरिया होऊन तुम्ही आणखी आजारी पडू शकता.
- ताप आल्यावर कॅन फूड व प्रक्रिया केलेले पदार्थ देखील खाऊ नयेत.
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य : Shutterstock