पावसाळ्याचे दिवस म्हटले की आजारपण आलं, पचनाचे विकार आलेच. अनेकांना दुषित पाण्यामुळे, हवामानातील बदलांमुळे, पोटदुखीचा, डायरियाचा त्रास होतो. अशा खाणं नकोसं वाटतं पण औषधांना सकारत्मक प्रतिसाद देण्यासाठी आणि शरीरात उर्जा टिकून राहण्यासाठी डायरिया त्रास होत असला तरीही खात राहणं गरजेचे आहे. पण अशावेळी पोटाला आधार मिळेल असे हलकेफुलके खात राहणे गरजेचे आहे. अनेकजण खिचडी, पेज, दही भात यांचा आहारात समावेश करतात.पूर्ण अन्न समजले जाणारे दूधाचे सेवन केल्याने त्रास होतो का ? याबाबतचा खास सल्ला फॅमिली फिजिशिएन Dr Krishnakant Debri यांनी दिला आहे.
दूध हे पूर्ण अन्न मानले जाते त्यामुळे अनेकजण पोट बिघडल्यानंतर किंवा डायरियाचा त्रास होत असल्यास दूध पितात. अनेकजण दह्याचीही निवड करतात.दही पचायला हलके असते. दह्यामुळे पोटात थंडावा निर्माण होण्यास मदत होते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसातही दही खाणं अनेकांना आवडते. तर योगर्ट हे प्रोबायोटिक आहे. यामध्ये चांगल्या बॅक्टेरियांचा समावेश केलेला असतो. यामुळे डायरिया, डिहायड्रेशनचा त्रास आटोक्यात आणण्यास मदत होते.नक्की वाचा - डायरियाचा त्रास कमी करतील हे ’5′ घरगुती उपाय !
अनेकजणांना दूध आवडत नसल्याने पोट बिघडल्यानंतरही दूध पिणं ही त्यांची पसंद नसते. त्यामुळे डायरियाचा त्रास होत असेल तर दूधाऐवजी दह्याची निवड करतात. डायरियाचा त्रास होत असल्यास कसा असावा आहार ? हेदेखील नक्की जाणून घ्या.
काही लोकांना लॅक्टोजचा त्रास असतो. त्यामुळे दूध न पिण्याचा सल्ला दिला जातो. कारण lactose intolerant लोकांमध्ये त्रास अधिकच बिघडून उलट्या होणं, पातळ शौचाला होणं हा त्रास वाढू शकतो. लॅक्टोजचा त्रास होणार्यांमध्ये चीझ, पनीर, दूधाच्या मिठाया, मिल्क चॉकलेट खाणं टाळा. त्यामधील मिल्क प्रोटीन आरोग्यावर गंभीर परिणाम करतात. आणि हे जीवघेणंदेखील ठरू शकतं. बाळाला होणारा जुलाबाचा त्रास हा प्रत्येक वेळेस डायरिया नसतो !
डायरियाचा त्रास होत असल्यास ताक, दही हे दूधाच्या तुलनेत अधिक फायदेशीर आहे. यामुळे पोटाचे आरोग्य जपण्यासाठी मदत होते. डॉ. डेब्री यांच्या सल्ल्यानुसार, ORS (oral rehydration syrups) इलोक्ट्रोलेट पावडर यांचा वापर करणं अधिक फायदेशीर आहे. यामुळे डायरियाचा त्रास कमी करण्यास मदत होते.
Read this in English Translated By – Dipali Nevarekar छायाचित्र सौजन्य – Shutterstock