गरोदरपणात स्त्रीच्या शरीरात अनेक बदल होतात.बाळंतपणानंतर पुढे देखील यातील काही बदल जाणवत रहातात.बाळंतपणानंतर शरीर पूर्ववत होताना देखील काही आरोग्य समस्यांना स्त्रीयांना तोंड द्यावे लागते.त्यापैकी एक समस्या म्हणजे प्रसूतीनंतर होणारी Urinary tract infection ही समस्या.
युरिनरी ट्रॅक इनफेक्शन म्हणजे मूत्राशय व मूत्रमार्गामध्ये इनफेक्शन होणे.हे इनफेक्शन सामान्यत: मूत्रमार्गातून जंतू मूत्राशयात शिरल्यामुळे होत असते.कधीकधी हे इनफेक्शन किडनीमध्ये पसरुन किडनीला देखील हे इनफेक्शन होते.
बाळंतपणानंतर UTI (युरिनरी ट्रॅक इनफेक्शन) ही समस्या होण्याची काय कारणे असतात?
पुरुषांपेक्षा(२० सेमी) महिलांचा( ४ सेमी) मूत्रमार्ग लहान असतो त्यामुळे त्यांच्या मूत्राशयाला जंतूचा संसर्ग लवकर होऊ शकतो.त्यामुळेच UTI ही समस्या पुरुषांपेक्षा महिलांना मोठ्या प्रमाणावर होते.तसेच गरोदरपणामुळे ही समस्या महिलांना होण्याची शक्यता अधिक वाढते.
पेल्विक भागातील स्नायूंमुळे मूत्रमार्गातून बाहोर पडणा-या मूत्रावर नियंत्रण ठेवता येते.प्रसूती दरम्यान या भागातील व ओटीपोटातील स्नायूंसह मज्जातंतू व स्नायूबंधावर अतिरिक्त ताण येतो.प्रसूतीकाळात झालेल्या अति श्रमामुळे प्रसूतीनंतर या स्नायूंची व स्नायूंबंधाची कार्यक्षमता कमी होते.प्रसूतीदरम्यान मूत्राशयावर देखील ताण आल्यामुळे अनेक स्त्रीयांना लघवीबाबत समस्या निर्माण होतात.मूत्राशय पूर्ण रिकामे होऊ न शकल्यामुळे त्यामध्ये लघवी साचून रहाते.मूत्राशयामध्ये लघवी साचून राहिल्यामुळे त्या भागात जंतू निर्माण होऊन इनफेक्शन होण्याची दाट शक्यता असते.यासाठी नक्की वाचा दही – युरिनरी ट्रॅक इंफेक्शनवर घरगुती उपाय!
UTI या समस्येची लक्षणे-
- मूत्राशय व मूत्रमार्गात दाह होणे.
- पोटात व पेल्विक भागात वेदना होणे.यासाठी जाणून घ्या या ’7′ कारणांमुळे स्त्रियांच्या पेल्विक भागात वेदना जाणवतात !
- लघवी करण्याची तीव्र इच्छा होणे पण लघवी थेंब थेंब गळणे.
- सतत लघवीला होणे.
- लघवी करताना जळजळ होणे.
- लघवी करताना दुर्गंध येणे.
- शरीरामध्ये वेदना,ताप व थकवा.तसेच युरीन इंफेक्शनची ’6′ लक्षणं ! अवश्य पहा.
UTI या समस्येवर काय उपचार करावेत?
युरीनरी ट्रॅक इनफेक्शन या समस्येवर सामान्यत: अॅन्टी बायोटिक्सने उपचार केले जातात.काही गंभीर स्थितीमध्ये Intravenous drip सह अॅन्टीबायोटिक्स घेण्याचा सल्ला देण्यात येतो.जर तुम्ही स्तनपान करणा-या माता असाल तर डॉक्टर त्यानूसार तुम्हाला अॅन्टीबायोटिक्स देतात. तसेच Antipyretics ने ताप कमी केला जातो व शारीिरक वेदनेवर पेन किलर्स देण्यात येतात.यासाठी वाचा युरिनरी ट्रॅक इनफेक्शन या समस्येमध्ये बरे वाटू लागल्यास अॅन्टीबायोटिक्स घेणे बंद केले तर चालेल का?
UTI या समस्या होऊ नये यासाठी कोणती प्रतिबंधनात्मक काळजी घ्यावी?
- भरपूर प्रमाणात पाणी प्या त्यामुळे मूत्रमार्गातील बॅक्टेरियाचा वेळच्या वेळी निचरा होईल.
- क्रॅनबेरीचा रस प्या.या रसामुळे UTI या समस्येला प्रतिबंध होतो हे शास्त्रीय दृष्या सिद्ध झाले आहे.
- भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी युक्त फळे खा.त्यामुळे तुमच्या लघवीमध्ये पुरेश्या प्रमाणात अॅसिड निर्माण होते व इनफेक्शन निर्माण करणारे जंतू कमी केले जातात.
- स्वच्छतागृहांमध्ये योग्य ती स्वच्छता बाळगा.मासिक पाळीमध्ये टॅम्पॉन चा वापर टाळा व सॅनिटरी पॅड नियमित बदला.यासाठी जाणून घ्या सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या वापरामुळे युरिनरी इन्फेकशन व लैंगिक आजार होतात का?
- गुप्तांगावर जेल व क्रीम सारखी सुगंधित सौदर्यप्रसाधने लावणे टाळा.कारण त्यामुळे युटीआय समस्या होण्याची शक्यता वाढते.
- सैल कपडे वापरा ज्यामुळे तुमचे गुप्तांग कोरडे राहील व त्यामध्ये जंतु निर्माण होणार नाहीत.
- सेक्स दरम्यान काळजी घ्या.सेक्सनंतर लघवी झाल्यास गुप्तांगाची स्वच्छता राखा.इंटरकोर्स नंतर देखील गुप्तांग स्वच्छ पाण्याने धुवा.
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock