पाऊस आल्याबरोबर काही आजार घेऊन येतो. असं म्हणण्यापेक्षा आपल्या काही चुकीच्या सवयींमुळे पावसाळी आजारांची लागण आपल्याला होते. परंतु, स्वच्छता राखण्यास, विशेष काळजी घेतल्यास आपण या आजारांपासून सुरक्षित राहू शकतो. पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी 10 आयुर्वेदिक टिप्स !
पावसाळ्यात जागोजागी साचलेले पाणी, अस्वच्छता यामुळे डास होतात. अगदी छोटा दिसणारा डास पण यामुळे डेंग्यू, मलेरिया किंवा चिकनगुनिया यांसारखे गंभीर आजार होऊ शकतात. डासांना पळवून लावण्यासाठी तुम्ही केमिकल repellent किंवा इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसचा वापर करू शकता. परंतु, कडूलिंब हा डासांना पळवून लावण्याचा नैसर्गिक आणि परिणामकारक उपाय आहे. डासांना पळवून लावा या ’10′ नैसर्गिक उपायांनी !
- कडूलिंबाचा कसा उपयोग होतो?
डासांना दूर ठेवण्यासाठी कडूलिंब आणि खोबरेल तेलाचे मिश्रण शरीराला लावा, असे the Journal of American Mosquito Control Association च्या अभ्यासात सांगितले आहे. कडूलिंबात antiprotozoal कंपाऊंड असल्याने त्यातून काहीसा वेगळा वास येतो. परिणामी डास दूर जातात. तसंच कडूलिंबाचे काही दुष्परिणाम नाहीत. त्यात असलेल्या अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्मांमुळे डास चावल्यामुळे होणारी खाज व जळजळ कमी होते. डासाच्या डंखाचा त्रास दूर करेल केळ !
- कडूलिंबाचा वापर कसा करावा ?
चमचाभर खोबरेल तेलात १ चमचा कडूलिंबाचे तेल मिसळा. हे मिश्रण झोपण्यापूर्वी त्वचेला लावा. त्यामुळे डास चावणार नाहीत. हे मिश्रण नैसर्गिक आणि सुरक्षित असल्याने तुम्ही मुलांसाठी देखील याचा वापर करू शकता. परंतु, तरी देखील तुम्हाला शंका असेल असेल तर त्वचेच्या काही भागाला हे मिश्रण लावून कडूलिंबाची अॅलर्जी आहे की नाही ते तपासा. परंतु, कडूलिंबाच्या वेगळ्या वासाने त्रास होत असल्यास तुम्ही neem oil diffuser देखील वापरू शकता. त्यासाठी diffuser मध्ये कडूलिंबाच्या तेलाचे २- थेंब घाला आणि खोलीच्या एका कोपऱ्यात ठेवा किंवा बेडखाली देखील ठेऊ शकता. त्यामुळे डासांपासून तुमचे संरक्षण होईल.
Mosquito repellent cream वापरणं फायदेशीर आहे का ? जाणून घ्या. मुलांना किंवा कोणालाही या क्रिम्समुळे त्रास होत असेल तर हा नैसर्गिक उपाय नक्की करून बघा.
तुम्ही बघितलं असेल किंवा अनुभवलं असेल की डास काही ठराविक लोकांना अधिक चावतात. याचे नेमके कारण काय ? जाणून घेऊया : काही विशिष्ट लोकांनाच डास अधिक का चावतात याची ’3′ कारणं !
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock