भारतीय खाद्यसंस्कृतीला खरी चव येते ती ‘मसाल्यां’मुळे ! पदार्थ चविष्ट करण्यासोबतच सेक्सलाईफची रंगत वाढवण्याची क्षमता काळामिरीमध्ये आहे. जगभरात काळामिरी प्रामुख्याने वापरली जाते. त्याची तिखट चव पदार्थांना चव देण्यास मदत करते. अनेक मसाल्यांपैकी काळामिरीमध्ये मात्र कर्करोगाची शक्यता कमी करण्याची क्षमता असल्याचे संशोशनातून सामोरी आले आहे.
आरोग्यदायी काळामिरी -
काळामिरीमध्ये अॅन्टीऑक्सिडंट घटक मुबलक असल्याने शरीरातील फ्री- रॅडीकल्सचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत होते. शरीरातील फ्री रॅडीकल्स कमी झाल्यास कॅन्सरची शक्यतादेखील आपोआपच कमी होते. पॉलिफेनॉल्स डीएनएचा अनेक कॅन्सरपासुन बचाव करण्यास मदत करतात. काळामिरीमुळे शरीरात कॅन्सरच्या पेशींची वाढ रोखण्यास मदत होते. तसेच त्याचा प्रसार रोखण्याची शक्यतादेखील कमी होते. काळामिरीमधील पिपेरिन घटक ब्रेस्ट कॅन्सर रोखण्यास मदत करतात.
कशी वापराल काळामिरी -
काळामिरी अनेक पदार्थांमध्ये मिसळता येते. सकाळच्या लिंबू-मध पाण्यामध्ये चिमूटभर काळामिरीची पूड मिसळा. सलाड, ज्युस, छास रायता यामध्ये तुम्ही मिरपूड मिसळू शकता. तसेच जेवणातही तुम्ही मिरपूड मिसळू शकता.
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
Translated By - Dipali Nevarekar
Source - This common table-spice can help prevent cancer
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’पेज व‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या‘फोरम‘ ला भेट द्या.
References:
- Jayakumar, R., & Kanthimathi, M. S. (2012). Dietary spices protect against hydrogen peroxide-induced DNA damage and inhibit nicotine-induced cancer cell migration. Food chemistry, 134(3), 1580-1584.
- Kakarala, M., Brenner, D. E., Korkaya, H., Cheng, C., Tazi, K., Ginestier, C., … & Wicha, M. S. (2010). Targeting breast stem cells with the cancer