महाराष्ट्रभरात जसा पावसाचा जोर धरायला सुरवात झाली आहे तसे आजारपणही वाढत आहे. स्वाईन फ्लूचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. समाजात स्वाईन फ्लू या आजाराबाबत अनेक समज-गैरसमज असल्याने स्वाईन फ्लूवर नियंत्रण मिळवणंही कठीण होत आहे. स्वाईन फ्लू या नावामुळे अनेकजण चिकन, मांसाहार खाणं टाळत आहेत. स्वाईनवर नियंत्रण मिळवण्यासाठी आहाराकडे लक्ष देणं गरजेचे असले तरीही मांसाहार सोडणं हा काही त्यावरील उपाय नाही. चिकन खाल्ल्याने खरंच स्वाईन फ्लूचा प्रसार वाढतो का ? या तुमच्या मनातील प्रश्नाला आहारतज्ञ नेहा चंदना यांनी दिलेले हे खास उत्तर नक्की जाणून घ्या.
अनेकांना स्वाईन फ्लू पसरण्याचे एक कारण हे चिकन खाणं हेदेखील वाटते. बर्ड फ्लू किंवा H1N5 virus चा संबंध चिकनशी असतो. 2005 साली बर्ड फ्लूची लाट आली होती. स्वाईन फ्लू H1N1 मुळे पसरतो. हा केवळ माणसांद्वारा पसरतो आणि बर्ड फ्लूचा धोका दुषित चिकन खाल्ल्याने होतो. स्वाइन फ्लूच्या नेमक्या लक्षणांची तुम्हाला माहिती आहे का ?
H1N1 चा व्हायरस ज्या मनुष्याच्या शरीरात असेल त्याच्या शिंकण्याने किंवा खोकल्याने तो हवेत पसरतो. आणि अशाप्रकारे बाधित हवेच्या संपर्कात आलेल्या इतर निरोगी लोकांनाही स्वाईन फ्लूची बाधा होऊ शकते. स्वाईन फ्लूचे व्हायरस हवेच्या माध्यमातून पसरतात ते अन्नातून मानवी शरीरात प्रवेश करू शकत नाहीत.हेल्दी चिकन सूपची टेस्टी रेसिपी पहा आणि या ’7′ आरोग्यदायी कारणांसाठी जरूर मारा ‘चिकन’वर ताव !
चिकन जेव्हा 60 डिग्री किंवा अधिक तापमानामध्ये शिजवल्यास त्यामधील व्हायरस आणि बॅक्टेरियादेखील इनअॅक्टीव्ह होतात. त्यांचे सेवन अधिक सुरक्षित ठरते. चिकन खाण्यापूर्वी ते व्यवस्थित शिजवणं गरजेचे आहे. केवळ स्वाईन फ्लूच्या दृष्टीने नव्हे तर त्यामध्ये salmonella, E.coli यासारखे अनेक त्रासदायक कीटाणू असतात. मांसाहार कच्च्या स्वरूपात खाणं हे आरोग्यासाठी अनेक प्रकारे त्रासदायक ठरू शकते. स्वाइन फ्लू रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय नक्की लक्षात ठेवा
मांसाहार आरोग्याला त्रासदायक ठरू नये याकरिता ते सुरक्षितपणे बनवणं आणि शिजवणंदेखील गरजेचे आहे.
- रेडी टू इट मीट आणि कच्चा मांसाहार हा वेगवेगळा ठेवावा.
- हात धुतल्याशिवाय रॉ मीट म्हणजेच कच्च्या मांसाहाराला हात लावू नका. तसेच रॉ मीट / मांसाहार साफ केल्यानंतरही हात स्वच्छ धुवावेत.
- कच्चा मांसाहार ठेवण्यासाठी, कापण्यासाठी तुम्ही वापरत असलेली सारी भांडी, सुरी, प्लॅटफॉर्म त्याच्या वापरानंतर योग्यरित्या स्वच्छ करणंदेखील गरजेचे आहे. अन्यथा त्याद्वारा काही घातक बॅक्टेरियांचा प्रसार होऊ शकतो. टेस्टी मांसाहार हेल्दी बनवण्यासाठी या ’6′ चूका टाळा
Read this in English Translated By – Dipali Nevarekar छायाचित्र सौजन्य – Shutterstock