Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

मधुमेहींनी जेवणात खोबरेल तेल वापरणे योग्य आहे का ?

$
0
0

खोबरेल तेलाचे अनेक फायदे असले तरी मधुमेहींसाठी ते उपयुक्त नाही, असे समजले जाते. अनेकांना असे वाटते की इतर कोणत्याही खाद्य तेलाऐवजी ऑलिव्ह ऑईल वापरल्यास ब्लड शुगर कमी होण्यास आणि वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. आणि मधुमेहींसाठी या दोन गोष्टीच अधिक काळजी करण्यासारख्या असतात.

नॅचरोपॅथी न्यूट्रीशियनिस्ट आणि ‘Don’t just feed…Nourish your child पुस्तकाच्या लेखिका ध्वनी शहा यांच्या सल्ल्यानुसार खोबरेल तेल देखील मधुमेहींसाठी चांगले असते. त्यात अँटिऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असून medium-chain-triacylglycerols असतात. त्यामुळे अन्नपचनास मदत होते आणि मधुमेहींचे वजन ही नियंत्रित राहते, असे त्यांनी सांगितले. खरंतर खोबरेल तेलामुळे मधुमेहींमध्ये इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारते.

  • खोबरेल तेलाची निवड का करावी?

मधुमेहींसाठी खोबरेल तेलाचे असलेले फायदे:

अन्नपचनास मदत होते:

मधुमेहाचा परिणाम शरीरातील सगळ्या महत्त्वाच्या अवयवांवर होतो. यकृतावर देखील त्याचा परिणाम होतो. यकृतातून पित्ताची निर्मिती होते. त्याचबरोबर इतर अनेक डायजेस्टिव्ह एन्झाईम्स स्त्रवतात. मधुमेहाचा यकृतावर झालेल्या परिणामामुळे त्याचे कार्य मंदावते व त्यामुळे पित्त आणि एन्झाईम्सची निर्मिती कमी प्रमाणात होते. परिणामी अन्नपचन नीट होत नाही. म्हणून, फॅटयुक्त पदार्थ पचण्यास अधिक वेळ लागतो. मेटॅबॉलिझममध्ये अडथळे येतात. याचा परिणाम म्हणजे वजन वाढू लागतं. मधूमेहींनी जेवणात तेलाऐवजी तूपाचा वापर का करावा ?

इतर तेलांमध्ये  long-chain- triacylglycerols असतात तर खोबरेल तेलात medium-chain-triacylglycerol असतात. त्यामुळे अन्नाचे विघटन आणि पचन सहज होते. तसंच शरीरात ऊर्जेचा प्रसार सहज होण्यास मदत होते आणि ब्लड शुगर नियंत्रित राहते. मधूमेहींनो ! जांभूळ खा आणि ब्लड-शुगर नियंत्रणात ठेवा

वजन नियंत्रित ठेवण्यास फायदेशीर:

अभ्यासातून असे दिसून आले आहे की medium-chain-triacylglycerols युक्त तेल वजन नियंत्रित ठेवण्यास आणि फॅट कमी करण्यास मदत करतात. The American Journal of Clinical Nutrition यांनी १९-५० वयोगटातील ४९ ओव्हरवेट पुरुष व महिलांवर प्रयोग केला. त्यात दोन गट करण्यात आले. ऑलिव्ह ऑईलचे सेवन करणाऱ्यांचा एक गट आणि medium-chain-triacylglycerols ऑईल्सचे सेवन करणाऱ्यांचा दुसरा गट.

त्यातून असे दिसून आले की जे लोक medium-chain-triacylglycerols ऑईल्सचे सेवन करतात त्यांचे फॅट मास आणि पोटाजवळील चरबी ऑलिव्ह ऑईलचे सेवन करणारांच्या तुलनेत अधिक कमी होते. यावरून असे दिसून येते की खोबरेल तेल हे medium-chain-triacylglycerols तेल असून त्याचा वजन नियंत्रित ठेवण्यास आणि मधुमेहींमध्ये फॅट कमी करण्यास मदत होते. परिणामी ब्लड शुगर कमी करण्यास आणि परिस्थिती सुधारण्यास मदत होते. मधुमेह नियंत्रित करणारे ’10′ रामबाण उपाय

कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यास मदत होते:

The journal Lipids च्या अभ्यासात पोटाचा आणि कंबरेचा घेर ८८ सेंमी पेक्षा जास्त होता. त्यांना खोबरेल तेल देण्यात आले तेव्हा गुड कोलेस्ट्रॉलमध्ये वाढ झाली आणि बॅड कोलेस्ट्रॉल कमी झाले. हा प्रयोग २०-४० वयोगटातील महिलांवर १२ आठवडे करण्यात आला.

प्रयोगातून योग्य निष्कर्ष निघण्यासाठी महिलांचे २०-२० च्या दोन गटात विभाजन करण्यात आले. त्यांना जेवणातून खोबरेल तेल आणि सोया तेलाचे सेवन करण्यास सांगितले. दोन्ही गटातील महिलांचे BMI कमी झाले. परंतु, ज्या गटातील महिलांनी खोबरेल तेलाचे सेवन केले होते त्यांचे कोलेस्ट्रॉल आणि पोटाजवळील चरबी देखील कमी झाली. म्हणजेच यातून असे दिसून येते की मधुमेहींनी खोबरेल तेलाचे सेवन केल्यास पोटाचा घेर कमी होण्यास आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यास नक्कीच मदत होईल. फक्त आहार आणि व्यायामाने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहू शकते का ?

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

References:

[1]1: St-Onge MP, Bosarge A. Weight-loss diet that includes consumption of medium-chain triacylglycerol oil leads to a greater rate of weight and fat mass loss than does olive oil. Am J Clin Nutr. 2008 Mar;87(3):621-6. PubMed PMID:18326600; PubMed Central PMCID: PMC2874190.

[2]1: Assunção ML, Ferreira HS, dos Santos AF, Cabral CR Jr, Florêncio TM. Effects of dietary coconut oil on the biochemical and anthropometric profiles of women presenting abdominal obesity. Lipids. 2009 Jul;44(7):593-601. doi:10.1007/s11745-009-3306-6. Epub 2009 May 13. PubMed PMID: 19437058.


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>