Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

या ’13′चूका वाढवतात मूळव्याधीचा त्रास !

$
0
0

मूळव्याधीच्या समस्येचा तुमच्या दैनंदिन जीवनावर निश्चितच परिणाम होतो.मूळव्याधीमुळे होणारा रक्तस्त्राव,वेदना,गुदद्वाराला येणारी खाज व अस्वस्थता यामुळे तुम्हाला घरी अथवा ऑफीसचे काम करणे कठीण जाते.खरेतर पाईल्सची समस्या असलेली व्यक्तीच हा त्रास नेमका समजू शकते.

या समस्येपासून आराम मिळावा यासाठी अनेक जण आहारात योग्य ते बदल व जंकफूड न खाण्याचा सल्ला देतात.मात्र लक्षात ठेवा या काही चुका केल्यास देखील तुमची पाईल्सची समस्या अधिक गंभीर होऊ शकते.तसेच जाणून घ्या मूळव्याधीचा त्रास कमी करणार्‍या ’10′ फायदेशीर टीप्स !

१.बराच काळ एकाच ठिकाणी बसून काम करणे-जर तुमचे वजन अति असेल तर तुम्हाला जास्त त्रास होऊ शकतो.त्यात जर तुम्ही ऑफीसमध्ये बराच वेळ बसून काम करीत असाल,सतत टीव्ही पहाणे अथवा इंटरनेट सर्फींग करीत असाल तर तुम्हाला बद्धकोष्टतेचा त्रास होऊन शौचाला त्रास होऊ शकतो.शारीरिक हालचाल कमी झाल्यामुळे तुमच्या गुदद्वाराच्या रक्तवाहिन्यांवर अतिरिक्त दाब येतो.यासाठी बराच वेळ एका ठिकाणी बसणे टाळा.निरोगी रहाण्यासाठी चालण्याचा व कार्डिओ एक्सरसाइजचा सराव जरुर करा.मुळव्याधीपासून आराम मिळवण्यासाठी दिवसभरात कमीतकमी ३० मिनीटे ब्रीस्क वॉक घ्या अथवा जॉगींग करा.

२.दररोज जड वस्तू उचलणे-जर तुम्ही निरोगी जीवनशैलीसाठी जीममध्ये जाणे सुरु केले असेल तर हे नक्कीच चांगले आहे.पण व्यायाम करताना वेट लिफ्टींग करणे टाळा.कारण त्यामुळे तुमच्या गुदद्वारावर अतिरिक्त ताण येईल.यासाठी तुमची मुळव्याधीची लक्षणे कमी होईपर्यंत मध्यम स्वरुपाचे व्यायाम करा.तसेच मुळव्याधीच्या लक्षणांना दुर करा या ’8 ‘ नैसर्गिक उपायांनी !

३.बद्धकोष्ठता अथवा डायरिया सारख्या समस्यांकडे दुर्लक्ष करु नका-बद्धको    असल्यास पुढे मुळव्याधीची समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.तसेच डायरियामुळे देखील मुळव्याधीची समस्या अधिक गंभीर होऊ शकते.जर तुम्हाला जुलाब अथवा शौचाला त्रास होत असेल तर एक फुड डायरी करा.तुमच्या आहाराकडे लक्ष देऊन तुमचा त्रास वाढविण्या-या समस्यांची नोंद त्या डायरीमध्ये करा.तसेच ते पदार्थ लगेच तुमच्या आहारातून कमी करा.असे करुन देखील तुम्हाला पुन्हा डायरियाचा त्रास होत असेल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्या.तस्च वाचा बद्धकोष्ठतेमुळे वाढू शकतात शरीरात या ’7′ समस्या !

४.स्वच्छता न राखणे-भारतामधील उष्ण व अति आर्द्रतेचे वातावरण मुळव्याधीच्या रुग्णांसाठी त्रासदायक ठरते.जर तुम्ही नियमित अंघोळ करणे,गुप्तांग स्वच्छ ठेवणे अशा गोष्टी वेळच्या वेळी केल्या नाहीत तर तुमचा मुळव्याधीचा त्रास अधिक वाढू शकतो.यासाठी तुमच्या टॉयलेट मध्ये सतत टॉयलेट पेपर असेल याची काळजी घ्या.टॉयलेट नंतर तुमचे गुप्तांग कोमट पाण्याने धुवा व ते पुसून कोरडे करण्यास विसरु नका.जळजळ टाळण्यासाठी गुदद्वारावर टॉयलेट पेपर अथवा कापड जोरात घासू नका.मासिक पाळीमध्ये रॅशेस टाळण्यासाठी संवेदनशील त्वचेसाठी असलेले विशिष्ट सॅनिटरी पॅड जरुर वापरा.तसेच सार्वजनिक स्वच्छतागृह वापरताना या ‘९’ स्टेप्स नक्की पाळा!

५.अति ताण व चिंता असणे-कामावरील अथवा जीवनातील ताण-तणावापासून काही वेळ दूर रहाण्याचा प्रयत्न करा.कारण तुमच्या ताण-तणाव व चिंता,काळजीचा परिणाम तुमच्या मुळव्याधीच्या समस्येवर होऊ शकतो.मनाला शांतता देणा-या गोष्टी करा अथवा ताण कमी करण्यासाठी दोन-तीन िदवस कामाच्या व्यापातून सुट्टी घ्या.ताण तणाव सांभाळून डीप्रेशनवर मात करण्यासाठी खास टीप्स !

६.अतिप्रमाणात Laxatives घेणे-मुळव्याध असल्यास तुमचे Gastroenterologist तुम्हाला शौचाला पातळ होण्यासाठी एखादे Laxatives घेण्याचा सल्ला देतात.खरेतर ह्या गोळ्या अथवा सिरप एका आठवड्यापेक्षा अधिक दिवस घेऊ नयेत.सतत ही औषधे घेण्याची सवय स्वत:ला लावू नका.तुम्हाला शौचाला त्रास होत असेल तर एखादे घरगुती औषध घ्या अथवा इसबगोल घ्या.

७.टॉयलेटमध्ये बसून वाचन करणे अथवा फोन वापरणे-लक्षात ठेवा टॉयलेटमध्ये १० ते १५ मिनीटांपेक्षा अधिक वेळ राहू नका.शौचाला अधिक वेळ लावल्यामुळे गुदद्वारावर शौच करताना अधिक ताण येऊ शकतो.शौचाला बसून सकाळचा पेपर वाचणे अथवा मोबाईल वर माहिती वाचत बसल्यामुळे शौच करण्यास वेळ लागतो व तुमच्या गुदद्वाराजवळील रक्तवाहिन्यांवर अधिक ताण येतो.त्यामुळे शौचाला जाताना दहा मिनीटांचा टायमर लावा व जास्त वेळ कमोडवर बसून राहू नका.पोट चांगले साफ होण्यासाठी भारतीय टॉयलेटचा वापर करणे अधिक फायदेशीर आहे.यासाठी वाचा वेस्टर्न स्टाईल पब्लिक टॉयलेटच्या वापराने आजारांना आमंत्रण !

८.Wet Wipes वापरणे-Wet Wipes खरेदी करताना सावध रहा.शक्य असल्यास ते वापरणे टाळा कारण ब-याच Wet Wipes मध्ये अल्कोहोल सारखे घटक असतात ज्यामुळे तुमच्या दुख-या भागावर वेदना होऊ शकतात.

९.नखांनी खाजवणे-मुळव्याधीची समस्या असलेल्या लोकांना गुदद्वाराजवळ सतत खाज येते.अशा वेळी या भागावर खाजवणे टाळा.कारण त्यामुळे तुम्हाला अधिक वेदना होऊ शकतात.खाजेपासून आराम मिळण्यासाठी तुमच्या डॉक्टरांना एखादे Topical ointments अथवा जेल देण्यास सांगा.

१०.भरपूर प्रमाणात कॉफी पिणे-अल्कोहोल व कॉफीमुळे तुम्ही डी-हायड्रेट होता.कॉफीमुळे बद्धकोष्टतेचा त्रास देखील होतो.यासाठी कॉफीचे प्रमाण कमी करा.तसेच जाणून घ्या सकाळी उठल्यावर चहा-कॉफी घेतल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होण्यास मदत होते का ?

११.एखाद्या कठीण जागी बराच वेळ बसणे-काही झाले तरी मुळव्याधीची समस्या असल्यास तुमच्या गुदद्वारावर दाब पडता कामा नये.यासाठी बराच वेळ लादीवर बसू नका व जर तुमच्या ऑफीसमधील खुर्ची आरामदायक नसेल तर एखादी चांगली उशी त्यावर ठेऊन बसा म्हणजे तुम्हाला अधिक त्रास होणार नाही.

१२.वेळेवर शौचाला न जाणे-शौचाला जाण्यास टाळाटाळ करु नका.कारण शौचाला अडवून ठेवल्यामुळे तुमच्या गुदद्वारावर अधिक ताण येईल.त्यामुळे शौचाला झाल्यास टाळाटाळ न करता वेळेत जा.जाणून घ्या शौचाला अडवून ठेवल्यास आरोग्यावर कोणते दुष्परिणाम होतात ?

१३.शस्त्रक्रियेचा उपाय करणे टाळणे-कधी कधी औषधोपचार करुन देखील मुळव्याध अथवा फिशर पुन्हा पुन्हा होऊ शकतो.आहारामध्ये व जीवनशैलीमध्ये पुरेसे बदल करुन देखील तुम्हाला मुळव्याधीचा त्रास होत असेल तर याबाबत चांगल्या सर्जनचा सल्ला घेणे आवश्यक आहे.भविष्यात त्रास कमी करण्यासाठी मुळव्याधीवर शस्त्रक्रिया करुन घेण्यास संकोच करु नका.वाचा मूळा – मूळव्याधीचा त्रास कमी करणारा नैसर्गिक उपाय

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>