Quantcast
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

आपल्याला तहान का लागते ?

पाणी हे जीवन आहे, हे आपण सगळेच जाणतो. दिवसभरात ८ ग्लास पाणी प्यावे, हे आपण अनेकदा वाचलं  किंवा ऐकलं असेल. परंतु, खरंच याची गरज आहे का ? या सामान्यपणे पडणाऱ्या प्रश्नाचे उत्तर मुंबईच्या न्यूट्रीशियनिस्ट Ms Rina Baliga, यांनी दिले. तसंच आपल्याला तहान का लागते ? या इंटरेस्टिंग प्रश्नाबद्दल देखील माहिती दिली. उकळलेले,गाळलेले की बाटलीबंद पाणी पिणे अधिक फायदेशीर आहे ?

आपल्याला तहान का लागते ?

आपल्या शरीराचा ७०% भाग हा पाण्याने बनलेला आहे. म्हणून जर शरीरातील पाणी त्यापेक्षा कमी झाले तर osmolyte चे प्रमाण वाढते. आणि मेंदूला तहान लागल्याचा संकेत मिळतो. शरीरात फ्लुईडची कमतरता निर्माण झाल्यास किंवा osmolites म्हणजेच शरीरातील मिठाचे प्रमाण वाढल्यास आपल्याला तहान लागते. तहान लागल्याचा संकेत शरीराकडून मेंदूला दिला जातो. तहान भागवण्यास फायदेशीर ‘५’ पदार्थ !

सोप्या भाषेत सांगायचे झाले तर शरीराला पाण्याची आवश्यकता भासते. त्यासाठी शरीर पाण्याची मागणी करतं. म्हणजेच तहान लागते. म्ह्णून तहान भागवण्यासाठी पाणी पिण्याची किंवा एखादे पेय घेण्याची गरज असते. पाणी कमी प्यायल्यामुळे डिहायड्रेशन होते. त्यामुळे तहान लागते. किंवा osmolytes चे प्रमाण वाढल्यामुळे अथवा असंतुलित प्रमाणामुळे तहान लागते. या टीप्सने पूर्ण होईल तुमचं नियमित 8 ग्लास पाणी पिण्याचे लक्ष्य !

तहान लागल्यावर खूप वेळ पाणी किंवा कोणतेही पेय न घेतल्यास डिहायड्रेशन होते. म्हणून जर तहान लागल्याच्या मेंदूच्या संकेताकडे दुर्लक्ष केल्यास अनेक आरोग्याचा समस्या उद्भवतील. तसंच तहान लागते तेव्हा तुम्हाला कार्बोनेटेड ड्रिंक्स, शुगरी फ्रुट ज्युसेस किंवा एनर्जी ड्रिंक्स घेण्याची इच्छा होते. तहान लागल्यावर हे ‘५’ पदार्थ घेणे टाळा !

परंतु, पाणी पिणे याचा अर्थ अशा प्रकारच्या ड्रिंक्सचे सेवन करणे असा नाही. तर तहान लागल्यावर ती शमवण्यासाठी साधं पाणी प्या. कारण मी असे अनेक लोक बघितलेत जे दिवसभरातील पाणी घेण्याचे प्रमाण त्यांच्या ग्रीन टी किंवा ज्युसेसने मोजतात. आणि पाणी फक्त थोडंच पितात. तर असं न करता तुमचे पाणी पिण्याचे प्रमाण तुमच्या शरीराच्या वजनाच्या कमीत कमी ३४ मिली/किलो असे ठेवा. त्यामुळे तुम्ही हेल्दी रहाल, असे  Rina म्हणाल्या. कोमट की थंड पाणी ? निरोगी स्वास्थ्यासाठी कोणता पर्याय निवडाल

 

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>