तुरटी सामान्यपणे पाणी शुद्ध व स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येते.पण या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी व सौंदर्य वाढवण्यासाठी देखील तुरटीचा अनेक प्रकारे वापर करु शकता.अगदी अॅक्नेपासून ते मसल क्रॅम्प पर्यत अशा अनेक आरोग्य समस्यांवर तुरटी फायदेशीर ठरते.सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुरटी तुम्हाला कुठेही सहज उपलब्ध होऊ शकते व ती स्वस्त देखील असते.जाणून घ्या या अनेक आरोग्य लाभांसाठी घरामध्ये तुरटी असणे आवश्यक आहे.
१.Canker sores वर उपचार करण्यासाठी-
जर तुम्हाला वेदनादायक Canker sores चा त्रास होत असेल तर तुम्ही त्यावर तुरटीचा वापर करु शकता.तुरटी ही अॅन्टीबॅक्टेरियल असल्यामुळे इनफेक्शन कमी होण्यास मदत होते व लवकर आराम मिळतो.
टीप-यासाठी तुम्हाला दुख-या भागावर तुरटी दाबून ठेवावी लागेल. तुरटी लावल्यामुळे त्या भागात भयंकर जळजळ व वेदना होऊ शकते त्यामुळे त्याबाबत सावध रहावे.तसेच लक्षात ठेवा तुरटीमुळे निर्माण झालेली लाळ गिळू नये व लहान मुलांना देखील तुरटी पासून दूर ठेवावे.
२.माऊथवॉश म्हणून वापर करण्यासाठी-
तोंडाला दुर्गंध येण्याचे एक कारण तोंडामधील बॅक्टेरिया असून त्यामुळे अॅसिड व विषद्रव्ये निर्माण होतात.तुरटीच्या माऊथवॉश ने चुळ भरल्यामुळे तोंडातील बॅक्टेरियांचा नाश होतो व बॅक्टेरियाच्या वाढीला विरोध होतो.जाणून घ्या तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासाठी हे ९ घरगुती उपाय
टीप-तुरटीपासून माऊथवॉश निर्माण करण्यासाठी एक ग्लास पाणी गरम करा व त्यामध्ये एक चिमूटभर मीठ टाका.मिश्रण चांगले ढवळून घ्या जेणेकरुन मीठ पाण्यामध्ये विरघळेल.त्यानंतर त्यामध्ये थोडी तुरटीची पावडर मिसळा.मिश्रण थंड झाल्यावर गाळून घ्या व या मिश्रणाने दिवसातून दोनदा चुळ भरा. मिश्रण तोंडावाटे गिळले जाणार नाही याची काळजी घ्या.
३.केसांमधील उवांसाठी-
केसांतील उवा व त्याची अंडी या समस्येवर तुरटी हा एक जुना उपाय आहे.तुरटीमधील अॅन्टीबॅक्टेरियल व अॅस्ट्रीजंट गुणधर्मामुळे उवा नष्ट होतात.
टीप-केसांमधील उवांसाठी अधिक परिणामकारक तुरटी घ्या व ती पाण्यामध्ये मिसळा.या मिश्रणामध्ये थोड्या प्रमाणात टी ट्री ऑइल मिसळा.हे मिश्रण केसांना लावून दहा मिनीटे मसाज करा व त्यानंतर थंड पाण्याने केस धुवून टाका.त्यानंतर केसांना शॅम्पू व कंडीशनर करण्यास विसरु नका.केसांमधील उवा कमी करण्यासाठी काही दिवस आठवड्यातून दोनदा हा प्रयोग करा.जाणून घ्या पावसाळ्यात डोक्याला येणारी खाज कमी करण्याचे ’6′ घरगुती उपाय !
४.पिंपल्स कमी करण्यासाठी-
अॅक्ने,पिंपल्स व स्कार्स वर मुलतानी माती,एग व्हाइट व तुरटीचे मिश्रण फार परिणामकारक आहे.तुरटीमधील अॅन्टीसेप्टीक घटकांचा या समस्येला दूर करण्यास चांगला फायदा होतो.तसेच या उपायांंनी मिळवा अॅक्नेच्या समस्येपासून कायमची सुटका
टीप-यासाठी एक चमचा मुलतानी माती,दोन चमचे अंड्यातील पांढरा भाग व एक चमचा तुरटीची पावडर घ्या व फेसपॅक तयार करा.हा फेसपॅक तुमच्या अॅक्ने अथवा पिंपल वर लावा व पंधरा मिनीटांनी थंड पाण्याने चेहरा धुवा.आठवड्यातून तीनदा हा घरगुती फेसपॅक लावा.
५.आफ्टर शेव्ह लोशनसाठी-
अनेक महागड्या आव्हर शेव्हलोशन पेक्षा तुरटी प्रभावी असते.फार पूर्वीपासून तुरटीचा आव्हर शेव्ह लोशनसाठी वापर करण्यात येतो.तुरटीमुळे तुमची त्वचा मऊ होते व त्वचेचा पोतही सुधारतो.शेव्ह करताना कापले गेल्यास रक्त थांबण्यासाठी देखील तुरटीचा वापर करण्यात येतो.
टीप- यासाठी तुरटीचा खडा तुमच्या त्वचेवर फक्त फिरवा व दोन मिनीटांनी थंड पाण्याने त्वचा धुवून टाका.काही आठवड्यामध्ये याचे परिणाम दिसू लागतील.
६.प्री-मॅच्युअर एजींग पासून वाचण्यासाठी-
तुरटीमध्ये अॅन्टी-एजींग घटक असल्यामुळे तुरटीचा वापर केल्यामुळे तुम्ही लवकर वृद्ध दिसत नाही व तुमची त्वचा मऊ व तजेलदार होते.
टीप-एक तुरटीचा खडा घ्या व पाण्यामध्ये भिजवा.हा खडा तुमच्या चेह-यावरुन फिरवा.चेहरा थंड पाण्याने धुवा व त्यानंतर चेह-यावर चांगले मॉश्चराजर लावा. या उपायामुळे तुमची सैल झालेली त्वचा काही आठवड्यांनी पुन्हा घट्ट होईल.तसेच या इंटरेस्टिंग पद्धतीने जाणून घ्या तुमचे खरे वय !
७.नैसर्गिक डिओड्रंट-
जर तुमच्या शरीराला दुर्गध येत असेल तर त्यावर देखील तुम्ही तुरटीचा वापर करु शकता.तुटरीमुळे तुमच्या शरीरावर घामामुळे निर्माण होणारे बॅक्टेरिया नष्ट होतात व तुम्हाला ताजे वाटू लागते.तुरटी अॅन्टीबॅक्टेरियल असल्यामुळे नॅचरल डिओड्रंट म्हणून उपयोगी पडते.तसेच परफ्युम विकत घेताना तो बनावट नसल्याचे तपासण्यासाठी ’8′ खास ट्रीक्स !जरुर वाचा.
टीप- यासाठी तुरटीची पावडर व Myrrh याचे मिश्रण वापरा.जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तुरटी ओली करुन देखील वापरु शकता.मात्र लक्षात ठेवा तुरटी दररोज न वापरता एक दिवस आड वापरा.
मसल क्रॅम्पपासून आराम मिळतो-
मसल क्रॅम्प वर हळदीसह तुरटी लावणे फारच फायदेशीर आहे.कारण तुरटीमध्ये ब्लड थिनींग घटक असतात व हळदीमध्ये अॅन्टीसेप्टीक गुणधर्म असतात यांचा चांगला फायदा होतो.
टीप-एक चिमूट हळदीमध्ये थोडे पाणी घालून तुरटी त्यावर घासून एक पेस्ट तयार करा.ही पेस्ट दुख-या भागावर लावून सुकू द्या.दोन ते तीन दिवस असे दिवसातून दोनदा करा.या उपायामुळे वेदना व सूज दोन्ही कमी होईल.
संदर्भ-
Verma, P., & Namdeo, C. (2015). Treatment of pediculosis capitis. Indian Journal of Dermatology, 60(3), 238.
- Alzomor, A. K., Moharram, A. S., & Al Absi, N. M. (2014). Formulation and evaluation of potash alum as deodorant lotion and after shaving astringent as cream and gel. International Current Pharmaceutical Journal, 3(2), 228-233.
- Kukreja, B. J., & Dodwad, V. (2012). Herbal mouthwashes-A gift of nature. Int J Pharma Bio Sci, 3, 46-52.
- MacDonald, J. (2002). Canker sore remedies: baking soda. Canadian Medical Association Journal, 166(7), 884-884.
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock